Shri Siddheshwar Foundation

Shri Siddheshwar Foundation श्री सिद्धेश्वर फाउंडेशन - वचनातून आचरणाकडे 🙏🏼

51 tree plantation on 4th September
02/09/2026

51 tree plantation on 4th September

51 tree plantation
02/09/2026

51 tree plantation

11 tree plantation
02/09/2026

11 tree plantation

आज शनिवार दिनांक २९ ॲागस्ट २६ रोजी, श्री सिद्धेश्वर फाउंडेशन तर्फे, अनाथ, एकल पालक व गरजू मुलींना,जिल्हा परिषद मुलींची श...
29/08/2026

आज शनिवार दिनांक २९ ॲागस्ट २६ रोजी, श्री सिद्धेश्वर फाउंडेशन तर्फे,
अनाथ, एकल पालक व गरजू मुलींना,
जिल्हा परिषद मुलींची शाळा, विडी घरकुल येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अशाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होण्यासाठी बळ मिळावे हीच श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना 🙏

🌳होटगी रोड, विमानतळ परिसरातील,श्री अमोगसिद्ध डेअरीचे मालक,विकास अमोगसिद्ध बिराजदार यांचा मुलगा ‘श्रीअंश ‘ याच्या प्रथम ज...
27/08/2026

🌳होटगी रोड, विमानतळ परिसरातील,
श्री अमोगसिद्ध डेअरीचे मालक,
विकास अमोगसिद्ध बिराजदार यांचा मुलगा ‘श्रीअंश ‘ याच्या प्रथम जन्मदिनानिमित्त श्री सिद्धेश्वर फाउंडेशनला वृक्षारोपणासाठी ११ रोपं भेट देण्यात आली.🌳

या शुभ कार्यासाठी विकास यांचे अभिनंदन, त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी असलेल्या या ईश्वरीय कार्यात सहभागी होऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. असेच कार्य त्यांच्याकडून वारंवार होत राहो हीच श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना 🙏💐

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन कडून जानकी नगर, जुळे सोलापूर येथे वड आणि शमीचे झाड लावले आहे.सोलापूर मनपा सभागृह नेते आणि नगरसे...
26/08/2026

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन कडून जानकी नगर, जुळे सोलापूर येथे वड आणि शमीचे झाड लावले आहे.
सोलापूर मनपा सभागृह नेते आणि नगरसेवक श्री नरेंद्र काळे व नगरसेवक श्री जंगम आणि जानकी नगर वासियांनी या कार्याचे कौतुक केले.
तसेच या झाडांना कट्टा करून येणारा दसरा या शमीवृक्षाजवळ साजरा करण्याचे आश्वासन श्री नरेंद्र काळे यांनी दिले. 🌳🙏🌳

राम कृष्ण हरी 🙏श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या मार्गदर्शक,डॅा माधवी रायते,माजी डीन, अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी,अध्यक्षा, ...
26/08/2026

राम कृष्ण हरी 🙏
श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या मार्गदर्शक,

डॅा माधवी रायते,
माजी डीन, अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी,
अध्यक्षा, आनंदश्री प्रतिष्ठान,
यांना,

संपूर्ण गीता 18 अध्याय कंठस्थीकरण परीक्षेत 95% गुणासह अत्युत्तम श्रेणी मिळून गीतावृती ही पदवी मिळाली.
आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐🌹
लवकरच आपणांस 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या वयात पण आपली अभ्यासू वृत्ती जागृत आहे. आधीपासूनच देवकृपेने आपण सर्व क्षेत्रात नंबर 1 आहातच.
ज्याला आपण स्पर्श करता त्याचे सोने होते, असा परीसस्पर्श आपल्याला लाभला आहे.
आपल्या या आनंदात सहभागी होताना आम्हांस खूप आनंद होत आहे.
असेच अनेक आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येवोत. अनेक उत्तमोत्तम कार्ये आपल्याकडून होवोत, आपणांस उत्तम आरोग्य लाभो हीच श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना 🙏💐🌹🌳🌲🙏

राम कृष्ण हरी 🙏 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 श्री सिद्धेश्वर फाउंडेशन कडून,रविवार 23 ॲागस्ट ला, जुळे सोलापूर, विजापूर रोड येथे माजी सैन...
26/08/2026

राम कृष्ण हरी 🙏 🇮🇳 जय हिंद 🇮🇳
श्री सिद्धेश्वर फाउंडेशन कडून,
रविवार 23 ॲागस्ट ला, जुळे सोलापूर, विजापूर रोड येथे माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृह येथे 51 फुलांची व फळांची झाडे लावण्यात आली.
सर्व मुलींना ही झाडे दत्तक दिली आहेत. झाडे जगविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
🇮🇳 🌳🪴🌴🌲🎄

राम कृष्ण हरी 🙏श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या या शैक्षणिक मदतीच्या चेक प्रदान कार्याची दखल सोलापूरच्या दैनिक सुराज्य नी घे...
22/08/2026

राम कृष्ण हरी 🙏
श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या या शैक्षणिक मदतीच्या चेक प्रदान कार्याची दखल सोलापूरच्या दैनिक सुराज्य नी घेतली आहे. 🙏💐🌹

श्री सिद्धेश्वर महाराज की जय 🙏एक मुलगी ही पूर्व भागातील असून Computer Science मधे 3 rd year B tech करत आहे.तिचे वडील सुन...
20/08/2026

श्री सिद्धेश्वर महाराज की जय 🙏
एक मुलगी ही पूर्व भागातील असून Computer Science मधे 3 rd year
B tech करत आहे.
तिचे वडील सुनील सर्जे सरांचे जुने तबल्याचे विद्यार्थी आहेत.
पत्र्याच्या घरात भाड्याने राहतात, MIDC मधे मजुरी करतात.
ही मुलगी SBC असल्यामुळे वार्षिक ₹8163/- फी भरायची होती.
आपण तिला थोडेफार शैक्षणिक साहित्य दिले आहे.
माझ्या एका बालमित्र तथा वर्गमित्राने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर त्या मुलीची संपूर्ण फी भरली आहे.
त्यामुळे एका गरजू मुलीला शिक्षणासाठी मदत होत आहे. आज गुरुवार आहे, तो मित्र त्या मुलीला गुरूच्या रूपात भेटला आहे.
आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे 🙏
अशाच मुलांसाठी मदत करण्यासाठी माझ्या बालमित्राला खूप बळ मिळावे हीच,
श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना 🙏

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddheshwar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share