Kasalganga Foundation

Kasalganga Foundation Kasalganga Foundation : A public welfare organization that works with public participation.

*लोकसहभागातून दुष्काळावर मात करणाऱ्या कासाळगंगेच्या खोऱ्यातल्या 23 गावांची गोष्ट*  *: सोमिनाथ घोळवे,* ग्रामीण समाज व्यवस...
11/05/2026

*लोकसहभागातून दुष्काळावर मात करणाऱ्या कासाळगंगेच्या खोऱ्यातल्या 23 गावांची गोष्ट*

*: सोमिनाथ घोळवे,* ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक

कोणत्याही गावाला दुष्काळमुक्तीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 वर्षांचा कालावधी लागण्याचा अनुभव आहे. मात्र, अलीकडे लोकसहभाग, लोकवर्गणी, जल साक्षरता, नियोजन, व्यवस्थापन आणि काटकसरीने वापर करण्यातून केवळ सात वर्षात कासाळगंगा नदी खोऱ्यातील 23 वाड्या-गावांनी दुष्काळावर मात करण्याची किमया केली आहे.

सविस्तर वाचा :
https://www.bbc.com/marathi/articles/c74dq15p882o

Thanks Sominath Gholwe BBC News Marathi

लोकसहभाग, लोकवर्गणी, जल साक्षरता, नियोजन, व्यवस्थापन आणि काटकसरीने वापर करण्यातून केवळ सात वर्षात कासाळगंगा नदी .....

01/05/2026
 #पेट्रोल    पेक्षा  #पाणी   होईल  #महाग : Waterman Rajendra Singh  #जल  #जंगल    #जमीन   Er Aniket Mahajan Kailas Khaba...
27/04/2026

#पेट्रोल पेक्षा #पाणी होईल #महाग : Waterman Rajendra Singh
#जल #जंगल #जमीन
Er Aniket Mahajan Kailas Khabale Vikrant Khandekar Agr Niranjan Koli Raviraj Nashte

अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा !!💐💐💐💐💐💐💐💐💐
18/04/2026

अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा !!
💐💐💐💐💐💐💐💐💐

Collector Office Solapur  #सोलापूर  #जिल्हाधिकारी पदी सन्माननीय कार्तिकेयन एस (Karthikeyan S) साहेब यांनी पदभार स्वीकारल...
15/04/2026

Collector Office Solapur #सोलापूर #जिल्हाधिकारी पदी सन्माननीय कार्तिकेयन एस (Karthikeyan S) साहेब यांनी पदभार स्वीकारला. तसेच Zilla Parishad Solapur सीईओ पदी सन्माननीय कुशल जैन साहेब यांची नियुक्ती झाली. दोघांचे winner Kasalganga Foundation परिवाराकडून हार्दिक स्वागत.
उन्हाचे चटके बसू लागले आहेत. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील 23 गावे-वाड्यांनी संपूर्ण देशापुढे ठेवलेल्या दुष्काळ आणि पुरमुक्तीच्या मॉडेलची आठवण आल्याखेरीज राहत नाही. लोकसहभागाला महाराष्ट्र शासन, प्रशासन, सीएसआर ची साथ मिळाली आणि पंढरपूर च्या चंद्रभागा (भीमा) नदीची kasalganga नदीला पुनर्जीवन मधून उपनदीचा दर्जा मिळाला. Kasalganga ही नदी बारमाही आणि प्रदूषण मुक्त वाहत राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा लोकअभ्यास व कृती अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आला. शासनाच्या योजनांच्या कन्व्हर्जन मधून राबविण्यासाठी तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. त्याद्वारे जलसंधारण, जल व घनकचरा व्यवस्थापन ची कामे मार्गी लागली. कटफळ ते शिंगोर्णी हा बोडका डोंगर हिरवागार करणे आणि 1972 मधील पाझर तलावांचे पुनर्जीवन करणे ही कामे सुरू व्हावीत, अशी विनंती दोन्ही मान्यवर अधिकारी महोदयांना करण्यात येत आहे. स्वागताच्या जोडीला जनतेचे हे मागणे आहे.
Maharashtra DGIPR

विनम्र अभिवादन
14/04/2026

विनम्र अभिवादन

11/04/2026

थोर समाजसेवक, शैक्षणिक क्रांतिकारक
महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 #टंचाई च्या झळांनी गावे-वाड्यांचा घसा कोरडा होऊ लागलाय... #महाराष्ट्र मधील एकात्मिक जलविकासाचे मॉडेल #दुष्काळमुक्ती आणि...
08/04/2026

#टंचाई च्या झळांनी गावे-वाड्यांचा घसा कोरडा होऊ लागलाय...
#महाराष्ट्र मधील एकात्मिक जलविकासाचे मॉडेल
#दुष्काळमुक्ती आणि #पूरमुक्ती चे #लोकसहभागातून झालेले काम....
#कासाळगंगा ही आपल्या परिसरातील एक महत्त्वाची जलवाहिनी असून ती केवळ पाण्याचा स्रोत नसून आपल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा आधारस्तंभ आहे. एकेकाळी स्वच्छ, निर्मळ आणि जीवनदायी असलेली ही नदी कालांतराने प्रदूषण, अतिक्रमण आणि दुर्लक्ष यामुळे आपले अस्तित्व गमावू लागली. मात्र, या परिस्थितीतूनही एक आशेचा किरण निर्माण झाला—तो म्हणजे कासाळगंगेच्या पुनरुज्जीवनाची प्रेरणादायी यशोगाथा.
ही यशोगाथा म्हणजे आपली व स्थानिक ग्रामस्थांची जिद्द, एकजूट आणि निसर्गाविषयीची बांधिलकी यांचे जिवंत उदाहरण आहे. ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून कासाळ गंगेची स्वच्छता, खोलीकरण आणि संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात आले. या प्रयत्नांमुळे नदीला पुन्हा एकदा जीवन मिळाले आणि परिसरातील पाणीपातळी वाढून शेती, पर्यावरण आणि जनजीवन यांना नवसंजीवनी मिळाली.
“कासाळगंगा यशोगाथा” ही केवळ एका नदीच्या पुनरुज्जीवनाची कथा नाही, तर ती समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारी चळवळ आहे. एकत्रित प्रयत्न, दृढ निश्चय आणि पर्यावरणप्रेम यांच्या बळावर कोणताही बदल घडवून आणता येतो, हे या यशोगाथेतून स्पष्ट होते.
- डॉ. वाघमारे (निवृत्त अधिकारी, पुणे)...
Thanks TCS Tata Trusts JNPT The Art of Living िक्षण_संस्था रयत शिक्षण संस्था

Zilla Parishad Solapur Maharashtra DGIPR

#माणदेश

21/03/2026

मुबारक 💐💐💐💐

Address

Mahud (Solapur)
Solapur
413306

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kasalganga Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kasalganga Foundation:

Share