उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर जिल्हा

  • Home
  • India
  • Solapur
  • उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर जिल्हा

उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर जिल्हा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर जिल्हा, Non-Governmental Organization (NGO), हरिभाई देवकरण प्रशाला, Solapur.

सोलापुरात ‘व्हिजन एक्स्पो’मध्ये महिला उद्योजकांसाठी ‘उद्योजक प्रेरणा’ कार्यक्रम उत्साहातसोलापूर : सोलापुरातील नॉर्थकोर्ट...
25/04/2026

सोलापुरात ‘व्हिजन एक्स्पो’मध्ये महिला उद्योजकांसाठी ‘उद्योजक प्रेरणा’ कार्यक्रम उत्साहात

सोलापूर : सोलापुरातील नॉर्थकोर्ट येथे दिनांक २४ ते २६ एप्रिल दरम्यान सहकार भारती सोलापूर यांच्या वतीने ‘व्हिजन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले होते. या एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील उद्योजकांनी सहभाग नोंदवून आपली उत्पादने व संकल्पना मांडल्या. उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम शहरातील उद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरला.

दिनांक २५ एप्रिल रोजी दुपारी या एक्स्पोच्या निमित्ताने विशेषतः महिला उद्योजकांसाठी ‘उद्योजक प्रेरणा’ या कार्यक्रमाचे आयोजन सहकार भारती आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उद्योजक उपस्थित राहून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात यशस्वी उद्योजक तसेच स्वावलंबी भारत अभियानाचे मार्गदर्शक प्रभाकर जमखंडीकर यांनी मार्गदर्शन करताना स्वतःच्या अनुभवांबरोबरच विविध यशस्वी उदाहरणे मांडली. त्यांनी व्यवसायातील अडचणींवर मात कशी करावी, नवकल्पनांना कसे प्रोत्साहन द्यावे आणि सातत्याने प्रगती कशी साधावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित महिला उद्योजकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसायाशी संबंधित विविध शंका मांडून त्यांचे समाधान करून घेतले. या संवादात्मक सत्रामुळे कार्यक्रम अधिक परिणामकारक ठरला.

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी एक्स्पोमधील विविध स्टॉल्सना भेट देऊन नवउद्योजकांच्या कल्पना आणि उत्पादनांची माहिती घेतली तसेच त्यांना प्रोत्साहन दिले. या प्रसंगी सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, स्वावलंबी भारत अभियानचे प्रांत सहप्रमुख चन्नवीर बंकुर, विनायक बंकापूर, मयंक चौहान, ज्ञानेश्वर जाधव, राघवेंद्र राजबिंदले, प्राची धामणगावकर, संगीता संगवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. एकूणच ‘उद्योजक प्रेरणा’ हा कार्यक्रम महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत उद्योजकतेच्या दिशेने नवे मार्गदर्शन करणारा ठरला.

🚀 BIG OPPORTUNITY FOR SC / ST / OBC ENTREPRENEURS & STARTUPS 🚀⏳ USE THIS WEEKEND – FEW SLOTS LEFT!Uddyam PAHSUI Foundati...
25/04/2026

🚀 BIG OPPORTUNITY FOR SC / ST / OBC ENTREPRENEURS & STARTUPS 🚀

⏳ USE THIS WEEKEND – FEW SLOTS LEFT!

Uddyam PAHSUI Foundation Incubation Center & WISE SNDTWU Incubation Center Mumbai invite applications for the Equity-Based Incubation & Venture Investment Cohort, in association with BEACI , Savishkar india and Swalambhi bharat and supported by IFCI Venture Capital Fund & MSInS Mumbai.

💡 What You Get:
✅ Incubation Support up to ₹30 Lakhs
✅ Venture Investment up to ₹5 Crore
✅ Mentorship, Market Access & Investor Connect
✅ Product Development & Networking Opportunities

🎯 Eligibility:
SC / ST / OBC Founders
• Idea Stage
• Prototype / MVP
• Revenue Stage
(All sectors welcome)

⚡ Limited Slots Available – Don’t Miss Out!

📩 Apply Now:
https://forms.gle/vj4mLgekQyxi7R7S9

WhatsApp Channel:-https://whatsapp.com/channel/0029Vb8G6xl60eBYNVlYRE0n

📞 7080202055
📧 [email protected]

🔥 This weekend can change your future. Apply now!

"उद्योजक बना, स्वावलंबी व्हा!" 💼आज विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे पावन औचित्य साधून, समाजातील ...
14/04/2026

"उद्योजक बना, स्वावलंबी व्हा!" 💼
आज विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे पावन औचित्य साधून, समाजातील तरुण पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला. SC, ST आणि OBC उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या 'फंडिंग सपोर्ट' योजनेच्या पोस्टरचे प्रकाशन आज उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी 'स्वावलंबी भारत अभियानाचे' सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत या क्रांतीकारी योजनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.
या योजनेचे मुख्य आकर्षण:
🔹 ३० लाख रुपयांपर्यंत थेट फंडिंग सपोर्ट.
🔹 मोठ्या प्रकल्पांसाठी ५ कोटी रुपयांपर्यंत इक्विटी सपोर्ट.
🔹 व्यवसायाला गती देण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि इन्क्युबेशन

🚀 BIG OPPORTUNITY FOR SC / ST / OBC ENTREPRENEURS & STARTUPS 🚀Uddyam PAHSUI Foundation Incubation Center and WISE SNDTWU...
13/04/2026

🚀 BIG OPPORTUNITY FOR SC / ST / OBC ENTREPRENEURS & STARTUPS 🚀

Uddyam PAHSUI Foundation Incubation Center and WISE SNDTWU Incubation Center Mumbai proudly and jointly launches its New Equity-Based Incubation & Venture Investment Cohort in association with Savishkar India & Swalambhi Bharat Abhiyan and supported by IFCI Venture Capital Fund & MSInS Mumbai for Vulnerable Community Entrepreneurs.

This flagship initiative is designed to empower SC, ST & OBC founders, innovators, women entrepreneurs, rural startups, and social enterprises with incubation, growth mentoring, and institutional investment access.

💡 What selected startups will receive:
✅ Incubation support up to ₹30 Lakhs
✅ Equity-based venture investment up to ₹5 Crore
✅ Product validation & prototype support
✅ Market access & buyer connect
✅ Investor readiness & fundraising mentorship
✅ National & international networking opportunities

🎯 Who can apply?
SC/ST/OBC Innovators having
Idea stage innovations
Prototype / MVP startups
Revenue-stage ventures
in all Sectors

🌱 This cohort is focused on building the next generation of high-impact founders from vulnerable communities, enabling them to scale innovative businesses, create jobs, and transform local economies.

📩 Applications : https://forms.gle/vj4mLgekQyxi7R7S9

WhatsApp group:- https://chat.whatsapp.com/I3GPKiD8H0j1XRDncaSxiT?mode=gi_t

Contact
Phone No:- 7080202055
Email id:- [email protected]

🚀 Solapur Shark Tank Season 2 – A Grand Success! 💡✨The  Award Ceremony on 25 March 2026, organized by Uddyam PAHSUI Foun...
26/03/2026

🚀 Solapur Shark Tank Season 2 – A Grand Success! 💡✨

The Award Ceremony on 25 March 2026, organized by Uddyam PAHSUI Foundation in association with Savishkar India, Swavalambi Bharat Abhiyan, and Maharashtra State Innovation Society, marked a remarkable and resounding success in strengthening the startup ecosystem.

With an impressive 150+ startup applications and backing from 55+ investors, the event emerged as a powerful platform for innovation, collaboration, and investment

🏆 Top 7 Funded Startups:
1️⃣ 🌱 Green Warriors – ₹80 Lakhs
2️⃣ 🌾 Anukrushi – ₹50 Lakhs
3️⃣ 🚜 Athagro LLP – ₹25 Lakhs
4️⃣ 💧 Waterfall Automation Pvt. Ltd. – ₹12.5 Lakhs
5️⃣ 🧵 Tendryl Products Pvt. Ltd. – ₹12.5 Lakhs
6️⃣ 📞 Callx Ringers – ₹12.5 Lakhs
7️⃣ 🔬 Nuviatech – ₹12.5 Lakhs

🔥 Big Spotlight – Major Investment Talks Under Discussion:
➡️ 💧Waterfall Automation Pvt. Ltd. – ₹1.5 Crore
➡️ 🔬 Nuviatech – ₹1 Crore
➡️ ⚡ Caloris – ₹1.5 Crore

🎖️ *The event was graced by:
• Mr. BJC Sastry – Executive Director, NTPC Solapur
• Prof. Prakash Mahanwar – Hon. Vice Chancellor
• Prof. Laxmikant Dama – Pro Vice Chancellor, PAHSUS

🙏 Heartfelt thanks to all partners, investors, mentors, and supporters for making this initiative a grand success.

Regards
Dr. Rajesh Gurani
CEO, Uddyam PAHSUI Foundation, Solapur

Vinayak Bankapur
Swavlambi Bharat Abhiyan, Solapur

विद्यापीठाने आयोजित केलेले सोलापूर शार्क टॅंक हे देशातील सर्व विद्यापीठांसाठी रोल मॉडेल - बी जे सास्त्री_'शार्क टँक सिझन...
25/03/2026

विद्यापीठाने आयोजित केलेले सोलापूर शार्क टॅंक हे देशातील सर्व विद्यापीठांसाठी रोल मॉडेल - बी जे सास्त्री

_'शार्क टँक सिझन २' चा समारोप, नवउद्योजकांना मिळाले राष्ट्रीय व्यासपीठ_

सोलापूर, दि. २५ – आजच्या तरुणांनी नोकरीच्या संधींच्या पलीकडे जाऊन ‘नोकरी देणारे’ बनण्याचे प्रयत्न करावे. स्टार्टअप संस्कृती ही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची असून, सोलापूर शार्क टँक सारख्या उपक्रमांमुळे नव्या कल्पनांना व नव उद्योजकांना बळ मिळत आहे, विद्यापीठाने आयोजित केलेले सोलापूर शार्क टॅंक हे देशातील सर्व विद्यापीठांसाठी रोल मॉडेल असे मत एन टी पी सी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी जे सास्त्री यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन आणि रोपास जलसिंचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम फाउंडेशनच्या पुढाकारातून, सविष्कार इंडिया व स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 'सोलापूर शार्क टँक सिझन २ : नॅशनल स्टार्टअप फंडिंग स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी.जे.सी. सास्त्री, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, सोलापूर गारमेंट्स मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संचालक अमित जैन, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान सेवावर्धिनी पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देगावकर, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर, उद्यम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, साविष्कारचे राष्ट्रीय सहसंयोजक दीपक शर्मा आणि गुंतवणूकदार म्हणून प्रशांत राठी, विकास सोनी, आदित्य सोनी, आनंद झाड, विनोद शंकर, आशिष छाजेड, संतोष भंडारी, धीरेन गडा, आदी उपस्थित होते.

या दरम्यान दोन दिवसीय बूट कॅम्प चे ही आयोजन करण्यात आलेले यात विद्यार्थ्यांना स्टार्टअप इको सिस्टीम समजून घेणे आणि याचे महत्व, आयडिया डिझाईन आदी विषयात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवकल्पना परीक्षकांसमोर सादर केल्या. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या इंक्युबॅशन सेंटर कडून वर्षभर इनक्यूबेट केले जाणार आहे. या कार्यक्रमास परीक्षक म्हणून प्रभाकर जमखंडीकर सर, गिरीश देगावकर, डॉ अर्चना एंजल मॅडम, कट्टी सर, डॉ. वैशाली गुरगुडे, प्रा. राष्ट्रपाल गाडे आदी उपस्थित होते.

एन्क्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेचा उद्देश, पार्श्वभूमी आणि नवउद्योजकांना दिले जाणारे व्यासपीठ यावर सविस्तर प्रकाश टाकला. ‘शार्क टँक’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सनी सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, व्यवसाय मॉडेल्स आणि उत्पादनांची प्रभावी मांडणी केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार स्वावलंबी भारत अभियानचे जिल्हा संयोजक विनायक बंकापूर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्यम फाउंडेशनचे व्यवस्थापक नितीन माळी, ऋतुजा गायकवाड, प्रशांत नळे, बसवेश्वर सुतार, अभाविप महानगर मंत्री अनघा जाधव, ओम इंगळे, शिवरत्न पवार, पूनम दुर्गम, सोनल गुंटूक, प्रतीक भालके, शुभम माने, कृष्ण लामगुंडे, शीतल सग्गम, भार्गवी बाइनि, सृष्टी थोरात आदींनी मेहनत घेतली.

चौकट:
*नवउद्योजकांच्या प्रकल्पात लाखोंची गुंतवणूक*
या स्पर्धेमुळे स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांना गुंतवणूकदारांसमोर आपली कल्पना सादर करण्याची संधी मिळाली. अनेक नवउद्योजकांनी तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा आणि सामाजिक क्षेत्रातील अभिनव संकल्पना मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यामधून टेंड्रिल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड -१२.५ लाख, नुव्हीयाटेक -१२.५ लाख, कॉल रिंगर्स -१२.५ लाख, वॉटर फॉल ऍटोमेशन प्राइवेट लिमिटेड -१२.५ लाख, अथाग्रो एल एल पी-२५ लाख, ग्रीन वॉरिअर -८० लाख आणि अनुकृषी - ५० लाख रुपये गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली आहे.

Solapur Shark Tank..2.O
25/03/2026

Solapur Shark Tank..2.O

सोलापूरकर..आपल्या शहरातील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकतेच्या लाटेत सहभागी व्हा. 'सेवावर्धिनी', 'पुण्यश्लोक अहिल्यादेव...
23/03/2026

सोलापूरकर..आपल्या शहरातील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकतेच्या लाटेत सहभागी व्हा. 'सेवावर्धिनी', 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' आणि 'स्वावलंबी भारत अभियान' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक अभिनव उपक्रम -'सोलापूर शार्क टँक २.०'!

जर तुमच्याकडे नवीन व्यावसायिक कल्पना असेल, तर हे व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे. चला, सोलापूरला उद्योजकतेचे केंद्र बनवूया!

🗓️ दिनांक: २५ मार्च २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ४:३० वा.
📍 स्थळ: मुख्य सभागृह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

समुद्राच्या अथांग लाटांवर ज्यांची नजर, अशा भारतीय तटरक्षक दलाला मानाचा मुजरा! भारतीय तटरक्षक दिन. ⚓🇮🇳
01/02/2026

समुद्राच्या अथांग लाटांवर ज्यांची नजर, अशा भारतीय तटरक्षक दलाला मानाचा मुजरा! भारतीय तटरक्षक दिन. ⚓🇮🇳

शौर्याचा महामेरू पहिले परमवीर चक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🇮🇳💐 #शौर्यगाथा  #भारती...
31/01/2026

शौर्याचा महामेरू पहिले परमवीर चक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🇮🇳💐

#शौर्यगाथा #भारतीय_लष्कर #अभिवादन

आज 26 जानेवारी 2026 रोजी सोलापुरात हरिभाई देवकरण शाळेच्या मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सेवावर्धिनी...
26/01/2026

आज 26 जानेवारी 2026 रोजी सोलापुरात हरिभाई देवकरण शाळेच्या मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सेवावर्धिनी चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर यांच्या हस्ते स्वदेशी संकल्प देण्यात आला. यावेळी इंडियन मॉडेल स्कूल, ज्ञान प्रबोधिनी शाळा, हरिभाई देवकरण प्रशाला, हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय, नूतन मराठी विद्यालय प्राथमिक शाळा, नुमवी शिशू शाळा, SPM शाळा, पानगल शाळा, संगमेश्वर विद्यालय, सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, हिंदुस्थान कॉन्वेंट आदी शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थिती
10+ शाळा
750+ विद्यार्थी
200+ पालक
100+ शिक्षक

#प्रजासत्ताकदिन #२६जानेवारी #भारतीय #जयहिंद #वंदेमातरम

Address

हरिभाई देवकरण प्रशाला
Solapur
413002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918983040108

Alerts

Be the first to know and let us send you an email when उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर जिल्हा:

Share