दुर्गवीर प्रतिष्ठान

दुर्गवीर प्रतिष्ठान हि साक्ष दुर्गवीरांची, लावू बाजी आम्ही प्राणांची, पुन्हा चमकवू गगनी, शान ह्या गडकोटांची !

दुर्गवीर म्हंटल कि गडकोट आणि गडकोट म्हंटल कि दुर्गवीर कारण हा दुर्गवीर आहे वारस गडदुर्गांचा!
दुर्गवीर हि संस्था नाही, हा आमचा परिवार आहे, गडकोटांच्या आजच्या अवस्थेला बघून ज्याचं काळीज पिळवटत अशा सर्व शिवभक्तांसाठी, माय मराठीच्या पूतांसाठी, महाराष्ट्राच्या वाघरांसाठी, गडकोट पुन्हा पूर्वीच्या वैभवात उभे करायचे स्वप्न घेऊन एकत्र येणाऱ्या प्रत्येकाचे हे कुटुंब आहे. दुर्गसंवर्धनाचा कठीण वसा हाती घेऊन उ

भा ठाकलाय दुर्गवीर! शिवशम्भूच्या चरणांशी शपथ वाहतोय दुर्गवीर
"हे राजे, आपण आपल स्वराज्य घडवलत ज्या गडकोटांच्या बळावर, आपण पांच क्रूर शाह्यांशी टक्कर दिलीत ज्या बळावर, त्या गडकोटांची आजची अवस्था बघून आमच काळीज तुटत. आपल्या चरणांशी आम्ही शपथ घेतो कि पुन्हा एकदा ह्या गडदुर्गाना जुने वैभव दाखवून देण्याचा, आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यानसाठी हा अमुल्य वारसा जपण्याचा वसा आम्ही प्राणपणाने पाळू.
हि साक्ष दुर्गवीरांची
लावू बाजी आम्ही प्राणांची
पुन्हा चमकवू गगनी
शान ह्या गडकोटांची ||"

“स्वातंत्र्य हा आमचा श्वास आणि राष्ट्रप्रेम हीच आमची ओळख… 🇮🇳अखंड भारताच्या स्वप्नासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यवीर स...
28/05/2026

“स्वातंत्र्य हा आमचा श्वास आणि राष्ट्रप्रेम हीच आमची ओळख… 🇮🇳
अखंड भारताच्या स्वप्नासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩”

#स्वातंत्र्यवीरसावरकर #जयहिंद #राष्ट्रभक्त #दुर्गवीरप्रतिष्ठान

कळंबस्ते साठलेवाडी बारव संवर्धन मोहीम... 🚩
28/05/2026

कळंबस्ते साठलेवाडी बारव संवर्धन मोहीम... 🚩

27/05/2026

*नमस्कार! जय शिवराय! 🙏🚩*

*दुर्गवीर प्रतिष्ठान* दुर्गसंवर्धनाच्या अखंड कार्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. सामाजिक बांधिलकी जपत, दुर्गम भागातील गरजूंना स्वेटर, ब्लँकेट, दिवे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येते.

यासोबतच *ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्यासाठी दरवर्षी शालेय साहित्य वाटप उपक्रम* आयोजित केला जातो.

यापूर्वी हा उपक्रम प्रामुख्याने गडकोट परिसरातील आदिवासी पाड्यांपुरता मर्यादित होता. *मात्र यावर्षी विविध दुर्गम भागांतील २००० विद्यार्थ्यांना साहित्य संच वाटप* करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा आमचा मानस आहे.

🎒 *प्रत्येक साहित्य संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल:*
- दप्तर
- पाण्याची बाटली
- लंच बॉक्स
- कंपास पेटी
- वह्या
- चित्रकला वही

*एका संचाची किंमत: ₹७००/-*
(80G अंतर्गत करसवलत उपलब्ध)

कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य अत्यावश्यक असते. आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळेच असे उपक्रम व्यापक स्वरूपात साकार होतात.

यावर्षीही आपल्या मोलाच्या सहकार्याने एखाद्या विद्यार्थ्याच्या भविष्याला बळ द्यावे, ही नम्र विनंती.

*संपर्क:*
श्रेया मालंडकर – ९४०४४४१३५८
प्रशांत डिंगणकर – ८००७९३०२१०

📍 *दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र*
🌐 http://www.durgveer.com

तुमची एक छोटीशी मदत एका शालेय विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारू शकतं... 😊जमेल तेवढं सहकार्य करा.... 🙏
19/05/2026

तुमची एक छोटीशी मदत एका शालेय विद्यार्थ्यांचं
भविष्य सुधारू शकतं... 😊
जमेल तेवढं सहकार्य करा.... 🙏

15/05/2026

कळंबस्ते - साटलेवाडी बारव संवर्धन मोहीम संपन्न...🚩

#दुर्गवीर
#दुर्गवीरप्रतिष्ठान
# #संवर्धन

*नमस्कार! जय शिवराय! 🙏🚩**दुर्गवीर प्रतिष्ठान* दुर्गसंवर्धनाच्या अखंड कार्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आह...
24/04/2026

*नमस्कार! जय शिवराय! 🙏🚩*

*दुर्गवीर प्रतिष्ठान* दुर्गसंवर्धनाच्या अखंड कार्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. सामाजिक बांधिलकी जपत, दुर्गम भागातील गरजूंना स्वेटर, ब्लँकेट, दिवे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येते.

यासोबतच *ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्यासाठी दरवर्षी शालेय साहित्य वाटप उपक्रम* आयोजित केला जातो.

यापूर्वी हा उपक्रम प्रामुख्याने गडकोट परिसरातील आदिवासी पाड्यांपुरता मर्यादित होता. *मात्र यावर्षी विविध दुर्गम भागांतील २००० विद्यार्थ्यांना साहित्य संच वाटप* करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा आमचा मानस आहे.

🎒 *प्रत्येक साहित्य संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल:*
- दप्तर
- पाण्याची बाटली
- लंच बॉक्स
- कंपास पेटी
- वह्या
- चित्रकला वही

*एका संचाची किंमत: ₹७००/-*
(80G अंतर्गत करसवलत उपलब्ध)

कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य अत्यावश्यक असते. आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळेच असे उपक्रम व्यापक स्वरूपात साकार होतात.

यावर्षीही आपल्या मोलाच्या सहकार्याने एखाद्या विद्यार्थ्याच्या भविष्याला बळ द्यावे, ही नम्र विनंती.

*संपर्क:*
श्रेया मालंडकर – ९४०४४४१३५८
प्रशांत डिंगणकर – ८००७९३०२१०

📍 *दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र*
🌐 http://www.durgveer.कॉम
#दुर्गवीर

मृगगड संवर्धन मोहीम 🚩दिनांक :- १९ एप्रिल २०२६सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक मृगगड दुर्गावर संवर्धनासाठी दुर्गवीर ...
20/04/2026

मृगगड संवर्धन मोहीम 🚩
दिनांक :- १९ एप्रिल २०२६

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक मृगगड दुर्गावर संवर्धनासाठी दुर्गवीर मार्फत महत्वपूर्ण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मुंबई, ठाणे, पुणे, रोहा आणि पेण अशा विविध भागांतून आलेल्या ३६ शिलेदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गडावरील ऐतिहासिक अवशेषांना पुनरुज्जीवित करण्यासाठी या मोहिमेत प्रामुख्याने चार विभागांत काम करण्यात आले.

​केलेली प्रमुख कामे:
​१. जोत्याची स्वच्छता:
गडावर सुरुवातीलाच असलेल्या देवीच्या मूर्तीजवळच्या परिसरात काम करण्यात आले. मूर्तीच्या बाजूला असलेल्या एका मुख्य जोत्यावर साचलेली माती आणि दगड बाजूला सारून, त्या जोत्याची एक बाजू मोकळी करण्यात आली आहे.

​२. पहिल्या जोत्याला लागूनच दुसरे एक जोते अस्तित्वात आहे.त्यावरील झाडी गवत काढून एका बाजूची दगड-माती हटवून स्वच्छ आणि मोकळी करण्यात आली, हि बाजू मोकळी करत असताना दोन पायऱ्या उजेडात आल्या.

​३. 'सदर' वास्तूला नवसंजीवनी
गेल्या सात ते आठ मोहिमांच्या सातत्यपूर्ण परिश्रमानंतर, गडावरील अत्यंत महत्त्वाची वास्तू असलेली "सदर" आता पूर्णपणे मोकळी झाली आहे. गडाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.

​४. पाण्याचे टाके शोध व स्वच्छता:
गडावर एक नवीन पाण्याचे टाके प्रकाशात आले आहे. या टाक्यावरील माती दगड हटवून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

#मृगगड_mrugagad
#दुर्गवीर_durgveer
​ #गडकिल्ले
#छत्रपती
#सह्याद्री

Address

Navjivan Rahiwasi Sangh Demelo Compound, Vakola Bridge
Santacruz
400055

Alerts

Be the first to know and let us send you an email when दुर्गवीर प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to दुर्गवीर प्रतिष्ठान:

Share