31/03/2026
प्रति,
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई
*विषय: गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामा व आर्थिक मदतीची मागणी.*
महोदय,
सविनय निवेदन असे की, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिनांक ___ ते ___ दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके पूर्णतः नष्ट झाली असून फळबागा, भाजीपाला तसेच धान्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड झाले असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून या नुकसानीमुळे त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
म्हणून आपणांस नम्र विनंती आहे की:-
१. संबंधित विभागामार्फत तात्काळ नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा.
२. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून वितरित करण्यात यावी.
३. पीक विमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी विशेष निर्देश द्यावेत.
४. वीज बिल, कर्ज परतफेड व इतर आर्थिक बाबींमध्ये शेतकऱ्यांना सवलत देण्यात यावी.
५. फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.
आपण या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्याल, अशी आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
नाव;-
पद:-
भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश.
गाव/तालुका/जिल्हा
मोबाईल क्रमांक;-
दिनांक: ___
स्थान: ___
प्रत;- कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य.