18/07/2022
.
*नमस्कार....!*
*जय मार्कंडेय....!!*
पद्मशाली समाजातील सर्वोच्च स्थान असलेल्या *पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या* वतीने दरवर्षी *नुलुपुन्नम* अर्थातच *रक्षाबंधन* रोजी समाज *कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे रथोत्सव* मोठ्या जल्लोषात आणि धार्मिक वातावरणात काढण्याची परंपरा आहे. यामुळे सोलापूर शहराच्या पूर्व भागात *चैतन्यमय* वातावरण बनलेले असते. आणि पद्मशाली समाजाच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य नवीन कपडे परिधान करणे, पुरणपोळीचा आस्वाद सदस्यांसह मित्रपरिवारासोबत घेऊन तृप्त होणे हे क्रमप्राप्त झाले आहे.
यंदाचा *रथोत्सव* गुरुवार, ११ अॉगस्ट रोजी सकाळी ठीक १० वाजता सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. या रथोत्सवात अनेक सामाजिक संस्था आणि मंडळ स्वइच्छेने सामील होऊन कलांचे प्रदर्शन करीत असतात. *(ज्ञाती संस्थेच्या परवानगीनेच)* 'नुलुपुन्नम' रोजी कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेण्यासाठी समाज बांधव पहाटे तीन वाजल्यापासून श्री मार्कंडेय मंदिराकडे धाव घेतात. तेही तब्बल पाच - सहा किलोमीटर अंतरावरुन. जवळपास भक्तांची रांग तब्बल दीड किलोमीटर पर्यंत जाते. तसेच मंदिरात 'पद्मशाली पुरोहित संघम' कडून 'पद्म - बंधन' आणि' यज्ञोपवित जाणवे' धारण करुन, घरातील ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतात. श्री मार्कंडेय मंदिरातील 'श्रींच्या विधीवत महापूजेचे थेट प्रक्षेपण' ज्ञाती संस्थेच्या सहकार्याने *'पद्मशाली वर्ल्डवाईड'* च्या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश बिहार या राज्यासह किमान ३८ विदेशातील तब्बल दोन लाख बांधवांनी पाहिलेले आहे.
या *रथोत्सवात* समाजातील प्रत्येक बांधव सामील होऊन अभिमान बाळगावा. *कारण, 'माझं' म्हणण्यापेक्षा 'आपलं' म्हणणं कधीही चांगलेच.*
आणि विशेष म्हणजे.. 'नुलुपुन्नम' रोजी चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे विधीवत महापूजा यापूर्वी लिलाव पद्धतीने केले जायचे. पण, सामान्य समाज बांधवांनाही याची संधी प्राप्त व्हावे, या उद्देशाने पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने फक्त १०० /- (शंभर रुपये) माध्यमातून महापूजेचे मानकरी ठरावा. (लकी ड्रॉ पध्दतीने) याला समाज बांधवांनीही भरघोस प्रतिसाद देऊन कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींच्या चरणी सेवा अर्पण करावीत.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*या निमित्ताने विदेशातील आणि विविध राज्यांतील समाज बांधव ह्या ''रथोत्सवात'' सामील व्हावे, म्हणून ह्रदयपूर्वक विनंती.* सामील होणा-या बांधवांचे सहर्ष स्वागत आहे...! 🙏
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन ®*
*सोलापूर सिटी - (महाराष्ट्र)*
*PadmashaliWorldwide*
Http://www.facebook.com/padmaworld
✔ Verified Page
©Page Original █│║▌║▌│║║™
Jay Markandeya