03/12/2025
मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या कार्याचा जिल्ह्यापरिषदेच्या आरोग्य विभागाकडून गौरव•
गोवररुबेला लसीकरण मोहिमेला जनजागृती ,सक्रिय सहभागाची शासनाने घेतली दखल
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागा मार्फेत राबविण्यात आलेल्या गोवररूबेला लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला•
व्ही ओ-महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या वतीने गोवररूबेला मोहीम हाती घेण्यात आली होती ही मोहीम सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आली होती. समाजात या मोहिमेबद्दल सर्वधर्मीय समाजात जागृती नसल्याने अनेक गैरसमज निर्माण झाले होते.ही लस घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
अशा परिस्थितीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियांन पठाण यांनी सर्व समाजाच्या धर्मगुरू,जबाबदार संबंधित मदरसा,मस्जिदचे ट्रस्टी यांची भेट घेऊन त्यांना लसीचे महत्व सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य करत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या*.त्यातही पुढाकार घेतला होता.त्यासबंधी समाजात जागृती निर्माण झाली आणि या लसीच्या बाबत असलेले गैरसमज दूर झाले.आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गोवररुबेला लस घेतल्यानंतर त्याचे होणारे लाभ आणि आरोग्यावर त्याचा कसा सकारात्मक आणि चांगला परिणाम होतो. याचे महत्व पटवून दिले मदनी ट्रस्टच्या या आरोग्य विषयक कार्याची दखल घेत आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला हे सन्मानपत्र मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियांन पठाण यांनी स्वीकारले*. मदनी ट्रस्टच्या सामाजिक,सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक कार्याचा गौरव करून शासनाच्या *अनेक आरोग्यदायी योजना समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम व्हावे यासाठी शुभेच्छा डॉ विजयकुमार वाघ यांनी शुभेच्छा दिल्या*.