06/09/2025
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या, मी सर्वांचा मनापासून आभारी आहे, असेच प्रेम , स्नेह सदोदित राहू द्यावे ही प्रेमळ अपेक्षा. मी अतिशय लहानसा सामाजिक कार्यकर्ता आहे, कोठेही तसेच कोणत्याही स्थरावरील आजी माजी पदाधिकारी नाही, कोणत्याही छोट्या वा मोठ्या राजकीय पक्ष अथवा संघटना नेता/ पुढारी/ कार्यकर्ता नव्हतो/ नाही. तरी देखील समाज व समाज माध्यमे दखल घेतात ही माझ्यासाठी खूप ऊर्जा देणारी बाब आहे असे मी समजतो.
पर्याय प्रतिष्ठान च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आदिवासी विकास, महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण इत्यादी उपक्रम माझ्या क्षमतेनुसार चालू असतात, समाजातील विविध मान्यवरांच्या सहकार्याने व पाठबळावर हळूहळू व्याप वाढत आहे ही आनंदाची बाब आहे.
यशदा- शासकीय प्रशिक्षण संस्था,पुणे/ जि प पुणे यांच्या माध्यमातून खेड आणि आजूबाजूच्या 5/6 तालुक्यातील विविध पंचायतराज संस्था पदाधिकारी यांच्या समवेत अनेक वर्षांपासून काम करताना मला खूप शिकायला मिळते
येणाऱ्या वर्षात आण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्ग विकास महामंडळ तसेच अन्य शासकीय विभाग/ योजना यांची माहिती देऊन स्वयंरोजगार साठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करतोय, पाहू या काय होतंय ते.
माझ्यावर प्रेम करणारी मित्र मंडळी, नातेवाईक, हितचिंतक,सहकारी तसेच कुटुंबीय हेच माझे उर्जास्थान आहेत, या सर्वांच्या ऋणात राहणेच पसंद करतो
पुनश्च धन्यवाद/ आभार
जय जिजाऊ!
जय शिवराय!
जय भीम !
जय क्रांतीज्योती!
भगवान बिरसा मुंडा की जय!!
आपला
वामन बाजारे