“आई वडील”

“आई वडील” "आई वडील" पर्वता सारखे वडील तर नदी सारख?

अनामिक अनामिक,
अनामिक शीतल माया.
जीवनाच्या मध्यान्ही या,
केवळ आईच धरते छाया...

बाबांचे हे प्रेमच असे,
जसा आदित्य प्रकाशमान.
आयुष्याच्या काळोखात,
देतात सदैव तेजाचं दान...

आई म्हणजे असते ज्योत,
उजळते घर प्रकाशाने.
चंदनाचे झाड – सौरभ,
दरवळते जसे कणाकणाने...

बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षाला.
हाडांची काडे करून,
आधार देतो मनामनाला...

आई म्हणजे सागर जसा,
प्रेम, औदार्य, करुणेचा.
अथांग... मन जिचे,


जसा प्रशांत ममतेचा...

आकाशाहून सदैव उन्नत,
उंची माझ्या बाबांची.
विश्वाहूनही विशाल हृदय,
स्थितप्रज्ञता हिमालयाची...

तान्ह्या कृष्णासाठी फुटे,
आई देवकीचा पान्हा.
गोकुळात लीला दावतो,
माय यशोदेचा कान्हा...

अष्टमीच्या गर्भरात्री,
यमुनेच्या पुरातून.
रसिकतेने कृष्ण वाहतो,
बाप वासुदेव डोईवरून...

आई हा शब्दच असा,
सरोवरात कमळ विलसती.
सप्तसुरांचे माधुर्यवैभव,
या एका आईत वसती...

बाबांसाठी आदर असा,
जसे तळपते इंद्रधनुष्य.
सप्तरंगात न्हाऊन जाते,
दैवतात या माझे भाग्य...

Address

Vishrambag
Sangli
416415

Telephone

+919850203420

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when “आई वडील” posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to “आई वडील”:

Share