Ummati Social Welfare Society

Ummati Social Welfare Society Helping the needy, orphans, helpless, widows through Social work.

दिव्यांग (अपंग) व्यक्तींना साहित्य वाटप शिबिर
18/03/2026

दिव्यांग (अपंग) व्यक्तींना साहित्य वाटप शिबिर

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेतील श्रीरामपू...
04/06/2025

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेतील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 68 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन शिबीर उम्मती फाउंडेशन तर्फे नुकताच करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. मुबारक कापडी यांनी करीयर विषयी विदयार्थी व पालकांना मार्गदर्शन देखील केले
उम्मती फाउंडेशनचे प्रमुख सोहेल बारूदवाला यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक वाचनालय, श्रीरामपूर येथे सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणुन मा. जिल्हा उपशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, योगशिक्षक आनंद वाघ सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पुरनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुफ्ती रिजवान चतुर्वेदी यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना मुफ्ती म्हणाले, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.तौफिक शेख यांनी उम्मती फाउंडेशनच्या आजमितीपर्यंतच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पटारे मॅडम यांनी दहावी-बारावी नंतरच्या करीयरच्या विविध संधी सविस्तर सांगुन पालकांनादेखील विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यास आवर्जुन सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. कापडी म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वत:शीच स्पर्धा करायला हवी. आमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला आहे का, याचेही आत्मपरीक्षण करायला हवे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच कमी गुण मिळवलेल्या मुलांनाही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मेढे साहेब व सोळंके साहेब यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडीयाचा मर्यादीत वापर करण्याचा अनमोल सल्ला दिला. तसेच वाघ सर यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुही सय्यद व ॲड. आरीफ शेख यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पठाण सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहानवाज गुलाम , असलम सय्यद, इरफान शेख, समीर शेख, ईसाक शेख, युसूफ लखाणी, शाकीफ शेख, अलीम बागवान, डॉ. सुदर्शन रानवडे, डॉ.अहतेशाम शेख, फारूक मेमन, आर. सोहेल, वसीम जहागिरदार, शाहरुख बागवान, माजिद मिर्जा आदींनी प्रयत्न केले. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे यंदाही 'उम्मती फाउंडेशन' च्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्...
30/05/2025

सालाबादप्रमाणे यंदाही 'उम्मती फाउंडेशन' च्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने *रविवार दि. 1.06.2025 रोजी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक वाचनालय, मेनरोड, श्रीरामपूर* येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रख्यात वक्ते डॉ. मुबारक कापडी प्रमुख पाहुणे करियर मार्गदर्शन देखील करणार आहेत. तरी सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पालकांनी व विद्यार्थांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी खालील पॅम्प्लेटचा उपयोग करावा.

*उम्मती 'च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*उम्मती फाउंडेशन व रॉयल मॅरेज ब्युरो,श्रीरामपूर यांच्या संयुक्त व...
24/02/2025

*उम्मती 'च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*

उम्मती फाउंडेशन व रॉयल मॅरेज ब्युरो,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुस्लिम वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मुस्लिम समाजातील थोर सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पै. रफिकभाई शेख टीसी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सुमारे 550 इच्छुक वधू-वरांनी सहभाग नोंदवुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याचे उद्घाटन धर्मगुरु मुफ्ती रिजवान यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉ. वसंतराव जमधडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नजीरभाई शेख, सरवरली सय्यद, पत्रकार प्रविणकुमार आहेर, सलीम पठाण सर, जोएफ जमादार, इब्राहिम शेख, सलीम शेख उपस्थित होते. या मेळाव्यात जवळपास 550 वधू-वर यांची नोंदणी झाली असून मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित होता. विशेष म्हणजे या मेळाव्यातच एक लग्न सुद्धा साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी उम्मतीचे सचिव डॉ.तौफिक शेख यांच्या वतीने दिव्यांगांसाठी व्हील चेयरचे वाटप देखील करण्यात आले.
उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी प्रास्ताविकात मुस्लिम वधू- वर मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली तसेच या मेळाव्यातून जमलेल्या निवडक लग्नासाठी संस्थेतर्फे आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन दिले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना मुफ्ती रिजवान यांनी यांनी इस्लाम धर्मात सर्वात पवित्र हा विवाह संस्कार असून मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींसाठी फक्त श्रीमंत मुलगा एवढाच विचार न करता चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, कर्तृत्ववान मुलगा पाहावा, असे सांगत मुस्लिम मधे सय्यद बागवान, मणियार हे सर्व एकच असुन यांच्यात भविष्यात आपापसात लग्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. जमधडे यांनी आजच्या सोशल इंजिनिअरिंगच्या व्यस्ततेच्या काळात पालकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी व आपल्या पाल्याला अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी सर्वधर्म वधू-वर सूचक मेळावे अत्यावश्यक असल्याचे सांगितले तसेच मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल उम्मतीचे कौतुक केले. पत्रकार आहेर यांनी प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला जवळचे स्थळ मिळावे, असे वाटते. आपल्या जिल्ह्यात मुस्लिम समाज विखुरलेला असताना जिल्ह्यात पहिल्यांदाच हा मेळावा घेतल्याने विशेष आनंद वाटले असे सांगितले. रॉयल मॅरेज ब्युरोचे अध्यक्ष कलीम शेख व नदीम शेख यांनी उपस्थित पालकांना व इच्छुक वधू वरांना मार्गदर्शन केले.
अ‍ॅड. आरीफ शेख यांनी सूत्रसंचालना बरोबरच मेळाव्यात उपस्थित असलेल्या पालकांना कौटुंबिक न्यायनिवाड्या संदर्भात मोफत मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी आभार मानले. मेळावा यशस्वितेसाठी शहानवाज गुलाम, असलम सय्यद, युसूफ लाखाणी, इसाक शेख, आर सोहेल, समीर शेख, माजिद मिर्जा आदींनी पुढाकार घेतला.

20/02/2025
19/02/2025

उम्मती फाउंडेशन और रॉयल मैरेज ब्यूरो श्रीरामपूर इनके जानिबसे

मुस्लिम रिश्तो के बुनियादी शखसियत मरहूम जनाब हाजी शेख रफिक नुरमोहम्मद (टी सी साहब )इनके याद मे हम उन्हे खिराजे अकिदत पेश करते हुए

उम्मती फाउंडेशन और रॉयल मैरेज ब्यूरो श्रीरामपूर इनके जानिबसे मुस्लिम रिश्तो के बुनियादी शखसियत मरहूम जनाब हाजी शेख रफिक ...
12/02/2025

उम्मती फाउंडेशन और रॉयल मैरेज ब्यूरो श्रीरामपूर इनके जानिबसे

मुस्लिम रिश्तो के बुनियादी शखसियत मरहूम जनाब हाजी शेख रफिक नुरमोहम्मद (टी सी साहब )इनके याद मे हम उन्हे खिराजे अकिदत पेश करते हुए

मुस्लिम रिश्तो का जलसा 2025

बरोज इतवार 23 फरवरी 2025 को सुबह 10 से शाम 4 तक
ब मुकाम *खासदार गोविंदराव आदिक अँग्लो उर्दू हायस्कूल वार्ड नं 2, जामा मस्जिद के पीछे, श्रीरामपूर **,

जो लोग अपने और अपनो के लिए
शादी के लिए रिश्ता तलाश कर रहे है, कुंवारे और तलाकशुदा ऐसे सभी रिशतो के लिये हजरात और मा बहेनोको इस जलसेमे,अपने और अपनो के लिए रिश्ते तलाश करने का सुनहरा मौका है,,

इस जलसे में किसी भी तरह की फीज नहीं ली जायेगी और आते वक्त आप का आधार कार्ड और दो फोटो,और बायोडाटा लाना जरूरी है.

राब्ता करे -

कलीम शेख
8055274030

फिरोज पठाण
9273831398

शाहनवाज गुलाम
9922214813

युसुफ मेमन
7020592622

जेरे निगरानी
सोहेल शेख (बारूदवाला )
डॉ. तौफिक शेख
असलम सय्यद

🔹 फॅमिली कोर्ट मॅटर के लिये ॲड.आरीफ शेख इनके जरीये से मुफ्त सलाह दी जायेगी

Address

Kazibaba Road, Ward No 02
Shrirampur
413709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ummati Social Welfare Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share