Astitva Samajvikas va Sashodhan Sanstha

Astitva Samajvikas va Sashodhan Sanstha "Together we Can Make a Social Change in the Lives of Deprived and Marginalised Community"

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा उपक्रमात अस्तित्व च्या कार्यक्षेत्रातील वाणीचिंचाळे गाव अग्रक्रमावर.
20/02/2025

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा उपक्रमात अस्तित्व च्या कार्यक्षेत्रातील वाणीचिंचाळे गाव अग्रक्रमावर.

विनम्र अभिवादन..!
02/10/2024

विनम्र अभिवादन..!

22/08/2024
"अस्तित्व"संस्था सांगोला-,अनुसंधान ट्रस्ट-साथी पुणे व सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने दिनांक 6 डिसेंबर रोजी डफरिन हॉस्पी...
07/12/2023

"अस्तित्व"संस्था सांगोला-,अनुसंधान ट्रस्ट-साथी पुणे व सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने दिनांक 6 डिसेंबर रोजी डफरिन हॉस्पीटल हॉल सोलापूर येथे NUHM अंतर्गत महिला आरोग्य समिति सक्षमीकरण संदर्भात आशा कार्यकर्तीसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ मंजुश्री कुलकर्णी, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. आतिष बोराडे, साथी पुणे या संस्थेचे विनोद शेंडे, शकुंतला भालेराव,अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे उपस्थित होते.कार्यशाळेस विडी घरकुल सोलापूर व रामवाडी विजापूर रोड येथील 64 आशा व प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तब्बू नगारे व कल्पना चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वागत तब्बू नगारे यांनी केले आभार कल्पना चव्हाण यांनी मानले.

14/11/2023
अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन व एकल महिलांच्या विकासाचे उपक्रम सुरू- शहाजी गडहीरेभांडवलाअभावी शेती करणे कठीण झाले आहे. शेतम...
07/04/2022

अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन व एकल महिलांच्या विकासाचे उपक्रम सुरू- शहाजी गडहीरे

भांडवलाअभावी शेती करणे कठीण झाले आहे. शेतमालास भाव नाही, शेती व्यवसायात यांत्रिकी करण सूरू झाल्याने त्याचा खर्च वाढत आहे पर्यायाने छोट्या शेतकऱ्यांना यंत्राचे भाडे परवडत नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. भूमिहीन शेतमजूर तर हतबल झाला आहे हाताला काम नाही, सध्या सांगोल्यातील तालुक्यातील डाळिंब बागा काढून टाकल्या जात आहेत त्याचा परिणाम भूमिहीन शेतमजुरांच्या रोजगारावर झाला आहे एका बाजूला प्रचंड महागाई दुसरीकडे हाताला काम नाही या अडचणीत हा घटक सापडला आहे सध्या त्याच्यापुढे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्यानी त्यांच्या शेतीचे नियोजन करावे त्यामध्ये जमीन सुधारणा, वृक्ष लागवड, अन्नधान्य उत्पादन, फळबाग लागवड, भाजीपाला उत्पादन अशा उपक्रमांबरोबर भूमिहीन कुटुंबातील महिला, युवक यांनी शेतीपूरक छोटे छोटे व्यवसाय करावेत.त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, शिवणकाम इत्यादी व्यवसायाचे प्रशिक्षन पण दिले जाणार असुन त्यातून व्यवसाय सूरू करण्याला प्रोत्साहन मिळणार आहे विवीध शासकीय योजनांची जोड देऊन ग्रामीण व्यवसाय सुरू झाले तर ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे.गेल्या दोन वर्षाच्या काळात छोट्या घटकांच्या जीवनाधाराचे व उदरनिर्वाहाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर अस्तित्व संस्थेच्या वतीने सांगोला, मंगळवेढा तालुक्यांतील अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेत मजूर यांच्या विकासासाठी एक प्रकल्प राबवण्यात येत असुन या प्रकल्पांतर्गत २५० अल्पभूधारक शेतकरी व १०० भूमिहीन शेतमजूर यांना सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी व लाभार्थी निवडीसाठी आयोजीत प्रशिक्षणात शहाजी गडहिरे बोलत होते.

यावेळी विवीध कार्यशाळेस वाणीचिंचाळे, आलेगाव, पारे, मानेगाव, भोसे, चिंचोली, सोनलवाडी, हटकर मंगेवाडी, जुजारपुर, खुपसंगी,
गोणेवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेत मजूर उपस्थित होते...

धन्यवाद.....

"अस्तित्व"संस्थेने सूरू केलेली "गोट बँक" विधवा महिलांना मोठा आधारअस्तित्व संस्थेच्या वतीने वाणी चिंचाळे येथे कोविड काळात...
31/03/2022

"अस्तित्व"संस्थेने सूरू केलेली "गोट बँक" विधवा महिलांना मोठा आधार

अस्तित्व संस्थेच्या वतीने वाणी चिंचाळे येथे कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी गोट बँक सूरू करण्यात आली असून सदर गोट बँकेचे उद्घाटन महिला दिनाचे औचित्य साधून योगिता आपटे( पुणे )यांच्या हस्ते करण्यात आले.
अस्तित्व संस्थेचे काम नेहमी गरिबांना दिलासा देणारे असते. शेवटच्या घटकांची गरज ओळखून नेहमी वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग सातत्याने करत आहे.संस्थेने कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना आधार द्यावा या उद्देशाने सूरू केलेला गोट बँक उपक्रम अतिशय कौतुकास्पद असुन महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असणार आहे याचा निश्चितच फायदा महिलांना होणार आहे. समाजाने अशा महिलांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याची हि वेळ आहे.

धन्यवाद....
अस्तित्व संस्था.

अस्तित्व संस्थेच्या वतीने 40 विधवा महिलांना शिलाई मशिनचे वाटप- "अस्तित्व" या सामाजीक संस्थेच्या वतीने सांगोला व मंगळवेढा...
26/03/2022

अस्तित्व संस्थेच्या वतीने 40 विधवा महिलांना शिलाई मशिनचे वाटप-

"अस्तित्व" या सामाजीक संस्थेच्या वतीने सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील 20 ते 35 वयोगटातील कोविड काळात विधवा झालेल्या 40 गरजू महिला निवडून त्यांना 10 दिवसाचे शिवणकाम प्रशिक्षण देऊन प्रत्येकीला एक शिलाई मशिन चे वाटप दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सांगोला अर्बन बँकेसमोर पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,रतनचंद शहा अर्बन को ऑप बँकेचे चेअरमन राहुल शहा,डॉ.प्रभाकर माळी,अस्तित्व चे अध्यक्ष शहाजी गडहिरे,युवक नेते दत्ता टापरे यांच्या हस्ते या मशीनचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास नगरसेविका सुनिता खडतरे,राहुल टकले(गुरुजी ),माजी जि.प.सदस्य शिवाजीराव नागने,वाणीचिंचाळे चे सरपंच जितेंद्र गडहिरे,अँड सुनीता धनवडे ,घेरडी च्या ग्रामपंचायत सदस्या सौ.आरती जगधने शिक्षक नेते संजय काशिद,उद्योगपती धनंजय भिंगे यांच्यासह अस्तित्व चे अरुण कसबे,जितेंद्र जगधने इत्यादी उपस्थित होते.

यावेळी अनेक महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.अस्तित्व संस्थेची ही मदत जिवनात आम्हाला उभा करणारी असल्याचे सांगितले अनेक महिला यावेळी भावनीक झाल्या होत्या.

🌎 💦🌊
22/03/2022

🌎 💦🌊

अस्तित्व संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन सध्याच्या बदलत्या परिस्थितीत सामाजिक न्याय ही संकल्पना धूसर होत असून विविध ...
22/03/2022

अस्तित्व संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

सध्याच्या बदलत्या परिस्थितीत सामाजिक न्याय ही संकल्पना धूसर होत असून विविध घटकांना न्यायापासुन वंचित रहावे लागत आहें.गेल्या काही वर्षात सामाजिक न्यायासाठीच्या चळवळी कमकुवत झाल्या असून यापुढच्या काळात सामाजीक न्यायासाठी नव्याने चळवळी उभ्या राहण्याची गरज असल्याचे मत जैश्ठ पत्रकार व पुरोगामी विचारवंत संजय आवटे यानी व्यक्त केले.ते काल सांगोला महाविदयालय येथे आयोजित केलेल्या अस्तित्व संस्थेच्या वार्षिक अहवाल प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते कॉ रविंद्र मोकाशी होते व्यासपिठावर अस्तित्व चे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक डॉ.क्रुष्णा इंगोले,माजी नगराध्यक्ष डॉ.प्रभाकर माळी,नगरसेविका स्वाती मगर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार,बापूसाहेब ठोकळे,अस्तित्व चे उपाध्यक्ष अरुण कसबे,सचिवा अँड सुनीता धनवडे व जितेंद्र जगधने इत्यादी उपस्थित होते.पुढे बोलताना संजय आवटे म्हणाले की हा देश कोण्या एकट्याचा नसून लोक या देशाचे मालक आहेत.भारतीय संविधान हे लोकांनी स्वीकारले असून संविधानाच्या प्रास्ताविक़ेतच आम्ही भारताचे लोक असे म्हटलं आहें.स्वातंत्र्याच्या पचा हत्तर वर्षानंतर भारत एकसंघ आहे त्यांचे श्रेय लोकांना जाते.आज गर्दी नाकारली जात आहें हे नाकारत असताना काय साकारायच यांवर विचार होताना दिसत नाही.जात व्यवस्था वेगळ्या स्वरूपात समाजामध्ये सक्रिय आहें.अस्तित्व संस्थेचे काम गरिबांना उभे करणारं असून शहाजी गडहिरे यांनी केलेले काम खऱ्या अर्थाने स्त्री -पुरूष समतेची चळवळ असून महात्मा फुलेनीं केलेले काम ते पुढे घेउन जात आहेत.पुढे बोलताना ते म्हणाले भारतीय समाज हा ढोंगी असून सार्वजनिक ठिकाणी जी मूल्ये मांडतो ती खाजगी जिवनात,कुटुंबात अंमलात आणत नाही.सामाजीक संस्थांनी आता नव्या रूपात नव्या संकल्पना नबी ध्येये घेउन काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यानी व्यक्त केले.अस्तित्वचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी आपल्य़ा प्रास्ताविकात अस्तित्व च्या माध्यमातून दुष्काळी भागात गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कामावर प्रकाश टाकून गेल्या दोन वर्षात सुरु असलेल्या कठीण काळात गरिबांना मदत करून त्यांना दिलासा दिला असल्याचे सांगितले.रेशनकिट,सुरक्षा किट याबरोबरच आरोग्य सुविधा सुधा ऊपलब्ध करून दिल्याचे त्यानी सांगितले.यावेळी डॉ क्रुष्णा इंगोले म्हणाले शहाजी गडहिरे गेल्या अनेक वर्षापासून या भागांतील गरिबांसाठी काम करीत आहेत त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा गरिब माणूस असाच आहें यावेळी नगरसेविका स्वाती मगर यांनी अस्तित्व च्या कामाचे कौतुक करून संस्थेला व शहाजी गडहिरे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख व स्वागत अँड सुनीता धनवडे यांनी केले. संस्थेच्या कामाचा अहवाल प्रभाकर शिरडोणकर यांनी मांडला सूत्र संचलन माधुरी मंडले यांनी केले,आभार दिपाली भुसनर यांनी मानले. कार्यक्रमास सांगोला,मंगळवेढा तसेच सोलापूर येथून महिला,युवक तसेच सांगोला शहरातील सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे😊🙏
22/12/2021

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे😊🙏

Address

Astitva Sanstha, 2nd Floor, Karim Complex Miraj Road Sangola
Sangola

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919822972559

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astitva Samajvikas va Sashodhan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Astitva Samajvikas va Sashodhan Sanstha:

Share