20/09/2025
नंदुरबार राष्ट्रवादीकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध आंदोलन...
शहाद्यात प्रतिमेला चपला मारून केला निषेध..
शहादा : नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या मार्फत जिल्हाध्यक्ष एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शहादा येथे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यांच्या प्रतिमेला चप्पल- जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या विषयी अश्लील व घाण भाषेमध्ये उल्लेख केला. आमदार पडळकर यांच्यासारख्या वाचाळविरांमुळे महाराष्ट्राच्या चांगल्या राजकीय परंपरेला तडा जात असून महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते. परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्रर पवार नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे. असे आव्हान कार्यकर्त्यांनी केले. गोपीचंद पडळकर नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा या वेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एन डी पाटील, प्रदेश सचिव शांतीलाल साळी, युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲड. दानिश पठाण, युवती जिल्हाध्यक्षा कविता सोलंकी, माजी नगरसेवक मुज्जु , पहेलवान झुल्फेखार पठाण कैलास महिरे, कांतिलाल पावरा, रमेश पावरा, अजित वळवी, किर सोनवणे, नगिण पाटील, मंदाकिनी रामराजे, कैलास सोनार, विपुल तिरमले यांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.