Sambhav Foundation

Sambhav Foundation बंध माणुसकीच्या आधाराचे..

20/12/2025
संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण यांना लायन्स भूषण पुरस्कार २०२५ सन्मानित करण्यात आले.बेवारस मनोरुग्ण...
15/12/2025

संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण यांना लायन्स भूषण पुरस्कार २०२५ सन्मानित करण्यात आले.
बेवारस मनोरुग्णांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा.डॉ.शिवाजी शिंदे सर, राजेंद्र कासवा शहा, गुलाबचंद शहा, अरविंद कोणसिरसगी,अॅड श्रीनिवास कटुकर ,आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शोषित-पीडितांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना माणूसपणाची जाणीव करून देणारा,समाजातील अंधाराला उजेड देणारा,आणि कित्येक पिढ...
06/12/2025

शोषित-पीडितांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना माणूसपणाची जाणीव करून देणारा,
समाजातील अंधाराला उजेड देणारा,
आणि कित्येक पिढ्यांसाठी प्रज्ञासूर्य बनलेल्या

महामानवास विनम्र अभिवादन

अभिवादक 🙏
आतिश कविता लक्ष्मण
संभव फाऊंडेशन,सोलापूर
९७६५०६५०९८

🟢  #आजची_पंगत माजी सैनिक दिवंगत लक्ष्मण शंकर सोनवणे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ योगदान 🙏                                    ...
25/11/2025

🟢 #आजची_पंगत

माजी सैनिक दिवंगत लक्ष्मण शंकर सोनवणे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ योगदान 🙏

संभव अन्नपूर्णा योजना
सोलापूरच्या दररोजच्या अन्नदान तसेच एक मायेची उब उपक्रमामध्ये ब्लॅंकेट चे योगदान दिल्याबद्दल मनपूर्वक आभार.

संभव अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दररोज सोलापुरातील
बेवारस मनोरुग्णांसाठी, वयोवृद्धंसाठी एक वेळ जेवण देण्यात येतं.

विशेष सहकार्य:-
संतोष लक्ष्मण सोनवणे
(अध्यक्ष नगर विकास फाउंडेशन)
प्रा.डॉ.अंजनाताई गायकवाड

टीम संभव फाऊंडेशन
९७६५०६५०९८

 #शिवणी  #पिरटाकळी  #सीनानदी #पुरग्रस्त सिना नदीच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात...सिना नदीच्या पुरामुळे प्रभ...
02/11/2025

#शिवणी
#पिरटाकळी
#सीनानदी
#पुरग्रस्त

सिना नदीच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात...

सिना नदीच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या पिरटाकळी व शिवणी गावातील विद्यार्थ्यांना
संभव फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचा उद्देश शिक्षणाची गती थांबू नये, प्रत्येक मुलाच्या हातात पुन्हा ज्ञानाची पिशवी पोहोचावी.

या कार्यात योगदान देणाऱ्या प्रमिला ताई उबाळे, डॉ सपना ताई लोंढे,अरविंद म्हेत्रे महेश स्वामी,आतिश लोंढे, आकाश बनसोडे व सर्व दात्यांचे, सहकाऱ्यांचे आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार तुमच्या सहकार्यामुळेच ही मदतीची साखळी आशेचा किरण बनली आहे.

आतिश कविता लक्ष्मण...
संभव फाऊंडेशन, सोलापूर
९७६५०६५०९८

🎇 सप्रेम निमंत्रण 🎇एक दिवा समतेचा... वारांगनाच्या दारात...सामाजिक उपक्रम — संभव फाउंडेशनगेल्या नऊ वर्षांपासून संभव फाउंड...
24/10/2025

🎇 सप्रेम निमंत्रण 🎇

एक दिवा समतेचा... वारांगनाच्या दारात...
सामाजिक उपक्रम — संभव फाउंडेशन

गेल्या नऊ वर्षांपासून संभव फाउंडेशनच्या माध्यमातून
तरटी नाका, सोलापूर येथील वारांगना भगिनींसोबत
“एक दिवा समतेचा... वारांगनाच्या दारात...”
हा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी सणात भाऊबीज साजरी करण्यात येत आहे.

याही वर्षी,
दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी, शनिवार, सायंकाळी ७:०० वाजता तरटी नाका सोलापूर येथे
हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आपण आपल्या सहृदय उपस्थितीने
या सामाजिक दीपोत्सवाला अर्थपूर्ण कराल,
हीच नम्र विनंती 🙏

आपला
आतिश कविता लक्ष्मण
संस्थापक – संभव फाउंडेशन,सोलापूर
9765065098

आदिवासी विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदत संभव फाऊंडेशनकडे सुपूर्दजुन्नर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील आद...
16/10/2025

आदिवासी विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदत संभव फाऊंडेशनकडे सुपूर्द

जुन्नर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी समाजभावनेचे एक सुंदर उदाहरण घालून दिले आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी जमा केलेली मदत संभव फाऊंडेशनकडे सुपूर्द करण्यात आली.

स्वतः मर्यादित साधनांमध्ये शिक्षण घेत असूनही, दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून पुढे येणाऱ्या या तरुणांची संवेदना आणि सामाजिक जाणीव अत्यंत प्रेरणादायी आहे.

या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत नवी ऊर्जाशक्ती मिळणार आहे. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न समाजात माणुसकीचे आणि सहवेदनेचे नवे उदाहरण ठरले आहे.

धन्यवाद Santoshkumar Tai Rambhau

आतिश कविता लक्ष्मण...
संभव फाऊंडेशन, सोलापूर
९७६५०६५०९८

Address

Solapur
SOLAPUR

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sambhav Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share