26/01/2026
*सेवासदन संस्था सोलापूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा*
सेवासदन प्रशाला येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे मा. विद्या लिमये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत,झंडा गीत, सारे जहाँ से अच्छा, गीत बँड च्या तालावर विद्यार्थिनींनी सादर केले. भारतीय संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली . भारतीय संविधान फलकाचे पूजन करण्यात आले . त्यानंतर माध्यमिक विभागातील आर. एस. पी.च्या विद्यार्थिनींनी प्राथमिकच्या विद्यार्थिनींनी सुंदर कवायत संचलन केले . प्रशालेचे शिक्षक श्री. रेवणसिद्ध कट्टे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनीनी देशभक्ती गीतावर सुंदर कवायत संचलन केले. प्रशालेतील शिक्षिका सौ. अश्विनी वाघमोडे, सौ. रत्नप्रभा हजारे व सौ.अश्विनी उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.'असाक्षर मुक्त गाव 'शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली. कु. गौरी लोंढे हिला कराटे मध्ये सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रमुख पाहुणे मा. विद्या लिमये यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितले की विद्यार्थिनींनी स्वच्छता,शालेय शिस्त, जबाबदारीने वागणे हे गुण लहानपणापासून अंगी घेतले पाहिजे.भावी पिढी ने भारताचे भविष्य घडवण्यासाठी सतत जागरूक राहणे गरजेचे आहे.
कार्यक्रम प्रसंगी सेवासदन संस्था सचिव सौ. वीणा पतकी, माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष सौ. विद्या लिमये, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. पद्मकुमार उपाध्ये, माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. संजीवनी नगरकर, बालवर्ग विभाग मुख्याध्यापिका सौ. मनीषा दिकोंडा, माजी सहसचिव श्री. केदार केसकर तसेच माजी पर्यवेक्षिका श्रीमती दिपाली गोन्यल , शिक्षिका श्रीमती छाया साखरे ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ,पत्रकार विद्यार्थिनी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन क्रीडा प्रमुख श्री. ज्ञानेश्वर काळे यांनी केले. वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली .