जयहिंद लोकचळवळ - Jaihind People's Movement

  • Home
  • India
  • Sangamner
  • जयहिंद लोकचळवळ - Jaihind People's Movement

जयहिंद लोकचळवळ - Jaihind People's Movement जागर लोकशाहीचा, निर्धार तरुणांचा, संकल्प सुदृढ समाजाचा.

15/05/2026

लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

समता, बंधुता आणि मानवतेचा विचार आपल्या गीतांमधून जनमानसात पोहोचवणारे वामनदादा कर्डक हे परिवर्तनवादी चळवळीचे प्रभावी आवाज होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी विचार आपल्या संपूर्ण आयुष्यभर गीतांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले.

जयहिंद लोकचळवळीलाही वामनदादांच्या विचारांची आणि गीतांची प्रेरणा लाभली आहे. “माणसा तुझे मी इथे गीत गावे...” हे गीत जयहिंद लोकचळवळचे थीम साँग असून, जयहिंदच्या प्रत्येक उपक्रमाची सुरुवात या प्रेरणादायी गीतानेच होते.

समताधिष्ठित आणि मानवतावादी समाज घडवण्याची प्रेरणा देणाऱ्या वामनदादांना विनम्र अभिवादन!

जयहिंद लोकचळवळचे शहादा, जि. नंदुरबार येथील समन्वयक चि. डॉ. हिमांशु जाधव आणि चि. सौ. कां. अदिती चव्हाण यांचा शुभविवाह सोह...
15/05/2026

जयहिंद लोकचळवळचे शहादा, जि. नंदुरबार येथील समन्वयक चि. डॉ. हिमांशु जाधव आणि चि. सौ. कां. अदिती चव्हाण यांचा शुभविवाह सोहळा काल शहादा येथे उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

या मंगल प्रसंगी जयहिंद लोकचळवळचे मार्गदर्शक मा. आमदार सत्यजीत दादा तांबे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले.

ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकणारे, थोर क्रांतीकारक सुखदेव थापर यांची आज जयंती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांच...
15/05/2026

ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकणारे, थोर क्रांतीकारक सुखदेव थापर यांची आज जयंती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या शूरवीराचे धैर्य, त्याग आणि देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रेरणा जागवते. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
#सुखदेव_थापर
#सुखदेव_थापर_जयंती

पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
14/05/2026

पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

🏏 जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आयोजित 🏏द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक तसेच भारतीय क्रिकेटपटू रोहि...
13/05/2026

🏏 जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आयोजित 🏏
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक तसेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचे मार्गदर्शक मा. दिनेश लाड सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली एकदिवसीय क्रिकेट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

📍 स्थळ : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल, संगमनेर
दिनांक : १६ मे २०२६

क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवा खेळाडूंना अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.

📝 नाव नोंदणीची अंतिम तारीख : १४ मे २०२६
✅ प्रवेश विनामूल्य
आजच आपले नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्या!

मुंबई तकच्या पत्रकार छाया काविरे आणि प्राध्यापक प्रतीक बर्गे यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा दहा तारखेला सिंहगड येथे...
13/05/2026

मुंबई तकच्या पत्रकार छाया काविरे आणि प्राध्यापक प्रतीक बर्गे यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा दहा तारखेला सिंहगड येथे संपन्न झाला.

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी समाजाला दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि विवेकाच्या विचारांचा वारसा जपत साधेपणाने आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित हा विवाह पार पडला.

सत्यशोधक विवाह पद्धती ही केवळ एक परंपरा नसून स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि मानवतावादी विचारांची जपणूक करणारी एक प्रबोधनाची चळवळ आहे. अशा विचारांना स्वीकारत आयुष्यभर समतेच्या मार्गावर चालण्याचा निर्धार उभयतांनी केला ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.

छाया काविरे आणि प्रतीक बर्गे या उभयतांना भावी आयुष्यासाठी जयहिंद लोकचळवळ कडून हार्दिक शुभेच्छा!

जयहिंद लोकचळवळचे सिन्नर, ता. नाशिक येथील सहकारी प्रणव खुळे यांचे बंधू प्रदीप खुळे आणि नेहा खताळे यांच्या शुभविवाहानिमित्...
13/05/2026

जयहिंद लोकचळवळचे सिन्नर, ता. नाशिक येथील सहकारी प्रणव खुळे यांचे बंधू प्रदीप खुळे आणि नेहा खताळे यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित हळदी समारंभास माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी आनंददायी वातावरणात जयहिंद लोकचळवळचे समन्वयक शुभम खुळे यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.
खुळे आणि खताळे परिवारास पुढील वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा तसेच शुभम खुळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

अविरत रुग्णसेवेचे व्रत अंगीकारून समर्पणाने कर्तव्य बजावणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक श...
12/05/2026

अविरत रुग्णसेवेचे व्रत अंगीकारून समर्पणाने कर्तव्य बजावणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

नेवासा जिल्हा,अहिल्यानगर येथील जयहिंद लोकचळवळ चे समन्वयक ॲड. जैद शेख आणि डॉ आयेशा यांच्या शुभविवाह प्रसंगी जयहिंद लोकचळव...
11/05/2026

नेवासा जिल्हा,अहिल्यानगर येथील जयहिंद लोकचळवळ चे समन्वयक ॲड. जैद शेख आणि डॉ आयेशा यांच्या शुभविवाह प्रसंगी जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यावेळी जयहिंद लोकचळवळचे समन्वयक अनंत शिंदे, हर्षल थेटे, अंकुश आरोटे उपस्थित होते.

युवा सर्वांगीण विकास शिबिर 2026 चा समारोप काल जयहिंद लोकचळवळचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांच्या उपस्थित...
11/05/2026

युवा सर्वांगीण विकास शिबिर 2026 चा समारोप काल जयहिंद लोकचळवळचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या 5 दिवसीय शिबिरात 11 ते 16 वयोगटातील 100 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

शिबिरात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. योगा, एरोबिक्स, मैदानी खेळ, पथनाट्य, नाटक, अभिनय, नृत्य, गीतगायन आणि झांज, मातीकाम, पेंटिंग, कागदकाम, ओरिगामी, हॉर्स रायडिंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रा. बाबा खरात, शिवाजी नाईकवाडी, हिरालाल पगडाल सर, स्वप्निल मानव, अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे प्राचार्य आशिष कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मॉडेल स्कूलचे प्राचार्य आशिष कुमार आणि शोभा हजारे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनंत शिंदे, बजरंग जेडगुले आणि हर्षल थेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिरात वैभवी प्रेमलता संजय आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव, तेजस पवार यांसह अनेक प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. सहासी खेळ, योगा, छायाचित्रण, रायफल शूटिंग, स्काऊट गाईड, प्रथमोपचार, ट्रेकिंग, संगीत, संस्कार आणि अभिनय यांसारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
#युवा_सर्वांगीण_विकास_शिबीर
#जयहिंदलोकचळवळ

#अमृतवाहिनी_शिबिर

Address

JAI HIND LOK CHALWAL, Navin Akole Road, AHMEDNAGAR , Pin
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when जयहिंद लोकचळवळ - Jaihind People's Movement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जयहिंद लोकचळवळ - Jaihind People's Movement:

Share