Rotary Club of Sangli City

Rotary Club of Sangli City Community Service

आज झेंडावंदन सुभेदार अजय कुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आल. त्यावेळी रोटरी सदस्य रो. प्रेमराज जाजू, रो. सदाशिव पैलवा...
27/01/2026

आज झेंडावंदन सुभेदार अजय कुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आल. त्यावेळी रोटरी सदस्य रो. प्रेमराज जाजू, रो. सदाशिव पैलवान, रो. मंदार बन्ने, रो. विष्णू शिंदे व Pre. रो. रणजित माळी. तसेच GIANT'S club चे सदस्य अशोक कुलकर्णी, खाडे मॅडम व इतर सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
सुभेदार अजय चव्हाण सरांनी खूप सुंदर असे त्यांचे अनुभव सांगितले. एरवी आपण ला युद्धातले अनुभव ऐकतो पण यावेळी पडद्या मागचे युद्ध व त्याची तयारी. तसेच युद्ध सोडून इतर वेळी पडद्या मागची लोक कशी देश सेवा करत असतात. याबद्दल त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. एका लष्करातील सैनिकांने त्यांच्या मुखातून सांगणे व आपण ऐकणे हार्दिक अनुभव अनुभवता आला.

*रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीतर्फे चित्रकला स्पर्धा-                                                                       ...
07/12/2025

*रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीतर्फे चित्रकला स्पर्धा- सांगली प्रतिनिधी* : शालेय जीवनात मुलांमधील कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशाने रोटरी क्लब सांगली सिटीने इयत्ता ८वी ते १० गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते . सदर स्पर्धा *हुतात्मा स्मारक* सांगली या ठिकाणी पार पडल्या . स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळातील ६० विद्यार्थी सहभागी होते . निसर्गाचे संतुलन, योग आणि आरोग्य, तसेच सौर ऊर्जा भविष्याची ऊर्जा इत्यादी विषयावरती विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पणे आपल्या कल्पकता रेखाटल्या . सदर स्पर्धेत विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे : *प्रथम* - कु . भक्ती अनंत शेंडे (सिटी हायस्कूल सांगली ) *द्वितीय* - कु . सिद्धी सदाशिव मेलशंकरे (आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड ) *तृतीय*- कु . सार्थक सतीश माने (क्रांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला सांगली ). *उत्तेजनार्थ एक*- कु . ऐश्वर्या सचिन सुतार (शांतिनिकेतन कन्या शाळा सांगली ) *उत्तेजनार्थ दोन* - कु . गुंजन शेखर शिंदे (एम इ एस इंग्लिश स्कूल मिरज ) *परीक्षक* म्हणून श्री मोहन बळवंत दिंडे, निलेश काशिनाथ कांबळे व सौ स्नेहा सुनील गायकवाड यांनी काम पाहिले . *असिस्टंट गव्हर्नर* श्री धर्मेंद्र धर्मेंद्र खिलारे यांच्या शुभहस्ते पारितोषक वितरण करण्यात आले . त्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले . *संयोजक* म्हणून श्री दत्तात्रय हिप्परकर यांनी काम पाहिले . सदर स्पर्धेसाठी क्लबचे *अध्यक्ष* श्री रणजीत माळी, सचिव श्री स्वप्निल पाटील, डायरेक्टर शशिकांत चौगुले ,डायरेक्टर मंदार बने, डायरेक्टर विष्णू माने यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* डायरेक्टर श्री स्नेहल गोंडाजे यांनी केले . *आभार* श्री दत्तात्रय हिप्परकर यांनी मानले .

🎶 *देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमली सांगली!*सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक...
15/08/2025

🎶 *देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमली सांगली!*

सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य समूह गीत स्पर्धा उत्साहात झाली. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यांची मनमोहक सादरीकरणे करून उपस्थितांची मनं जिंकली.

स्पर्धेत पहिला क्रमांक-पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने मिळवला.
दुसरा क्रमांक – झील इंटरनॅशनल स्कूल व तिसरा क्रमांक – केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलने पटकावला.
विजेत्या संघांना पारितोषिके, प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा स्मारक मध्ये सदाशिव पैलवान यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून परीक्षक म्हणून रणजीत कुलकर्णी,नम्रता गुरव आणि दिलीप शहा यांनी काम पाहिले.
रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर श्री. सचिन कोले यांच्या हस्ते विजेत्या संघांना प्रमाणपत्र देण्यात आली.
रोटरीचे अध्यक्ष रणजित माळी, सेक्रेटरी स्वप्निल पाटील व इव्हेंट चेअरमन मंदार बन्ने,भाग्येश शहा, प्रेमराज जाजू, शशिकांत चौगुले, प्रमोद वंजाळे, विष्णु शिंदे इतर पदाधिकारी यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. स्नेहल गौंडाजे यांनी केले. यावेळी सांगली, कुपवाड मिरज परिसरातील विविध शाळातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Blood Donation Camp Successfully completed🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! 🩸आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी ह...
08/08/2025

Blood Donation Camp Successfully completed
🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! 🩸

आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

तुमच्या अमूल्य *रक्तदानाामुळे* अनेकांना नवजीवन मिळणार आहे.
तुमचं हे एक पाऊल अनेकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी असिस्टंट गव्हर्नर सचिन कोले प्रेसिडेंट रणजीत माळी सेक्रेटरी स्वप्निल पाटील, इव्हेंट चेअरमन भाग्येश शहा, प्रेमराज जाजू, मंदार बन्ने, शशिकांत चौगुले, प्रमोद वंजाळे, वैभव मदिहळ्ळी, विष्णू शिंदे यांनी संयोजन केले

🗓️ 08/08/2025
📍 हुतात्मा स्मारक सांगली
🎯 एकूण रक्तदाते:49
💉 एकूण रक्ताच्या बाटल्या जमा: [संख्या]49

रक्तदात्यांमध्ये देव असतो! ❤️

पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
– रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी

Today, at Mauje Digraj, a pregnant mother check-up camp was organized with great enthusiasm in collaboration with Ayushm...
07/08/2025

Today, at Mauje Digraj, a pregnant mother check-up camp was organized with great enthusiasm in collaboration with Ayushman Arogya Mandir, Mauje Digraj, and Rotary Club of Sangli City, under the Nandre Primary Health Center. The camp also observed World Breastfeeding Week and Organ Donation Fortnight. On this occasion, a person from Mauje Digraj filled out a form for body donation and was honored. The Rotary Club also provided nutritious food to the attending women. Assistant Governor of Rotary Mr. Sachin Kole, assured full cooperation for the village's health initiatives, saying that Rotary will provide all possible support for the health of the village.

The event began with a welcome and introduction by Mr. Chetan Suryavanshi. Dr. Asmita Patil spoke about the importance of Breastfeeding Week and essential check-ups. Mrs. Karambele provided information about various government schemes.

During the event, Deputy Sarpanch Anil Patil, Gram Panchayat member Rajaram Sapkal, Smita Patil, Medical Officer Dr. Mitra Madam from Nandre Primary Health Center, Health Assistant Mr. Mugalkhode, Health Assistant Mrs. Gaikwad, President of Rotary Club of Sangli City Rtn. Ranjit Mali, Secretary Rtn. Swapnil Patil, Past President Rtn. Shashikant Chaugule, Treasurer Rtn. Premraj Jaaju, Dr. Asmita Patil from Mauje Digraj Health Sub-Center, Mr. Chetan Suryavanshi, Mrs. Shobha Karambele, ASHA group promoter, ASHA workers, Anganwadi workers Sunita Kamble, and a large number of beneficiaries were present.

15 ऑगस्ट निमित्त आज आम्ही देशभक्तीपर समूह गाण्याचा कार्यक्रम घेतला यामध्ये पंधरा संघानी सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभ...
15/08/2024

15 ऑगस्ट निमित्त आज आम्ही देशभक्तीपर समूह गाण्याचा कार्यक्रम घेतला यामध्ये पंधरा संघानी सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

आमच्या क्लब तर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले, 30 जणांनी रक्तदान केले सर्वांचे आभार.
09/08/2024

आमच्या क्लब तर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले, 30 जणांनी रक्तदान केले सर्वांचे आभार.

आमच्या क्लब तर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले, 30 जणांनी रक्तदान केले सर्वांचे आभार
09/08/2024

आमच्या क्लब तर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले, 30 जणांनी रक्तदान केले सर्वांचे आभार

08/08/2024

Address

Sangli
416416

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm

Telephone

+919890963533

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club of Sangli City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share