25/02/2026
सई हे सांगितले महिलांचं हक्काचा व्यासपीठ. जिथे फक्त ' ती ' चा विचार करून कार्यक्रमांचा आयोजन केलं जातं. तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित काही कार्यक्रम, तिचं मनोरंजन, तिचा आनंद द्विगुणित करणाऱ्या सहली, विविध स्पर्धा. कलागुणांना वाव देणारे वार्षिक स्नेहसंमेलन या माध्यमातून तिला आनंदी ठेवण्याचा सई सतत प्रयत्न करत असते.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून सांगलीतील प्रथितयश छाती रोग विशेषतज्ञ डॉक्टर अनिल मडके सरांनी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून स्त्रीत्व ते स्वत्व या कार्यक्रमाची निर्मिती केली. तिचं स्त्रीत व जपत असताना ती स्वतःच स्वत्व विसरून जाते. आणि मग पन्नाशी आल्यानंतर तिला अनेक आजाराने घेतल्यानंतर तिची
होणारी मानसिक घालमेल. त्यातच तिचा सुरू होणारा मेनोपॉज, आणि त्यावेळी घरातील पुरुषांची जबाबदारी अशा एक ना अनेक गोष्टींचा उहापोह कार्यक्रम म्हणजे स्त्रीत्व ते स्वत
त्यात डॉक्टर अनिल मडके सरांनी त्याला मनोरंजनाची जोड ही दिली आहे. स्त्रीच्या प्रत्येक आयुष्याच्या वळणावर आधारित सुंदर गाणी ही त्यांनी निवडलेली आहेत. असा हा आरोग्यपूर्ण आणि तितकाच श्रवणीय गाण्यांचा कार्यक्रम. असा दुग्ध शर्करा योग या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
सांगलीतील सर्व स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी हा कार्यक्रम खुला असणार आहे.. उद्या गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साडेचार वाजता भावे नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा.