DNT Chamber of Commerce Association

DNT Chamber of Commerce Association Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DNT Chamber of Commerce Association, Non-Governmental Organization (NGO), Sangli.

भटक्या व विमुक्त जाती जमाती व्यापारी संघटन भारत.

आपण आपली मुळे सक्षम करुन आपल्या येणाऱ्या पिढी साठी यशस्वी वाटचाल करू!

हे व्यापारी संघटन तुमचे आहे!
तुम्ही सुद्धा यामध्ये सामील होऊन आपली पिढी यशस्वी बनवा!!

टोल सिर्फ कमर्शियल गाड़ियों पर लगे ✅नॉर्मल जनता की गाड़ियों से वसूली बंद करो 💯🚫 प्राइवेट वाहन = टोल फ्री🚛 कमर्शियल वाहन = ...
22/01/2026

टोल सिर्फ कमर्शियल गाड़ियों पर लगे ✅
नॉर्मल जनता की गाड़ियों से वसूली बंद करो 💯

🚫 प्राइवेट वाहन = टोल फ्री
🚛 कमर्शियल वाहन = नियमानुसार टोल

यह सड़कें जनता की हैं, लूट का अड्डा नहीं!

13/11/2025

मा. श्री उदय जी सामंत साहेब,
उद्योग मंत्री,
महाराष्ट्र राज्य

*विषय: #भटक्या व विमुक्त जाती जमातीतील लोकांना व्यवसायात संधी देणेबाबत*

महोदय,

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झाली. देश स्वतंत्र होऊन सुद्धा भटक्या विमुक्त जातीतील लोकांना स्वातंत्र्य मिळालं नाही. पण भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952 साली विमुक्त समाजाचे कंपाउंड तोडून यांना सामाजिक प्रवाहात आणले. तरीसुद्धा सामाजिक स्तर न सुधारल्यामुळे हे लोक इतर इतर भटकू लागले.

औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झाली त्याच वेळी ज्या लोकांनी जमिनी अधिग्रहण केल्या त्यांनी व्यवसाय चालू केले. पण भटक्या विमुक्त जातीतील लोक हे सामाजिक प्रवर्गात आलेच नसल्यामुळे त्यांना व्यवसायाची संधी मिळालीच नाही.

सरकार या समाजाचे पालक असल्यामुळे आपण या पत्राचा जाणीवपूर्वक विचार करावा. भटक्या समाजामध्ये जो आज नोकरवर्ग आहे त्याचा नोकरी मिळण्याचा प्रश्न उभा राहिला असल्यामुळे तो त्याचा व्यवसाय करू इच्छितो. जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अविकसित जागा आहेत ज्यांनी घेऊन ते उपयोगात आणले नाहीत अशांच्या जागा परत घेऊन येणाऱ्या पिढीला आपण या समाजातील व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना व्यवसाय करण्याची संधी द्यावी.

धन्यवाद,
मच्छिंद्र भोसले
समन्वयक
डीएनटी चेंबर ऑफ कॉमर्स
राहुल मोरे
चेअरमन
डी एन टी चेंबर ऑफ कॉमर्स असोशियन
7602050202

05/11/2025

🌟 वेबिनारमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार..! 🌟

DNT Chamber of Commerce Association आयोजित “उद्योजकाकडे वाटचाल” या वेबिनारला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल सर्व सहभागी, मार्गदर्शक व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार..! 🙏

आपला उत्साह आणि सहभाग आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला.

उद्योजकतेच्या वाटचालीत आपण सर्व एकत्र येऊन नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण करूया..! 💼✨

02/11/2025

*🔴निमंत्रण 🔴*
नमस्कार,
या ग्रुप वर सर्व सभासद हे वेगवेगळ्या समाजाशी जोडले गेलेले आहेत. प्रत्येक जण आपल्या समाजाच्या भल्यासाठी काही ना काही विचार करत असतो. पण भटक्या विमुक्त समाजामध्ये *आज आपण नवीन क्रांती उभा करत आहोत. आज 2 नोव्हेंबर 2025 रोजी मिरज येथे सकाळी 11 वाजता उद्योजक मेळावा आणि त्याचा मोटिवेशनल सेमिनार भरवलेला आहे.* तरी आपण आपली उपस्थिती लावावी जे सामाजिक नेते बाहेरगावी आहेत त्यांनी *ऑनलाईन लिंक द्वारे* या सेमिनार मध्ये सामील व्हावं ही विनंती.
जय हिंद, जय भटके विमुक्त

01/11/2025

https://youtu.be/xxQmjJTyh_E
*ब्रेकिंग न्यूज -BREAKING NEWS*
♦️ *“मी उद्योजक होणारच!” — DNT Chamber तर्फे नव्या पिढीला उद्योगक्षेत्रात झेप घेण्यासाठी प्रोत्साहन*

*स्वावलंबनाच्या दिशेने भटक्या-विमुक्त तरुणांची वाटचाल — मिरजमध्ये २ नोव्हेंबरला भव्य वेबिनार*
📍 📍 📍📍 📍📍
*जाहिराती आणि बातमी साठी संपर्क*
*📲9922495230*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
LIKE - SHARE - SUBSCRIBE💯
**
_____________________________
ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी
*युवा ग्राम २४ मराठी न्युजला सबस्क्राईब करा*

01/11/2025

काल दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी DNT Chamber of Commerce यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “उद्योग जगताकडे चला” या महत्त्वपूर्ण वेबिनारसंदर्भात एक सविस्तर बैठक पार पडली.

या बैठकीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकत्र येऊन वेबिनारच्या आयोजनाची तयारी, विषय निवड आणि युवकांना उद्योगक्षेत्रात सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन यावर चर्चा केली.

बैठकीदरम्यान DNT Chamber of Commerce चे चेअरमन मा.श्री. राहुल नाना मोरे यांनी युवक वर्गाला उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या युगात रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार निर्माण करणे हेच खरी प्रगतीचे लक्षण आहे. युवकांनी नाविन्यपूर्ण विचार, तंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारावा, हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीला उपस्थित सर्व सदस्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि युवक पिढीपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी आपले योगदान देण्याची तयारी दर्शवली.

DNT Chamber of Commerce Association घेऊन आले आहे खास वेबिनार – “उद्योजकाकडे वाटचाल” 💼✨भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील तरु...
01/11/2025

DNT Chamber of Commerce Association घेऊन आले आहे खास वेबिनार – “उद्योजकाकडे वाटचाल” 💼✨

भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी DNT Chamber
of Commerce तर्फे उद्योगजगताशी संबंधित मार्गदर्शन, यशोगाथा आणि नव्या व्यवसाय
संधींवर आधारित उपयुक्त वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

या वेबिनारचे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा. श्री. शिवाजी त्रिमुखे सर (जिल्हा समन्वयक,
MCED जिल्हा उद्योग केंद्र, सांगली) यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे.

संयोजक :- मा. श्री दुर्गेश (अण्णा) पवार ( जिल्हा समन्वयक - डीएनटी चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली जिल्हा अध्यक्ष - भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघ, मुंबई )
मा.श्री.राहुल (नाना) मोरे :- ( चेरमन डी. एन. टी. चेंबर ऑफ कॉमर्स )

📅 दिनांक : 2 नोव्हेंबर 2025 | ⏰ सकाळी 11 ते दुपारी 2
📍 पत्ता : आई.एम.ए. हॉल, पंचायत समिती मिरज समोर, बँक ऑफ इंडिया च्या वरती, मिरज

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 76020 50202

👉 तुमची बिझनेस आयडिया घ्या आणि उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा.

#उद्योगजगताकडेवाटचाल #स्वावलंबीभारत #उद्योजकता #यशोगाथा #भटक्यावविमुक्त #तरुणांसाठीसंधी

Address

Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DNT Chamber of Commerce Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share