Kiraksal BMC

Kiraksal BMC Kiraksal Conservation project in Man taluka, Satara district, Maharashtra sets an example in biodiversity & Community conservation.

आदर्शगाव किरकसाल हे जैवविधिधेच्या संवर्धनासाठी कार्यशील आहे. माणदेशातील किरकसाल गावाने मागील काही वर्षांपासून ग्रामस्वच्छता, जलसंधारण, सिंचन, कृषी, यांसह निसर्ग-पर्यावरण स्नेही लोक विकासासाठी प्रगती केली आहे. किरकसाल वनक्षेत्रात ६१६ हेक्टर परिसरात आढळणारी जैवविविधता ही माळरानातील गवताळ कुरणांमध्ये आढळणाऱ्या आदर्श जैवविविधतेचे प्रतीक आहे. शालेय विद्यार्थीप्रती निसर्गाच्या सान्निध्यात आवड निर्माण

व्हावी व पर्यावरणविषयक विषयांवर गावात जनजागृती व्हावी हा या मागचा आमचा मानस आहे. Recognising the importance of preserving and protecting its biodiversity, Kiraksal village in Satara district has worked tirelessly towards improving the living conditions of not just its human inhabitants but also its birds, beasts and butterflies. Adarshgaon Kiraksal is active in conservation of biodiversity. Kiraksal Village in Mandesh has made progress in Village Sanitation, Cleanliness, Water Conservation, Irrigation, Agriculture, Nature-Environment Friendly People Development since last few years. The biodiversity found in the 616 hectare area of ​​the Kiraksal forest area epitomizes the ideal biodiversity found in the grasslands. Our intention behind this is to create interest and conservation in the proximity of nature to local communities, school students and create awareness in the village about environmental issues. Biodiversity of Kiraksal village
Birds - 193
Mammals - 16
Reptiles and Amphibians - 30
Butterflies - 67
floral Diversity - 200 +

07/08/2026
27/07/2026

किरकसालसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! 🌿🐺❤️

'किरकसाल: द रिटर्न ऑफ द वुल्फ' हा आपला माहितीपट ग्रीन हब फेस्टिव्हल २०२६, भोपाळ येथे प्रदर्शित झाला हा आपल्यासाठी केवळ एक documentary नसून सात वर्षांच्या मेहनत, जिद्द, संघर्ष आणि विश्वासाचा प्रवास आहे.

२०१९ मध्ये गावातून सुरू केलेल्या या संवर्धन उपक्रमात अनेक सामाजिक, राजकीय आणि स्थानिक अडचणी आल्या. पण गावातील जेष्ठ, महिला, तरुणांवर आणि समुदायावर ठेवलेला विश्वास आज या यशाच्या रूपाने समोर उभा आहे.

एकेकाळी नागपंचमी सारख्या उत्सवांच्या काळात होणारी शिकार पाहणारे हेच तरुण आज वन्यजीवांचे रक्षक बनले आहेत. ते वन्यजीवांचे निरीक्षण करतात, अधिवासांचे संरक्षण करतात, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करतात आणि निसर्गाशी सहअस्तित्वाचा संदेश देतात.

हा सन्मान प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक स्वयंसेवक, प्रत्येक युवक आणि या प्रवासात माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.

एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज भारतातील अनेक गांवासाठी प्रेरणा बनत आहे. याचा मला आनंद आहे... ही तर फक्त सुरुवात झाली आहे. 🌍💚

Maan taluka grasslands is wintering ground for critically endangered Lesser florican..needs step's towards Protection of...
19/07/2026

Maan taluka grasslands is wintering ground for critically endangered Lesser florican..needs step's towards Protection of Habitat.. 🌿

माणदेशतील गवताळ माळरानांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल पाऊल 🌿 🐺
10/07/2026

माणदेशतील गवताळ माळरानांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल पाऊल 🌿 🐺

राज्यातील गवताळ प्रदेश आणि पाणथळ क्षेत्रांमध्ये सरसकट वृक्षारोपण करण्याऐवजी त्या नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरु...

- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त माणदेशातील किरकसाल या डोंगराळ गावात लांडगा आणि पट्टेरी तरस यांसह ६०६ प्रजातींची नोंद झाली...
22/06/2026

- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त माणदेशातील किरकसाल या डोंगराळ गावात लांडगा आणि पट्टेरी तरस यांसह ६०६ प्रजातींची नोंद झाली आहे.🌿🐺
- या प्रकल्पात वन्यजीवांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप प्रयोगांचा वापर करण्यात आला आणि भू-वापराचे नमुने निश्चित करण्यासाठी पाच वर्षांच्या डेटाचे जीआयएस मॅपिंग करण्यात आले.
- ग्रामपंचायत आणि वन विभागाच्या सहकार्याने, या गावाने येथील गवताळ प्रदेश, झुडपी प्रदेश आणि खुल्या-मोकळ्या अधिवासांमध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी वृक्षतोड, वणवे आणि शिकार यांवर तिहेरी बंदी लागू केली आहे.

Kiraksal, a small village in Maan taluka, Satara district of Maharashtra, is known for its dense scrublands. According to the village elders, this area was once a thriving grasslands ecosystem, home to blackbucks and chinkaras. After the 1950s, ungulate species gradually became locally extinct in th...

किरकसाल वनक्षेत्र रात्रगस्त 🫡🙏काल रात्री किरकसाल वनक्षेत्रातील इसाव्याची खोरी व खोपाडे परिसरात वनविभागाच्या मार्गदर्शनाख...
07/06/2026

किरकसाल वनक्षेत्र रात्रगस्त 🫡🙏

काल रात्री किरकसाल वनक्षेत्रातील इसाव्याची खोरी व खोपाडे परिसरात वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष रात्रगस्त यशस्वीरित्या पार पडली.

या गस्तीमध्ये नरवणे बीटचे वनरक्षक श्री. भीमराव भोसले, होमगार्ड श्री. किशोर काटकर व श्री. किशोर कुंभार, पशुवैद्यरक्षक श्री. अभिजीत माने, वन्यजीवरक्षक श्री. नवनाथ चव्हाण तसेच श्री. अजित काटकर यांनी सक्रिय सहभाग घेत वनसंपदा आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. किरकसालच्या वनक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा वेळ देऊन गस्तीत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक तरुणांचे मनःपूर्वक आभार. अशा जागरूक आणि निसर्गप्रेमी व्यक्तींमुळेच आपल्या परिसरातील वन्यजीव आणि नैसर्गिक संपदा सुरक्षित राहण्यास मदत होते.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच वनसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होत आहे. भविष्यातही असेच सहकार्य लाभत राहणार आहे.

सर्व वन्यजीवरक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

जैवविविधता संरक्षणाअंतर्गत विकेंद्रित प्रशासन आणि लोकसहभागातून संवर्धन या तत्त्वांवर आधारित कार्य भविष्यातील पर्यावरण सं...
27/05/2026

जैवविविधता संरक्षणाअंतर्गत विकेंद्रित प्रशासन आणि लोकसहभागातून संवर्धन या तत्त्वांवर आधारित कार्य भविष्यातील पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.माणदेशातील खुल्या नैसर्गिक परिसंस्थांचे पर्यावरणीय महत्त्व जपत संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी किरकसाल सारख्या अनेक जैवविविधता समिती कार्यरत राहणार आहे.🌿🐺

Address

Kiraksal
Satara
415540

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiraksal BMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kiraksal BMC:

Shortcuts

Share