Lions Club Hatkhamba Royal

Lions Club Hatkhamba Royal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lions Club Hatkhamba Royal, Nonprofit Organization, Ratnagiri.

17/08/2025
10/12/2024

*लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल च्या सामाजिक उपक्रमांच्या मदतनिधीसाठी "स्थळ आले धावून!!*"

रत्नागिरी,
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था लायन्स क्लब ची शाखा लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल गेले तीन वर्ष सामाजिक,आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रात समाज उपयोगी उपक्रम राबवत असून वर्षभर चालणाऱ्या या विविध उपक्रमांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमातून आर्थिक पाठबळ उभे करते. अशा उपक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल तर्फे राबवले जातात.
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही अशा प्रकारचा उपक्रम राबवला जात आहे. त्यानिमित्ताने रत्नागिरीकरांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल घेऊन येत आहे, दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेली, मुरलेल्या मुरंब्याप्रमाणे गोड लव स्टोरी, "स्थळ आले धावून"
संजय मोने, डॉ. गिरीश ओक व पुर्णिमा तळवळकर या तीन दिग्गज कलाकारांच नवं कोरं नाटक रत्नागिरीत पहिल्यांदाच १० डिसेंबर रोजी सादर होत आहे. ज्येष्ठ कलाकार संजय मोने व डॉक्टर गिरीश ओक यांची २५ वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र जुगलबंदी पाहण्याचा योग लायन्स क्लब ऑफ हातखंबाच्या निमित्ताने रत्नागिरी करांना लाभत आहे.
या प्रायोगिक नाटकाच्या प्रयोगातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग हा लायन्स क्लबच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. तरी सर्व रत्नागिरीकरांना लायन्स क्लब तर्फे आवाहन करण्यात येते की आपण या नाट्यप्रयोगाचा आनंद घेण्यासोबत आपल्या उपस्थितीमुळे सामाजिक आपला हातभार लागणार आहे.
तरी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या उपक्रमासाठी सहभाग नोंदवून सामाजिक कार्यासाठी एक मदतीचा हात देण्याचे आवाहन लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lions Club Hatkhamba Royal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share