अग्रणी पाणी फाउंडेशन, अग्रण धुळगाव

  • Home
  • India
  • Sangli
  • अग्रणी पाणी फाउंडेशन, अग्रण धुळगाव

अग्रणी पाणी फाउंडेशन, अग्रण धुळगाव 🌱अग्रणी💧पाणी💧फाऊंडेशन🌳 निस्वार्थ सामाजिक कार्यात सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत!

नैसर्गिक रंग तयार करण्याचा उपक्रम *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अग्रण धुळगाव* येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ...
08/03/2026

नैसर्गिक रंग तयार करण्याचा उपक्रम

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अग्रण धुळगाव* येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक रंग तयार करण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी फुले, पाने व इतर नैसर्गिक साधनांचा वापर करून सुरक्षित व पर्यावरणपूरक रंग तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली.
या उपक्रमास केंद्रप्रमुख पवार साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच उपस्थित आटपाडकर सर, डुबुले सर व कुडचे सर शाळेतील सर्व शिक्षकही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून नैसर्गिक रंगांचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच आनंददायी पद्धतीने शिक्षण घेण्याचा अनुभव मिळाला.

 #स्मृतीवन
20/02/2026

#स्मृतीवन

*🛤️माझ गाव माझा अभिमान🛣️*🌍 माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये*🏆 ग्रामपंचायत अग्रण धुळगाव*✨ पुणे विभागात अव्वल स्थान💰 रु. ५० ल...
19/02/2026

*🛤️माझ गाव माझा अभिमान🛣️*

🌍 माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये
*🏆 ग्रामपंचायत अग्रण धुळगाव*
✨ पुणे विभागात अव्वल स्थान
💰 रु. ५० लाख बक्षीस प्राप्त
ही गौरवशाली कामगिरी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य विभाग, महिला बचत गट, कृषी व पशुधन विभाग, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत प्रशासन तसेच सर्व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून साकारली आहे.

🌱 पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण आणि शाश्वत विकास यासाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा सन्मान आहे.
🙏 सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
🌿 “हरित गाव, स्वच्छ गाव — प्रगतीचा नवा अध्याय!” 🌿

#विकास पर्व
#माझी वसुंधरा
#माझी वसुंधरा अभियान 5.0
#हरितगाव
#स्वच्छगाव
#पर्यावरणसंवर्धन
#ग्रामपंचायत
#अग्रण_धुळगाव
#पुणेविभाग
#५०लाखबक्षीस
#ग्रामविकास 🌿

*अग्रणी नदी पात्रात रक्षा विसर्जन न करता श्रीमती कुसुम (काकी) बाबासाहेब भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करत म...
19/02/2026

*अग्रणी नदी पात्रात रक्षा विसर्जन न करता श्रीमती कुसुम (काकी) बाबासाहेब भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करत माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत संरक्षण*

नदी प्रदूषण न करता माझी वसुंधरेचे संरक्षण कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील सदन शेतकरी नामदेव भैय्या भोसले व माजी सैनिक विनायक भैय्या भोसले यांची मातोश्री श्रीमती कुसुम (काकी) बाबासाहेब भोसले यांचे 16 फेब्रुवारी रोजी आकस्मित वयाच्या 69 व्या वर्षी दुः खद निधन झाले त्यामुळे भोसले कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला. परंतु यातुन सावरत मोठ्या सकारात्मकतुन तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रक्षाविसर्जना वेळी भोसले कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रीत येऊन विचारांती आईच्या स्मृती जपण्यासाठी अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येथील स्मशानभूमी च्या बाजूला वडाचे झाडाचे वृक्षारोपण केले व त्या झाडाला सर्व अस्थि वाहील्या
स्मृतीवन संकल्पनाही शिवदास भोसले यांनी अग्रणी पाणी फाउंडेशन संपूर्ण गावाला हरितमय करण्याच्या प्रयत्नातून उदयास आली. फाऊन्डेशनच्या या स्थापनेनंतर संस्थापक अध्यक्ष शिवदास भोसले यानी प्रथम आपल्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या रक्षेतुन स्मृती वृक्षारोपण करून जगविण्यास सुरुवात केली होती. आजही गावातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणार्थ आपल्यासोबत राहाव्यात म्हणून त्याच रक्षेतून वृक्षारोपण करून स्मृतीवन या वृक्षांचे संगोपन केले जाते. श्रीमती कुसुम (काकी) बाबासाहेब भोसले यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राज्यातील कवठेमंहाकाळ तालुका हा कायमस्वरूपी
दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असते. त्यावर वृक्षारोपण करूने त्याचे संगोपन करणे हा एकमेव मात्रा असुन ते करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार भोसले कुटुंबियांनी गावातील स्मशानभूमी परिसरात वडाचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी लो. सरपंच शिवदास भोसले, ग्रामपंचायत सदस्य भानुदास भोसले, हेमंत खंडागळे,अण्णासाहेब भोसले,मोहन मिस्त्री, बाळासो गुरव, माजी सैनिक प्रकाश भोसले यांचे सहकार्य लाभले. यावेळी नरसिंह माजी सैनिक पतसंस्था चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक, गावातील माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी प्रबोधन करताना लोकनियुक्त सरपंच अग्रणी पाणी फाऊन्डेशनचे शिवदास भोसले म्हणाले दुष्काळाची गंभीर समस्या भेडसावत असतात. कडक उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन निसर्गाचा वारसा जतन करण्यासाठी वृक्षारोपणासारखा ऊपक्रम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

चौकट ओळी

अग्रणी नदीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला या नदीच्या संवर्धनाचे कार्य अग्रण धुळगावकर करत आहेत या कार्याचा इतर गावांनी आदर्श घ्यावा नदीमध्ये रक्षा न टाकता याच रक्षेतून वृक्षारोपण करण्याची संकल्पना आदर्श आहे.
माजी सैनिक सुरेश भोसले
अग्रणी पाणी फाऊंडेशन सदस्य

दुष्काळाची गंभीर समस्या भेडसावत असताना कडक उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन निसर्गाचा वारसा जतन करण्यासाठी माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत आपल्या प्रियजनांच्या स्मृती वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून जतन करणे आवश्यक आहे.

#अग्रणी_पाणी_फाऊंडेशन #सह्याद्री_देवराई_अग्रणी #माझ_गाव_माझा_अभिमान #अग्रणी_स्पर्धा_परीक्षा_मार्गदर्शन_केंद्र #वृक्षारोपण🌳 #अग्रण_धुळगाव

🌟 *माझा गांव – माझा अभिमान* 🌟आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर घव...
18/01/2026

🌟 *माझा गांव – माझा अभिमान* 🌟

आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करून संपूर्ण गावाचे नाव उज्वल केले आहे.

आज जाहीर झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या निकालामध्ये —
🥇 कृष्णा रवींद्र कदम
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत *जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक*

🥇 श्रेयश विलास भोसले
*पुढारी परीक्षेत प्रथम क्रमांक*

हे यश केवळ त्यांचेच नसून, हे यश म्हणजे ग्रामीण शाळा, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्ने उराशी बाळगून ती साकार करता येतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल
सर्व जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती,
मुख्याध्यापक, मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन,
आणि पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

✨ ही यशोगाथा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरो आणि आपल्या शाळेतून असेच अनेक तारे चमकत राहोत! ✨

*शुभेच्छुक —*
अग्रणी पाणी फाउंडेशन,
अग्रण धुळगांव 🌱
#अग्रणी_पाणी_फाऊंडेशन #सह्याद्री_देवराई_अग्रणी #अग्रणी_स्पर्धा_परीक्षा_मार्गदर्शन_केंद्र #माझ_गाव_माझा_अभिमान🛣️ #अग्रण_धुळगाव

*अग्रण धुळगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांचा आठवडी बाजार उत्साहात संपन्न* अग्रण धुळगाव (ता. कवठेमंहाकाळ) येथील जिल...
12/01/2026

*अग्रण धुळगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांचा आठवडी बाजार उत्साहात संपन्न*

अग्रण धुळगाव (ता. कवठेमंहाकाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला मुलांचा आठवडी बाजार मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः पिकवलेल्या तसेच गावच्या परिसरातून संकलित केलेल्या विविध प्रकारच्या भाज्या व शेतीमाल विक्रीसाठी मांडला होता.

या बाजारात हिरव्या पालेभाज्यांसह संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लागणारे तीळ, गूळ, संक्रांतीचे खण, ऊस, गाजर, मुळा, हरभरा, पालक, राळे, मटकी आदी भाजीपाला तसेच सणासाठी आवश्यक साहित्य विक्रीस उपलब्ध करण्यात आले होते. त्याचबरोबर वडापाव, भजी, भेळ, समोसा, कचोरी, पाणीपुरी, थालीपीठ, मसाले डोसा, केक - बर्फी, लाडू गुलाबजाम, खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते. त्यामुळे पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आत्मविश्वास, स्वावलंबन व उद्यमशीलतेचे प्राथमिक धडे मिळावेत या उद्देशाने मुख्याध्यापक विजय खोत, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका या सर्वांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः ग्राहकांशी संवाद साधून खरेदी-विक्री केल्याने बाजारात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या आठवडी बाजाराचे उद्घाटन ऑ. कॅप्टन हिम्मत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष हेमंत खंडागळे, रमेश खंडागळे, सोनाली सुतार, वैभवी भोसले, दादासाहेब माने, स्वाती काटकर, कोमल भोसले, स्वाती आवळे, सुनील कुंभार, संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्राचीन भोसले, शुभम भोसले, ग्रामविकास अधिकारी अंकुश दवणे तसेच पालक-ग्रामस्थ हणमंत रसाळे, बाळासो भोसले, सुनील काटकर, आबासाहेब भोसले कांचन भोसले, मालन जाधव, सविता चव्हाण, सारिका भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, श्रमाचे महत्त्व व व्यवहारातील शिस्त यांचे संस्कार रुजण्यास मदत झाली, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

#अग्रणी_पाणी_फाऊंडेशन #सह्याद्री_देवराई_अग्रणी #अग्रणी_स्पर्धा_परीक्षा_मार्गदर्शन_केंद्र #सह्याद्री_देवराई_अग्रणी #अग्रण_धुळगाव

10/01/2026


#अभ्यासाचा_भोंगा

10/01/2026

*.‘अभ्यासाचा भोंगा’ उपक्रमाची ‘बेटर इंडिया’मार्फत राष्ट्रीय पातळीवर दखल*

अग्रण, धुळगाव | प्रतिनिधी
अग्रण–धुळगाव येथील ‘अभ्यासाचा भोंगा’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाची ‘बेटर इंडिया’ या नामांकित डिजिटल माध्यमाने दखल घेत संपूर्ण भारतभर त्याची विशेष नोंद घेतली आहे. देशभरातील प्रेरणादायी उपक्रमांचे वास्तव चित्रण करणाऱ्या बेटर इंडियामुळे या गावातील शैक्षणिक चळवळीला राष्ट्रीय ओळख मिळाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा अभ्यासाचा भोंगा उपक्रम अल्पावधीतच प्रभावी ठरला आहे. या उपक्रमामुळे पालक, शिक्षक व समाजामध्येही शिक्षणाबाबत जागरूकता वाढली आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील दखलीमुळे संपूर्ण गावाचा गौरव वाढला असून हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण क्षेत्रातील तळागाळातील कल्पनांना व्यापक व्यासपीठ मिळू शकते, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

#अग्रणी_पाणी_फाऊंडेशन #सह्याद्री_देवराई_अग्रणी #अग्रणी_स्पर्धा_परीक्षा_मार्गदर्शन_केंद्र #माझ_गाव_माझा_अभिमान🛣️ #अग्रण_धुळगाव #अभ्यासाचा_भोंगा

06/01/2026

सकाळ गौरव सोहळा, आदर्श लोकनियुक्त युवा सरपंच शिवदास भोसले

#सुरवात_स्वतःपासून #अग्रणी #अग्रणी_पाणी_फाऊंडेशन

*अग्रण धुळगावचे लो. सरपंच शिवदास भैय्या भोसले यांचा ‘ #सकाळ’ विभागीय कार्यालयाकडून गौरव*सांगली विभागातील ग्रामविकास, पर्...
06/01/2026

*अग्रण धुळगावचे लो. सरपंच शिवदास भैय्या भोसले यांचा ‘ #सकाळ’ विभागीय कार्यालयाकडून गौरव*

सांगली विभागातील ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन व लोकहिताच्या कार्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने *दैनिक ‘सकाळ’*च्या सांगली विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित वर्धापन दिनी विशेष गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभात अग्रण धुळगाव (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) येथील लो. सरपंच शिवदास भैय्या भोसले यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास सकाळचे संपादक निखिल पंडितराव, सांगली विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, संपादकीय विभागातील प्रतिनिधी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लो. सरपंच शिवदास भैय्या भोसले यांचा सन्मान ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव व सांगली विभागीय कार्यालयातील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“लो. सरपंच पदाच्या कार्यकाळात शिवदास भोसले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये आतापर्यंत सुमारे ४३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असून, ही बाब ग्रामीण भागासाठी आदर्श ठरणारी आहे.”
मान्यवरांनी पुढे विशेष उल्लेख करत सांगितले की,
“‘एक पेड माँ के नाम’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांच्या उपस्थितीत अग्रण धुळगाव येथे एका मिनिटात एक हजार झाडे या वेगाने एकूण पाच हजार झाडांची लागवड करून एक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. हा उपक्रम केवळ आकड्यापुरता न राहता पर्यावरणाबाबत समाजात जागृती निर्माण करणारा ठरला आहे.”
मान्यवरांनी हेही स्पष्ट केले की,
“झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन, संवर्धन आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हे या उपक्रमांचे वैशिष्ट्य आहे. पर्यावरणपूरक विचार ग्रामस्तरावर रुजवण्याचे काम लो. सरपंच शिवदास भोसले यांनी प्रभावीपणे केले आहे.”
लो. सरपंच पदाच्या कार्यकाळात शिवदास भैय्या भोसले यांनी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारणा व ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम राबवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत सकाळ विभागीय कार्यालयाच्या वतीने हा गौरव प्रदान करण्यात आला.
सकाळसारख्या प्रतिष्ठित माध्यम समूहाकडून मिळालेला हा गौरव अग्रण धुळगाव व परिसरासाठी अभिमानास्पद असून, भविष्यात अधिक प्रभावीपणे लोकहिताचे व पर्यावरणपूरक कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून लो. सरपंच शिवदास भैय्या भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

#अग्रणी_पाणी_फाऊंडेशन #सह्याद्री_देवराई_अग्रणी #अग्रणी_स्पर्धा_परीक्षा_मार्गदर्शन_केंद्र #माझ_गाव_माझा_अभिमान🛣️ #अग्रण_धुळगाव #सकाळ

सकाळ तर्फे आज आपल्या अग्रण धुळगावचा ✨ #गौरवसोहळा✨धन्यवाद 🙏दैनिक सकाळ वर्धापन दिनानिमित्त आज सांगली येथे संपादक व सर्व सन...
05/01/2026

सकाळ तर्फे आज आपल्या अग्रण धुळगावचा
✨ #गौरवसोहळा✨

धन्यवाद 🙏दैनिक सकाळ वर्धापन दिनानिमित्त आज सांगली येथे संपादक व सर्व सन्माननीय सकाळ समूहाचे पदाधिकारी आदरणीय मार्गदर्शक संताजी भोसले सर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा सन्मान होतोय गावगाड्यातील सामान्य नागरिकांना आपण संधी दिली याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे 🙏

गेली एक दशक सातत्याने वृक्षारोपण संगोपन विविध सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे अग्रण धुळगाव च्या सर्व गावकऱ्यांचे *अग्रणी पाणी फाउंडेशन* चे यश आहे.
निस्वार्थ सेवा समाजाच ऋण फेडण्याची उदात्त भावना मनात घेऊन अविरतपणे कष्ट करणारे आमचे सवंगडी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

#अग्रणी_पाणी_फाऊंडेशन #सह्याद्री_देवराई_अग्रणी #अग्रणी_स्पर्धा_परीक्षा_मार्गदर्शन_केंद्र #माझ_गाव_माझा_अभिमान🛣️ #वृक्षारोपण🌳 #अग्रण_धुळगाव

Address

Sangli
416411

Alerts

Be the first to know and let us send you an email when अग्रणी पाणी फाउंडेशन, अग्रण धुळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share