AWARD Organisation

AWARD Organisation AWARD is not for profit Social organization is formed in the year 2001, Its mission is to work for a sustainable and inclusive development of Society.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास प्रकल्प 2.0 गुहागर प्रकल्प क्र. 6 साठी अवॉर्ड संस्था उपजीविका संसाधान संस्था ...
03/08/2026

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास प्रकल्प 2.0 गुहागर प्रकल्प क्र. 6 साठी अवॉर्ड संस्था उपजीविका संसाधान संस्था (LRA) म्हणून कार्यरत आहे. दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी शीर ता. गुहागर जि. रत्नागिरी येथे स्वयंसहाय्यता गटातील महिला प्रशिक्षणार्थी यांचेसाठी उपजीविका कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात ग्रामीण उपजीविका, शासकीय योजना, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

२०२६ हे वर्ष अवार्ड संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सन २००१ पासून सुरु केलेले हे समाजपरिवर्तनाचे कार्य यापुढेही अखंड सु...
27/07/2026

२०२६ हे वर्ष अवार्ड संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सन २००१ पासून सुरु केलेले हे समाजपरिवर्तनाचे कार्य यापुढेही अखंड सुरूच राहणार आहे. आज दैनिक लोकमत, सातारा यांनी संस्थेच्या समाजिक कार्याची दखल घेत संस्थेची कार्याची माहिती प्रकाशित केली त्याबद्दल लोकमत परिवाराचे मनपूर्वक आभार. पत्रकार श्री. संजय कदम यांनी याबाबत सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार

सातारा जिल्ह्यातील परळी विभागात गेल्या ५ वर्षांपासून अवॉर्ड संस्था डोंगरालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत पर्यायी उपजीविक...
26/07/2026

सातारा जिल्ह्यातील परळी विभागात गेल्या ५ वर्षांपासून अवॉर्ड संस्था डोंगरालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत पर्यायी उपजीविकेचा यशस्वी प्रयोग राबवत आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांची पिके रानडुक्कर, माकडे, गवे व इतर जंगली प्राण्यांकडून वारंवार नष्ट होत असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून अवॉर्ड संस्थेने शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्याचा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १५० हून अधिक शेतकऱ्यांना २,५०० पेक्षा अधिक आंबा, चिकू, पेरू, जांभूळ आदी फळवर्गीय रोपांचे वितरण करण्यात आले आहे. केवळ रोपांचे वितरण न करता, शास्त्रीय प्रशिक्षण, लागवडीनंतर नियमित क्षेत्रभेटी, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे कामही करण्यात येत आहे.
या प्रयत्नांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आज फळबागा बहरत असून, त्यांना स्थिर व शाश्वत उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होत आहे.
यावर्षीही या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून ४६ शेतकऱ्यांना ८८० फळवर्गीय रोपांचे वितरण करण्यात आले. भविष्यातही अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवून शाश्वत शेती आणि सुरक्षित उपजीविकेचा मार्ग मजबूत करण्यासाठी अवॉर्ड संस्था कटिबद्ध आहे.
🌿 फळबाग म्हणजे केवळ झाडांची लागवड नव्हे, तर शेतकऱ्यांच्या भविष्याची लागवड आहे.
#शाश्वतशेती #फळबाग #शेतकरी

🌱 विषमुक्त शेतीकडे एक प्रभावी पाऊल! 🌱'दहा ड्रम थेअरी' ही विषमुक्त व शाश्वत शेतीसाठी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक संकल्...
21/07/2026

🌱 विषमुक्त शेतीकडे एक प्रभावी पाऊल! 🌱
'दहा ड्रम थेअरी' ही विषमुक्त व शाश्वत शेतीसाठी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक संकल्पना आहे. या पद्धतीद्वारे तयार होणाऱ्या जैविक निविष्ठा जमिनीची सुपीकता वाढविणे, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता बळकट करणे तसेच कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
अवॉर्ड संस्था शाश्वत व विषमुक्त शेतीच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असून, या अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पोगरवाडी, ता. जि. सातारा येथील प्रगतशील शेतकरी सौ. वैशाली शिंदे व श्री. अतिश शिंदे यांच्या सहकार्याने 'दहा ड्रम थेअरी' प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रकल्पाचे उद्घाटन विविध मान्यवर, कृषी तज्ञ आणि महिला शेतकरी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाले. हा उपक्रम शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात कमी खर्चात दर्जेदार जैविक निविष्ठा तयार करण्यास प्रोत्साहन देईल आणि विषमुक्त शेतीच्या चळवळीला नवी दिशा देईल.
🌾 चला, एकत्र येऊया... निरोगी माती – निरोगी पीक – निरोगी शेतकरी – निरोगी समाज या संकल्पनेला बळ देऊया!

AWARD Receives Prestigious Tifan Gaurav Award 2025The year 2026 marks the Silver Jubilee of AWARD Organisation. Over the...
28/04/2026

AWARD Receives Prestigious Tifan Gaurav Award 2025
The year 2026 marks the Silver Jubilee of AWARD Organisation. Over the past two decades, the organization has been actively working towards sustainable agricultural development in Western Maharashtra and the Konkan region through collaborations with Government, semi-government departments, Donor agencies and CSR-funded initiatives.
The organization focuses on providing agricultural extension services to landless and smallholder farmers, especially women farmers. It also promotes allied agricultural livelihoods, develops income-generating opportunities, supports the establishment of processing units, and facilitates market access for agricultural produce.
In recognition of its innovative and impactful work in agriculture, Tifan Foundation conferred upon the organization the prestigious state-level “Rural Development Ambassador” award 2025.
The award ceremony was held on Monday, April 27, in Pune. The award was presented by Hon’ble Agriculture Minister shri. Dattatray Bharne (Mama), in the presence of Agriculture Commissioner Shri.Suraj Mandhare, shri.Umesh Jadhav (Executive Editor, Sakal Agrowon), and other distinguished dignitaries.
The organization expresses its heartfelt gratitude to all office bearers of Tifan Foundation for this honor.

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष - २०२६ .. शेतात राबणा-या सर्व महिलांना सलाम ...
24/04/2026

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष - २०२६ .. शेतात राबणा-या सर्व महिलांना सलाम ...

उरमोडी धान्य महोत्सवाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादआंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून तसेच शाश्वत कृषी ...
22/04/2026

उरमोडी धान्य महोत्सवाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून तसेच शाश्वत कृषी विकास अभियानांतर्गत अवॉर्ड संस्थेतर्फे आयोजित उरमोडी धान्य महोत्सवाला सातारा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात सेंद्रिय व विषमुक्त शेतीमालाची समृद्ध रेलचेल पाहायला मिळाली.
महोत्सवाचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले व पंचायत समिती सदस्या शोभाताई लोटेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेच्या सचिव ॲड. नीलिमा कदम, बिजमाता निर्मला चव्हाण, अशा कदम व वैशाली शिंदे उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला थेट ग्राहक मिळावा आणि ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी सशक्त विक्रीव्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव सन २०१८ पासून सातारा येथे नियमितपणे आयोजित केला जात आहे. महोत्सवात इंद्रायणी, काळीसाळ, आंबेमोहर यांसारखे तांदूळ; लोकवण, खपली, केदार, सरबती गहू; दगडी व मालदांडी ज्वारी; शाळू, कांदा, देशी लसूण तसेच विविध कडधान्ये आणि ताज्या भाज्यांची विक्री करण्यात आली.
यासोबतच ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी येथील विविध फळे, तसेच ‘नाचणीचे गाव’ कुसुंबी येथील नाचणी व त्यापासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, पापड, गावरान लोणची, हळद यांनाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विक्रीसाठी आणलेला जवळपास सर्व शेतीमाल विकला गेल्याने सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तर एकाच छताखाली विषमुक्त शेतीमाल उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्राहकांनीही आनंद व्यक्त केला.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात एकूण सुमारे रुपये ६.५० लाखांचा शेतीमालाची विक्री झाली.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रकल्प संचालक किरण कदम, समन्वयक शैलेश भोसले, सुनीता बनसोडे, समृद्धी घडशी, आणि शरद कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

17/04/2026

आपले आरोग्य आपल्या हाती ... वर्षभराचे दर्जेदार विषमुक्त धान्य खरेदी करा उरमोडी धान्य महोत्सवातून ..

17/04/2026

आपला हक्काचा महोत्सव .. उरमोडी धान्य महोत्सव .. नक्की भेट द्या .

17/04/2026

Address

Pantacha Got, Sanket Complex , 1st Floor , Near Gite Building
Satara
415001

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919922641125

Alerts

Be the first to know and let us send you an email when AWARD Organisation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AWARD Organisation:

Shortcuts

Share