15/10/2025
"नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (जिल्हा शाखा सोलापूर.)"
येथील विद्यार्थ्यांनी आज जागतिक पांढरी काठी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळेस विद्यार्थ्यांनी पत्रकार भवन, गांधीनगर चौक, महावीर चौक ते विकास नगर अशी पदयात्रा काढून जनजागृती केली. तसेच रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक सुद्धा उत्तमरीत्या केले.
सदर कार्यक्रमाला
सौ. Seema Shrigondekar-Yelgulwar मॅडम
मुख्याध्यापिका चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज.
सौ. सुरेखा कांबळे मॅडम
श्री. K Kishor Shrikrushna सर
एकात्मिक शिक्षण विभाग
यांनी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांसमवेत पदयात्रेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी
"पांढरी काठी अंधांसाठी", "हातात हात द्या अंधांना साथ द्या", "एक हात मदतीचा, मार्ग अंधांच्या प्रगतीचा" अशा घोषणा दिल्या...
Shashibhushan Yelgulwar
National Association for the Blind, Nasik
National Association For The Blind - Solapur
NAB sanchalit Swami Vivekanand High School Solapur