Krishi Vigyan Kendra, Solapur

Krishi Vigyan Kendra, Solapur Official page of Krishi Vigyan Kendra, Solapur. Our main objective is overall development of farming community of Solapur District.

KVK, Solapur-I was organized Live Webcasting of PM-Kisan Samman Nidhi 22nd Instalment release & Hon. Prime Minister Addr...
16/03/2026

KVK, Solapur-I was organized Live Webcasting of PM-Kisan Samman Nidhi 22nd Instalment release & Hon. Prime Minister Address to the farmer on 13.03.2026 at KVK, Solapur Campus.

The KVK, Solapur-I is organized live webcasting of Hon. P. M. Address on Post Budget webinar on Agriculture & Rural Tran...
06/03/2026

The KVK, Solapur-I is organized live webcasting of Hon. P. M. Address on Post Budget webinar on Agriculture & Rural Transformation followed by Parallel session on Cashew and Cocoa on 06.03.2026.

भारतविस्तार – योग्य योजना, योग्य शेतकरी, योग्य वेळी.अनेक शेतकऱ्यांना आपण एखाद्या योजनेसाठी पात्र आहोत की नाही, अर्ज कसा ...
17/02/2026

भारतविस्तार – योग्य योजना, योग्य शेतकरी, योग्य वेळी.
अनेक शेतकऱ्यांना आपण एखाद्या योजनेसाठी पात्र आहोत की नाही, अर्ज कसा करायचा, किंवा लाभाची स्थिती कशी पाहायची याबद्दल खात्री नसते.
भारतविस्तार त्वरित पात्रता तपासणी, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि रिअल-टाईम स्टेटस अपडेट्स थेट आवाज आणि मजकूराद्वारे उपलब्ध करून देते.

भारतविस्तार – एक राष्ट्र, शेतकऱ्यांसाठी एकच व्यासपीठ.सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवताना शेतकऱ्यांना अनेकदा अडचण येते, ...
17/02/2026

भारतविस्तार – एक राष्ट्र, शेतकऱ्यांसाठी एकच व्यासपीठ.
सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवताना शेतकऱ्यांना अनेकदा अडचण येते, कारण माहिती विविध वेबसाइट्स आणि कार्यालयांमध्ये विखुरलेली असते.
भारतविस्तार सर्व योजनांची माहिती एका विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठावर आणते सोप्या, स्पष्ट आणि शेतकऱ्यांच्या स्वतःच्या भाषेत.

The Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Live Webcasting of Launch of Bharat Vistaar programme on 17.02.2026.
17/02/2026

The Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Live Webcasting of Launch of Bharat Vistaar programme on 17.02.2026.

भावनिक शेती नको व्यवसाईक शेती हवी - श्री. पांडूरंग आव्हाडकृषि तंत्रज्ञान महोत्सव 2026 ची  सांगता  भावनीक शेती नको व्यवसा...
23/01/2026

भावनिक शेती नको व्यवसाईक शेती हवी - श्री. पांडूरंग आव्हाड
कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2026 ची सांगता

भावनीक शेती नको व्यवसाईक शेती करा असे प्रतिपादन रांजणीचे नॅचरल शुगर लि. चे उपाध्यक्ष श्री. पांडूरंग आव्हाड यांनी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कृषि तंत्रज्ञान महोत्सव-2026 च्या दुस-या दिवशीच्या तांत्रिक चर्चा सत्रात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले ऊस उत्पादनात वाढ करावयास योग्य बेणे निवड, रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांची जोड द्यावी लागेल. सातफुटावर सरी, एक डोळा लागवड, टक्कर पध्दत बंद करा, पाचट हे ऊस पिकातील सोने आहे ते जाळू नका ते कुजवा त्यापासुन उत्तम प्रकारचे एकरी 2.5 टन सेंद्रिय खत जमिनीत मिसळते त्यातून सेंद्रिय कर्ब वाढतो. या प्रकारचे तंत्रज्ञान वापरल्यास ऊस पिकामध्ये उत्पादनात वाढ झालेली दिसुन येईल.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूरचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रंजनकुमार सिंग उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते म्हणून फायलो कंपनीचे ऊस पिकातील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मा. डॉ. श्रीयोग नोरलावार उपस्थित होते. यावेळी नाबार्ड, सोलापूरचे डी.डी. एम. श्री. नीतीन शेळके, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी, उत्तर सोलापूर श्री. आर. एस. माळी इ. मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी चांगले तंत्रज्ञान देण्यामध्ये कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर आग्रही राहते. तसेच सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी जीजाई नॅनो किचन युनिट उत्कृष्ठ असुन त्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रंजनकुमार सिंग यांनी मातीच्या सुपिकतेवर भर देणे गरजेचे असुन मातीला सुपिक केल्यास जमिनीच्या / पिकाच्या अनेक समस्या कमी होतील असे प्रतिपादन केले. फायलो कंपनीचे डॉ. श्रीयोग नोरलावार यांनी ए. आय. च्या वापराने पाणी, खते, औषधे, मजुरी यामध्ये बचत होते पण त्याही पुढे कीड, रोग ही कमी होतात. तसेच ड्रोन सारखे तंत्रज्ञानाचा अवलंब ही फायदेशिर असल्याचे सांगीतले. नाबार्ड, सोलापूरचे डी. डी. एम. श्री. नितीन शेळके यांनी नाबार्डच्या विविध योजनां विषयी माहिती दिली. श्री. देवेन्द्र ढगे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना सांगितल्या. यावेळी शेतक-यांनी विशेषत्वाने ड्रोन व्दारे फवारणी विषयी, ए. आर. चे संयत्र इत्यादी कसे कार्य करते याबाबत सखोल अशी माहिती घेतली. हत्तुरे ऍग्रो सायन्ससेस शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री. संगमेश्वर हत्तुरे व त्यांचे संचालक मंडळ, लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या व्यतिरीक्त भागातील शाळा यानींही या कार्यक्रमानंतर भेटीसाठी येणार असल्याचे कळविले आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. अमोल शास्त्री तर आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश कदम यांनी केले. यावेळी प्रगतशील शेतक-यांचे सत्कार करण्यात आले.

कृषि तंत्रज्ञान महोत्सव अनुकरणीय : अप्पर जिल्हाधिकारी श्री. गणेश निराळीकृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन संपन्न कृषि तं...
23/01/2026

कृषि तंत्रज्ञान महोत्सव अनुकरणीय : अप्पर जिल्हाधिकारी श्री. गणेश निराळी
कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

कृषि तंत्रज्ञान महोत्सव अनुकरणीय शेतीला सुधारीत तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हयाचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. गणेश निराळी यांनी कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाअन करताना केले. शबरी कृषि प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र सोलापूर तर्फे आयोजित कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन दि. 22 जानेवारी, 2026 रोजी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम 22 व 23 जानेवारी रोजी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूरचे चेअरमन श्री. प्रदिपजी गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले, ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी. एस. जगताप, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अनिल तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. विशाल येवले, व्याख्याते व फार्म लॅब एरंड ऍग्रो प्रा. कंपनी वाशीमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संतोष चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयोजित शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे यांनी प्रत्यक्ष पिक प्रात्येक्षिकात लागवड करण्यात आलेल्या पिकांविषयी माहिती दिली. येथे 34 पिकांच्या 50 पेक्षा जास्त वाणांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये चारा पिके, भाजीपाला, तृणधान्य, चिया सिड सारख्या वेगळ्या पोषण तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे.

अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना श्री. प्रदिपजी गायकवाड यांनी येथे प्रत्यक्ष पिके प्रदर्शित केल्यामध्ये आपणास जे योग्य वाटते ते तंत्रज्ञान आपल्या शेतावर शेतकरी बांधवानी आत्मसात करावे तरच हा कार्यक्रम सार्थकी लागला असे म्हणता येईल असे प्रतिपादन केले. डॉ. लालासाहेब तांबडे यांनी या महोत्सवामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवाना जैविक निवीष्ठा घरच्या घरी तयार करण्यासाठी मोफत विरझण देत असल्याचे सांगीतले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले यांनी कृषि विज्ञान केंद्रामध्ये आयोजित पीक प्रात्यक्षिकाला भेट द्यावी असे प्रतिपादन केले. प्रमुख व्याख्याते व फार्म लॅब एरंड ऍग्रो. प्रा. कंपनी वाशीम चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकरी बांधवानी आपल्याला लागणारी खते औषधे घरच्या घरी तयार करण्याचे सुत्र बांधावरची शेतीशाळा या संकल्पनेतून विषद केले. घरातील डाळींच्या पिठांचा, दही, ताक इत्यादींचा वापर करून उत्कृष्ठ पध्दतीचे खत तयार करता येते. अशा प्रकारची खते औषधे वाशीम जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात शेतकरी करत असल्याचे सांगितले. शेणखत, लेंडीखत, मळी हे जिवाणूंची खाद्ये आहेत ती जमिणीत विपूल प्रमाणात आवश्यक आहेत. डाळी पिठांचा उंडा करून तो आंबवला व पाट पाण्यातून किंवा ड्रीपमधुन 4 ते 5 वेळा दिल्यास शेतीमधील पिकांचे रोग, किडी, वाढ विषयी समस्या कमी करण्यामध्ये होतो असे प्रतिपादन केले. यावेळी महिला शेतक-यांची संख्या अधिक होती. प्रगतशील महिला शेतक-यांचे सत्कार या वेळी करण्यात आले. तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे विद्यार्थीही बहुसंख्येने उपस्थित होते.

Shabari Krishi Pratithan, Solapur's Krishi Vigyan Kendra, Solapur is organizing Agricultural Technology Festival-2026 du...
20/01/2026

Shabari Krishi Pratithan, Solapur's Krishi Vigyan Kendra, Solapur is organizing Agricultural Technology Festival-2026 during 22-23 January, 2026 at Solapur-Barshi Road, KVK, Solapur Office. During which farmers are able to see crop demonstrations, agriculture exhibition and expert lectures. Farmers are requested to attend the programme.
शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कृषि तंत्रज्ञान महोत्सव-2026 चे आयोजन दिनांक 22 व 23 जानेवारी, 2026 रोजी करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिके, तांत्रिक चर्चा सत्रे व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Village Goshthis & Walking Seminars under Awaren...
04/01/2026

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Village Goshthis & Walking Seminars under Awareness Programme of Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission at various villages of South Solapur, North Solapur & Akkalkot tahsils on 04.01.2026.

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Village Goshthis & Walking Seminars under Awaren...
03/01/2026

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Village Goshthis & Walking Seminars under Awareness Programme of Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission at various villages of South Solapur & Akkalkot tahsils on 03.01.2026

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Sarpanch Sammelan under Awareness Programme of V...
03/01/2026

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organized Sarpanch Sammelan under Awareness Programme of Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission at Borgaon (D) on 03.01.2026.

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organizing Village Goshthis & Walking Seminars under Aware...
02/01/2026

Shabari Krishi Pratishthan's Krishi Vigyan Kendra, Solapur is organizing Village Goshthis & Walking Seminars under Awareness Programme of Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission at various villages of South Solapur & Akkalkot tahsils during 3-4.01.2026.

Address

Near SVIT College, Barshi Road
Solapur
413255

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishi Vigyan Kendra, Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krishi Vigyan Kendra, Solapur:

Share