Jain Mahila Parishad

Jain Mahila Parishad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jain Mahila Parishad, Community Organization, 171, Mahavirnagar, Sangli.

22/08/2026

यशस्विनी महिला उद्योजिका मेळावा १६/०८/२०२६

रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६  रोजी अॅड. केशवराव चौगुले सभागृह, सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेतर्फे  भव...
20/08/2026

रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी अॅड. केशवराव चौगुले सभागृह, सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेतर्फे भव्य ‘यशस्विनी महिला उद्योजिका मेळावा’ संपन्न झाला. सुप्रसिद्ध उद्योजिका, मराठी रेस्टॉरंट चेन पूर्णब्रम्हच्या संस्थापिका, झी. टी. व्ही. फेम सौ. जयंती कठाळे बेंगलोर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
सौ. शोभा चौगुले भोसे यांच्या सुरेल मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मा. आमदार श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अमृतहस्ते झाडाला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन झाले. जैन महिला परिषद चेअरमन सौ. अनिता वि. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषदेची उद्दिष्टे सांगून सध्या करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. यशस्विनी उद्योजिका मेळावा महिलांच्या कर्तुत्वाला, स्वप्नांना आणि आत्मनिर्भरतेला एक नवी दिशा देण्यासाठी आयोजित केला आहे असे सांगून , स्वावलंबी महिला एक सक्षम कुटुंब व समृद्ध समाज निर्माण करू शकते असा विश्वास व्यक्त केला. व्हा. चेअरमन सौ. नूतन जनाज यांनी सौ. जयंती कठाळे यांची तर सेक्रेटरी सौ. सरिता चौगुले यांनी सौ. विद्या कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
आमदार श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महिलांना शासनाच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा तसेच स्त्रिया स्वबळावर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्या तर समाजाचा दर्जा सुधारायला मदत होईल असे सांगितले. श्री भालचंद्र पाटील अध्यक्ष, दक्षिण भारत जैन सभा यांनी दक्षिण भारत जैन सभा माहिलांना उद्योग वाढीसाठी सर्वतोपरी सहाय्य करेल तसेच जैन महिला परिषदेला त्यांच्या उपक्रमामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन लाभेल असे सांगून शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शिका सौ. विद्या कुलकर्णी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांनी महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास मुख्य महामंत्री मा. श्री. अनिल बागणे ,अरिहंत उद्योग समूह बोरगावच्या श्रीमती मिनाक्षीताई पाटील, स्वरूपाताई पाटील यड्रावकर , कर्मवीर पातसंस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती चोपडे , कोल्हापूर विभाग महिला महामंत्री सौ. सरोजिनी खोत, पुणे विभाग महिला महामंत्री सौ.प्रीती पाटील, वीर महिला मंडळ चेअरमन सौ. अर्चना मगदूम _गाठ आदि मान्यवरांनी उपस्थित होते. अतिशय नेटके नियोजन , बैठक व्यवस्था , सुसंगत व्यवस्थापन यामुळे कार्यक्रम उत्तम झाला . जंयती कठाळे यांचे आत्मविश्वास पूर्ण बोलणे त्यानंतरची प्रश्नोत्तरे लाजबाब होती . त्यांचे मार्गदर्शन छोट्या मोठ्या जैन उद्योजिकांना प्रेरणादायी ठरले . महिलांची गर्दी , उत्तम मार्गदर्शन , सौ राजश्री शेटे यांचे खुमासदार सूत्रसंचलन यांनी कार्यक्रम दर्जेदार ठरला .
समाजातील अनेक संस्थांनी व लोकांनी प्रायोजकत्व स्वीकारून दातृत्व दाखविले व हा मेळावा यशस्वी करण्यात हातभार लावला. त्याबद्दल जैन महिला परिषदे कडून त्यांचे आभार मानले. शेवटी जॉ. सेक्रेटरी सौ. संगीता चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले. उपस्थित सर्व माहिलांना कापडी पिशव्यांमधून स्नॅक्स वाटप करण्यात आले.

मुकुट सप्तमीच्या शुभेच्छा 🙏🙏🙏
19/08/2026

मुकुट सप्तमीच्या शुभेच्छा 🙏🙏🙏

विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
18/08/2026

विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

15/08/2026
आपल्या कार्यकारिणी सदस्या सौ. सारिका ताई खुरपे यांच्या सासूबाईंचे अल्पशा आजाराने दूखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास ...
14/08/2026

आपल्या कार्यकारिणी सदस्या सौ. सारिका ताई खुरपे यांच्या सासूबाईंचे अल्पशा आजाराने दूखद निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🏻

12/08/2026

जैन महिला परिषद आयोजित
यशस्विनी मेळावा
१६ अॅागस्ट २०२६ दुपारी १.०० वाजता , केशवराव चौगुले सभागृह, कॅालेज कॅार्नर सांगली

दक्षिण भारत जैन सभेच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेले काही अविस्...
09/08/2026

दक्षिण भारत जैन सभेच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेले काही अविस्मरणीय क्षण. 🙏✨

परम पूज्य १०८ आचार्यश्री विद्यासागरजी महाराज ससंघ यांच्या मंगल पावन सान्निध्यात तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या शुभप्रसंगी आमदार मा. श्री. राजेंद्र शा. पाटील (यड्रावकर) साहेब यांच्या शुभहस्ते मा. श्री. भालचंद्र पाटील (अध्यक्ष, दक्षिण भारत जैन सभा) यांच्या अध्यक्षतेखाली सहकाररत्न मा. श्री. उत्तम रा. पाटील तसेच केंद्रीय उपाध्यक्ष मा. डॉ. रावसाहेब जि. पाटील, चेअरमन मा. श्री. संजय ध. शेटे, मुख्य महामंत्री मा.श्री. अनिल बागणे, संघटनमंत्री मा. श्री. शशिकांत बा. राजोबा या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दक्षिण भारत जैन सभा व शाखांचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध मान्यवर उपस्थित होते.

या शुभप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे व जैन समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार! 🙏

दक्षिण भारत जैन सभा परिवार

महा मानसी जैन महिला परिषद यांच्यामार्फत आज घेतल्या गेलेल्या छोट्याशा उपक्रमांमध्ये सौ प्राजक्ता  लठ्ठे यांच्या घरी छोट्य...
09/08/2026

महा मानसी जैन महिला परिषद यांच्यामार्फत आज घेतल्या गेलेल्या छोट्याशा उपक्रमांमध्ये सौ प्राजक्ता लठ्ठे यांच्या घरी छोट्या मुलांसाठी पाठशाळा आयोजित केली होती पाठशाळेसाठी सौ अक्षता लठ्ठे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुलांच्या आरोग्याबद्दल व त्यांच्या आरोग्यदायी आहाराबद्दल सौ स्नेहल चौगुले व सौ भाग्यश्री कद्रे यांनी लहान मुलांना माहिती समजावून सांगितली पूजा समाजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली ... जैन महिला परिषदेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभलेले सहकार्य सौ जयश्री तेरदाळे, सौ दीप्ती, सौ सुजाता तारे, सौ अस्मिता लोणकर, सौ भक्ति साळवी, सौ पद्मजा येलुरे, सौ प्राजक्ता लठ्ठे .... खूप छान हा अशा प्रकारे एक छोटासा उपक्रम घेण्यात आला

Address

171, Mahavirnagar
Sangli
416416

Telephone

+912332625700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jain Mahila Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jain Mahila Parishad:

Shortcuts

Share