श्री इच्छापूर्ती गणपती भक्त परिवार

  • Home
  • India
  • Shorapur
  • श्री इच्छापूर्ती गणपती भक्त परिवार

श्री इच्छापूर्ती गणपती भक्त परिवार श्री इच्छापूर्ती गणपती भक्त परिवार ए?

श्री इच्छापूर्ती गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट -धर्मवीर तरुण मंडळाची विलोभनीय गणेश मूर्ती पुण्यातील मध्यवर्ती भागातील गणेशभक्तांचे लाडके आराध्य-दैवत म्हणून आपणास ओळखता येईल. धर्मवीर तरुण मंडळ म्हणजे गुरुवार पेठेचा गौरवाभिमानच म्हणता येईल. दरवर्षी पुण्यातील मध्यवर्ती भागातील आणि संपूर्ण पुण्यातून असंख्य भक्त ह्या श्री इच्छापूर्ती गणपतीच्या दर्शनाला येतात.

श्री इच्छापूर्ती गणपती सार्वजनिक ग

णेशोत्सव मंडळ ट्रस्ट, व्यवस्थापक: धर्मवीर तरुण मंडळ हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे ओळखली जाते. मंडळाला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

मंडळाची स्थापना संस्कृती संवर्धनातून तसेच त्याकाळच्या धर्मवेड्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. लोकमान्य टिळकांनी,लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजिनिक उत्सवाचे स्वरूप दिले होते, हाच उद्देश समोर ठेऊन धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्टने पुण्यातील मध्यवर्ती भागात अधिक उत्साहाने आणि प्रखरतेने कार्यास सुरुवात केली ज्यातून सर्वाधिक लोकप्रियतेचे आणि आदराचे स्थान मंडळाला मिळाले.त्याकाळी दरवर्षी आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

२००४-२००५ साली धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्ट व्यवस्थापनाची जबाबदारी युवराज पेटकर,गिरीष भोईटे,श्रीकांत पेटकर,अतुल भिंगारकर,आणि त्यांच्या मित्रमंडळींवर येऊन पडली .वरील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मंडळींनी हा उत्सव अत्यंत चोखपणे पार पाडला. आणि त्यानंतर ट्रस्टने कधी मागे वळून पाहिलेच नाही.

धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्टच्या अखत्यारीत त्यांनी कितीतरी सामाजिक कार्यांचा प्रारंभ केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेकडो टन अन्नधान्य वाटप, वंचित मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत, अन्नदान, तसेच मंदिरातले धार्मिक विधी थाटामाटाने साजरे करत असतानाच गणेश उत्सवात देखाव्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांकडे भक्तांचे/ पुणेकरांचे लक्ष वेधले.

आज श्री इच्छापूर्ती गणपतीच्या आशीर्वादाने ’धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्ट’ शाताब्दीकडे अतिशय उत्साहाने वाटचाल करीत आहे.

Address

90 Guruwar Peth
Shorapur
585216

Telephone

+918007221818

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री इच्छापूर्ती गणपती भक्त परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share