Sarathi Youth Foundation, Solapur

Sarathi Youth Foundation, Solapur We are non-government Organisation, established on 26th Feb 2009 by socially conscious people to work with & for the youths of Society

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनातील तेजस्वी व प्रेरक प्रसंगाचा रंगमंचीय नाट्यप्रयोग!व्यसनमुक्तीसाठी कार्यरत अस...
09/08/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनातील तेजस्वी व प्रेरक प्रसंगाचा रंगमंचीय नाट्यप्रयोग!

व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या सारथी युथ फाउंडेशनच्या आर्थिक मदतीसाठी आयोजित केलेल्या या नाट्य प्रयोगास सामाजिक बांधिलकीतून आपण योगदान द्यावे.

देणगी प्रवेशिका ५००रु, ३००रु, २००रु

देणगी प्रवेशिकासाठी संपर्क :
सारथी युथ फाऊंडेशन
072766 77277 सोलापूर जिल्हा घडामोडी Adv Javed S Nagare Ramchandra Waghmare Gurunath Navnath Tate Ajay Ingale Ajay Ingale Rahul Birajdar Jagdish Patil Sudha Bhandari Nagare Virendra Pardeshi Arman Shaikh Kishor Kamble Rahul Garud Pooja Jaishree Uttam Bhalerao Bajrang Hotkar Sarathi Y F Solapur Sarathi Youth Foundation, Solapur चौफेर सोलापूर Yogesh Hasarbhave Prasad Atnoorkar भाऊराव Basavraj Jamkhandi

✨ "नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत" – जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी संपन्न! ✨युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार य...
04/08/2026

✨ "नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत" – जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी संपन्न! ✨

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत (MY Bharat), सोलापूर यांच्या पुढाकाराने, सारथी युथ फाउंडेशन, छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेज ऑफ Arts & Commerce आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत" अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाल्या.

समूह गीत, समूह नृत्य, नुक्कड नाटक, वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री आणि रील मेकिंग या विविध स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश कला आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविला.

15 ते 29 वयोगटातील युवकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. युवकांमध्ये व्यसनाच्या संदर्भामध्ये असलेली विचार या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आले. परिवर्तनासाठी युवकांमध्ये या विषयाच्या बाबतीत असणारी जागरूकता समजण्यास मदत झाली.

प्रत्येक स्पर्धेमधून प्रथम आलेल्या स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील परदेशी संबंधित असलेल्या विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीने परीक्षकांची भूमिका पार पाडली.

सर्व स्पर्धक, परीक्षक, मान्यवर, महाविद्यालये, स्वयंसेवक आणि सहआयोजक संस्थांचे मनःपूर्वक आभार! 🙏
चला, एकत्र येऊया... व्यसनमुक्त युवा – विकसित भारत घडवूया! 🇮🇳

नशा मुक्ती पथनाट्य https://youtu.be/iGL-qud27eI?feature=sharedसोलापूर जिल्हा घडामोडी Adv Javed S Nagare Ramchandra Waghm...
04/08/2026

नशा मुक्ती पथनाट्य
https://youtu.be/iGL-qud27eI?feature=shared

सोलापूर जिल्हा घडामोडी Adv Javed S Nagare Ramchandra Waghmare Gurunath Navnath Tate Prasad Atnoorkar

#नशामुक्त #युवा #नुक्कड़ #नाटक #पथनाट्य #मेरायुवाभा...

03/08/2026
World skill development day
15/07/2026

World skill development day

*युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर*सोलापूर, दि. १३ जुलै : सारथी युथ फाउंडेशनतर्फे युवकांसाठी दर शनिवारी आयोजित ...
13/07/2026

*युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर*

सोलापूर, दि. १३ जुलै : सारथी युथ फाउंडेशनतर्फे युवकांसाठी दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या 'युवा मंथन' उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. १३ जुलै २०२६) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सारथी युथ फाऊंडेशन सोलापूरच्या विडी घरकुल रस्त्यावरील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर तसेच समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. ब्रह्मानंद धडके यांनी उपस्थितांना विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. तथाकथित चमत्कार हे दैवी शक्तीचे नसून केवळ हातचलाखी आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असतात, हे त्यांनी प्रभावी प्रयोगांद्वारे स्पष्ट केले. तसेच समाजातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज अधोरेखित करत दोघांनीही उपस्थित युवकांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन कांचन सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश हसरभावे व कांचन सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.रामचंद्र वाघमारे आणि कोर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी अंधश्रद्धाविरोधी जनजागृती आणि वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर
13/07/2026

आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर

तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ठिकाण:- राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व महाविद्यालय, सोलापूर विषय:- तंबाखू व्यसनमुक...
13/07/2026

तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
ठिकाण:- राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व महाविद्यालय, सोलापूर
विषय:- तंबाखू व्यसनमुक्ती
उपस्थिती:- 85
लाभार्थी गट:- शाळेतील विद्यार्थी
मार्गदर्शक:- योगेश हसरभावे
सहाय्यक:- तरुण विलासागर

डॉक्टर डे निमित्त सारथी युथ फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सेवा देणारे डॉ. वामने यांचा संस्थेच्या वत...
13/07/2026

डॉक्टर डे निमित्त सारथी युथ फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सेवा देणारे डॉ. वामने यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला

Address

85, MotherIndia Nagar, 70 Feet Road
Solapur
413003

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

7276677277

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarathi Youth Foundation, Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sarathi Youth Foundation, Solapur:

Shortcuts

Share