18/04/2026
आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण! 🌟
“सार्वमत कृषी आयकॉन्स” हा प्रतिष्ठित पुरस्कार श्री नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव मा. प्रा. लक्ष्मण देवराम गोर्डे सर यांना दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 🙏
ग्रामीण व आदिवासी भागातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, बोरवेल, मोटार व RO प्रणाली बसविणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.
याशिवाय विद्यार्थिनींना वर्षभरासाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करून आरोग्य व स्वच्छतेबाबत मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण भागात तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णवाहिका सेवा, मुलींसाठी स्वच्छतागृह बांधकाम, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांच्या मैदानांचे सपाटीकरण आणि बेंचेस उपलब्ध करून देणे यांसारखे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत.
या सर्व सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी कृषी क्षेत्राकडेही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विविध प्रयोग, जलसंधारण व सिंचन उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या गोर्डे सरांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची योग्य दखल आहे.
त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐