Omkar Foundation wafoli Banda

Omkar Foundation wafoli Banda aim to protect biodiversity

13/01/2026

*आतातरी बेसुमार वृक्षतोड थांबेल काय?*

परवा कोलझरमध्ये जे घडलं ते खरोखरच ऐतिहासिक आहे.
गावातील मुख्य देवस्थानासमोर एकत्र येऊन संपूर्ण गावाने शपथ घेतली.
*"आम्ही आमची एक इंचही जमीन कुणालाही विकणार नाही"*

अशी शपथ घेऊन सांवतवाडी दोडामार्गसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाललेल्या जमीन खरेदी व्यवहाराच्या गोरखधंद्याला त्यांनी जणू आवाहनच दिलं आहे.

स्थानिक राजकीय क्षेत्रातील जमीन दलालांच्या सहाय्याने शंभर दिडशे एकर जमिनी दिल्लीतील धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या षडयंत्राला या निमित्ताने खीळ बसेल असा विश्वास आहे.

कोलझर मधील युवावर्गाचे विशेष कौतुक आहे.त्यांनी एकजुट दाखवली म्हणूनच हे शक्य झाले.

जे कोलझरमध्ये घडलं ते सह्याद्री पट्ट्यातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात घडण्याची आज गरज आहे.

माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील तेरा गावांमध्ये वृक्षतोड बंदी लागू असताना बेसुमार वृक्षतोड आजही चालू आहे.

कोलझर प्रमाणेच सरमळे,कळणे,फुकेरी ही वृक्षतोडीची उदाहरणे आहेत.

कोलझर मधील शपथ प्रत्येक गावागावातील देवदेवतांसमोर घेतली जावी आणि ही राक्षसी जमीन खरेदी बंद व्हावी हीच श्री देव पाटेकराकडे प्रार्थना 🙏

डॉ जयेंद्र परुळेकर

माझो कोकणी मालवणी माणूस जागो होताहा
12/01/2026

माझो कोकणी मालवणी माणूस जागो होताहा

12/01/2026

आता बोला काय बोलताय?

12/01/2026
आता थांबायचं नाही वाफोली विलवडे गावातील क्वारी क्रेशर बंद झालेच पाहिजे.
07/01/2026

आता थांबायचं नाही वाफोली विलवडे गावातील क्वारी क्रेशर बंद झालेच पाहिजे.

06/01/2026

बांदा वाफोली रोड वर हे एवढे काळ्या दगडाची वाहतूक होत असते दिवस रात्र. या अवजड व्हानान मुळे वायू प्रदूषण तर होतेच त्याशिवाय इथल्या शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन शाळेत ये जा करावी लागते. वयोpवृद्ध गटातील वृद्ध लोकांचेही तसेच आहे. तर भर्धाव धावणाऱ्या या डंपर मुळे मोटारसायकल, सायकल वाल्यांच्याही जीवितास धोखा निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी झोपेचं सोंग पांघरून आहेत, पोलीस प्रशासनही मूग गिळून आहे, परिवहन खात्याचा तर यांना पूर्ण पणे आशीर्वाद आहे. अश्या वेळी सामान्य माणसाला काहीच किंमत राहिली नाही किंबहुना त्याची काहीच लायकी उरली नाही.
लवकरच जण आंदोलन उभ करीत आहोत.

कोकणात जे परप्रांतीय आलेत ते फक्त कोकण संपवायला...
04/01/2026

कोकणात जे परप्रांतीय आलेत ते फक्त कोकण संपवायला...

महाराष्ट्र राज्य शासनाचे अपयश.
30/12/2025

महाराष्ट्र राज्य शासनाचे अपयश.

केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सरकारने कोकणचा सत्यनाशाच करायचं ठरवला आहे. पण आम्ही तस होऊ देणार नाही मग त्यासाठी जीव गेला...
27/12/2025

केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सरकारने कोकणचा सत्यनाशाच करायचं ठरवला आहे. पण आम्ही तस होऊ देणार नाही मग त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तरं.

मित्रांनो "अभि नाही तो कभी नाही " आता तरी जागेव्हा नाहीतर भविष्यात नुसता अंधार आहे.
27/12/2025

मित्रांनो "अभि नाही तो कभी नाही " आता तरी जागेव्हा नाहीतर भविष्यात नुसता अंधार आहे.

Address

Gunesh Mahadeo Gawas
Savantvadi
416511

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Foundation wafoli Banda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share