07/03/2026
🌳🌱🌿🌴🌲🌵🎄🍀🪴🎋🍃
*जाहीर आवाहन*
सिन्नर घोटी महामार्गावरील आई भवानी डोंगरावर वनप्रस्थ फाउंडेशन नऊ वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धन करीत आहे.
आतापर्यंत येथे सुमारे अकरा हजारापेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली असून लागवड केलेल्या प्रत्येक झाडाला ठिबक सिंचन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.
याठिकाणी २/३ वर्षातून आग लागण्याचे प्रकार घडत असतात.
वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील करण्यात येते. अलीकडेच वनप्रस्थ फाउंडेशनच्या प्रेरणेतून सोनांबे गावातील तरुणांनी, आई भवानी वृक्षमित्र संस्थेची स्थापना केली असून त्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे देखील सहकार्य वनप्रस्थला लाभत आहे.
मात्र यावेळी लागलेली आग ही अतिशय भयंकर होती. झाडे लागवड केलेल्या जागेच्या चोहोबाजूंनी आलेल्या या ज्वाळांनी वन विभागाच्या वतीने लागवड केलेल्या सुमारे ३/४ हजार झाडांच्या सोबतच, वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने लागवड केलेल्या झाडांपैकी सुमारे ५००० झाडाना देखील भस्मसाद केले.
परिसरातून उठणाऱ्या ज्वालांमुळे ससे, छोटे प्राणी आणि असंख्य पक्षी देखील सैरभर पळत होते.
संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सोबतच परिसरातील नागरिका धावून आल्याने, या सर्वांच्या मोठ्या प्रयत्नानंतर सुमारे ६००० झाडांना वाचविण्यात यश आले.
मात्र यात मुख्य पाईपलाईन सह ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणावर जळून भस्मसाद झाले.
*तरी आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की, वृक्ष संवर्धनासाठी शक्य ती मदत करावी.*
🌳🌱🌿🌴🌲🌵🎄🍀🪴🎋🍃
- : आपले :-
*वनप्रस्थ फाउंडेशन, सिन्नर ( नाशिक )*
🌼🌸🌺🪷🪻🥀🌷🌹🌻💐🍁
*आमचे वनप्रस्थ फाउंडेशनचे प्रकल्प*
१. *वनराई, आई भवानी डोंगर -* ७५ पेक्षा अधिक प्रजातींच्या ११,००० पेक्षा अधिक रोपांची लागवड.
२. *देवराई, ऑक्सिजन पार्क -* ११९ प्रजातींच्या सुमारे १००० रोपांची लागवड *( नगरपरिषदेच्या ओपन स्पेस मध्ये साकारण्यात आलेली महाराष्ट्रातील पहिली देवराई )*
३. *वसुंधरा देवराई -* ११९ प्रजातींच्या सुमारे ९०० रोपांची लागवड *(पुणे येथील देवराई फाउंडेशन यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली महाराष्ट्रातील १०० वी देवराई. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन)*
४. *गणेशवन प्रकल्प -* सिन्नर नगर परिषदेच्या १७ गुंठ्याच्या ओपन स्पेस मध्ये साकारण्यात आलेला सुमारे २५०० झाडांचा प्रकल्प. *सिन्नर नगरपालिकेच्या ओपन स्पेस मध्ये साकारण्यात आलेला पहिलाच मीयावाकी प्रकल्प.* रोटरी क्लब ऑफ नासिक आणि रिंग प्लस ऍक्वा यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून साकारण्यात आलेला प्रकल्प.
५. *अंबिका वन प्रकल्प -* मुसळगाव एमआयडीसी येथे रोटरी क्लब ऑफ नासिक आणि रिंग प्लस ऍक्वा यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आणि STICE च्या सहकार्याने साकारण्यात आलेला *४००० झाडांचा घनवन प्रकल्प.*
६. *अरण्यऋषी, पद्मश्री, स्व . मारुती चितमपल्ली स्मृती वन (मारुती वन) -* मुसळगाव एमआयडीसी येथे रोटरी क्लब ऑफ नासिक आणि रिंग प्लस ऍक्वा यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आणि STICE व मुसळगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने साकारण्यात आलेला *२५०० झाडांचा घनवन प्रकल्प.*
*इतर प्रकल्प* - बाराद्वारी (दशक्रिया विधीचे ठिकाण), स्मशानभूमी, त्याच प्रमाणे क्रमाक्रमाने सिन्नर शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांवरील दुभाजकांच्या मध्ये देखील वृक्षारोपणाचे काम सुरू आहे.
🌳🌱🌿🌴🌲🌵🎄🍀🪴🎋🍃
*आमची वैशिष्ट्ये*
🌱२०१७ पासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था.
🌱आतापर्यंत सुमारे २१००० पेक्षा अधिक रोपांची लागवड.
🌱आपली नोकरी व्यवसाय सांभाळून दररोज सुमारे दोन तासांचे श्रमदान.
🌱सुमारे १५/२० नियमित कार्यकर्त्यांची टीम.
🌱लागवड केलेल्या रोपांची १००% जोपासना.
🌱प्रत्येक रोपाला पाणी पुरवठा करण्याचे सूक्ष्म नियोजन.
🌳🌱🌿🌴🌲🌵🎄🍀🪴🎋🍃
-: आपले :-
*वनप्रस्थ फाऊंडेशन*
सिन्नर, जि. नाशिक
--------------------------------------------------------
*नोंदणी क्रमांक:-F - 18555/NSK/SNR*
*वेबसाईट-*
http://www.vanaprastha.org.in
*फेसबुक पेज-*
https://www.facebook.com/pageVanaprasthaFoundation
*इंस्टाग्राम पेज-*
https://www.instagram.com/vanaprastha_foundation?igsh=MWJ1ZzlmajFsYjJsYw==
*युट्यूब चॅनल*
https://youtube.com/
*मदत करण्यासाठी-*
Phone Pay Number
*9545027777*
---------------------------------------------------------
*संस्था 12A, CSR 1 प्रमाणपत्र प्राप्त असून देणगीदारांना आयकर विभागाच्या कलम 80G नुसार आयकारातून सूट मिळते.*