महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्कार

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्कार

महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्कार The official page of Maharashtra Foundation Awards.

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२५  वितरण समारंभातील काही क्षणचित्रे...
18/01/2026

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२५ वितरण समारंभातील काही क्षणचित्रे...


जरूर या..उद्या सायंकाळी 5 ते 7:30स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे
16/01/2026

जरूर या..
उद्या सायंकाळी 5 ते 7:30
स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे


सप्रेम नमस्कारअमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने...
09/01/2026

सप्रेम नमस्कार

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने, १९९४ पासून साहित्य क्षेत्रातील, तर १९९६ पासून समाजकार्य क्षेत्रातील व्यक्तींना वा संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. या पुरस्काराचे संयोजन २०१९ पासून महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) पुणे आणि साधना ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. २०२५ या वर्षी साहित्य आणि समाजकार्य या दोन क्षेत्रांतील मिळून आठ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून, गणेश देवी उपस्थित राहणार आहेत.

कृपया या समारंभाला आपण मित्रपरिवारासह यावे.

आपले नम्र,

प्रतिभा देशमुख
अध्यक्ष, सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार (अमेरिका)

शोभा चित्रे
निवड समिती समन्वयक, सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)

विवेक पाटणकर
अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)

मनीषा गुप्ते
सह समन्वयक, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे

रमेश अवस्थी
सह समन्वयक, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे

विनोद शिरसाठ
साधना ट्रस्ट, पुणे

मुकुंद टाकसाळे
समन्वयक, साहित्य पुरस्कार निवड समिती, पुणे

शनिवार दि. 17 जानेवारी 2025,
सायंकाळी 5 ते 7:30
स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे


सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२५अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थ...
16/12/2025

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२५

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने २०२५ या वर्षासाठीचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर केले आहेत. साहित्य क्षेत्रात चार, सामाजिक क्षेत्रात तीन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार एक अशा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराचे मासूमचे संयोजक डॉ. मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी, साहित्य पुरस्कार निवड समितीचे समन्वयक मुकुंद टाकसाळे आणि साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ या चौघांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) आणि साधना ट्रस्ट या दोन संस्थांच्या वतीने या पुरस्कारांचे संयोजन केले जाते.

यावर्षीचा दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना , ग्रंथ पुरस्कार (ललित( निखिलेश चित्रे यांच्या "गॉगल लावलेला घोडा" या कथासंग्रहाला, ग्रंथ पुरस्कार (वैचारिक /अपारंपरिक) विनय नारकर यांच्या वस्त्रगाथा ला तर रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार ऋत्विक व्यास यांच्या " पाच मजली हॉस्पिटल " या नाट्यसंहिताला देण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपात असून , दोन ग्रंथ पुरस्कार आणि नाट्यलेखन पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात दिले जाणार आहेत.

यावर्षीचा समाजकार्याचा जीवनगौरव पुरस्कार लीलाताई चितळे यांना दिला जात आहे. दोन कार्यकर्ता पुरस्कार आहेत. त्यामध्ये जावेद पाशा यांना कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार तर दत्ता देसाई यांना कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार दिला जाणार आहे. समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार दोन लक्ष रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात असून, दोन्ही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात आहेत. याशिवाय, एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार या वर्षी मनिष राय चौधरी ( पं. बंगाल) यांना दिला जाणार आहे.

हे सर्व आठ पुरस्कार १७ जानेवारी २०२६ रोजी शनिवार, सायंकाळी ५ वाजता पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे गणेश देवी असतील आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मागील ३२ वर्षांपासून साहित्य पुरस्कार, तर मागील ३० वर्षांपासून समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात . या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले, त्यामुळे त्यावर्षी पासून या सर्व पुरस्कारांचे नाव सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार असे करण्यात आले आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी भारतात व अमेरिकेत स्वतंत्र निवड समित्या होत्या. पुरस्कारांच्या निवड समितीचे सदस्य व अध्यक्ष आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन चे काही सदस्य या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती, या पुरस्कारांच्या निमंत्रक व मासूमच्या सहसमन्वयक मनीषा गुप्ते यांनी दिली आहे.

Ramesh Awasthi Hamid Dabholkar Sadhana- साप्ताहिक साधना


पन्नालाल भाऊंना विनम्र अभिवादन !पन्नालाल सुराणामहाराष्ट्र फाउंडेशन विशेष गौरव पुरस्कार- २००६पन्नालाल सुराणा म्हटले की डो...
04/12/2025

पन्नालाल भाऊंना विनम्र अभिवादन !

पन्नालाल सुराणा
महाराष्ट्र फाउंडेशन विशेष गौरव पुरस्कार- २००६

पन्नालाल सुराणा म्हटले की डोळ्यांसमोर येते ते उंचेपुरे धिप्पाड व्यक्तिमत्व. सतत पायाला भिंगरी लावून देशभर संचार करणारे. सातत्याने कार्यकर्त्यांसाठी पत्रे, वर्तमानपत्रांसाठी लेख किंवा चळवळीसाठी पुस्तिका लिहिणारे. कोणत्याही शिबिरात साध्या सोप्या विषयांची मांडणी करणारे. स्वत: साधेपणा आणि काटकसरी वृत्ती आचरणारे व इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणारे. वेळेचे नियोजन काटेकोरपणे करणारे आणि इतरांनीही वेळा पाळाव्यात आणि प्रत्येक मिनिट कामांसाठी कारणी लावावा असा आग्रह धरणारे.

अधिक वाचण्यासाठी लिंक :
https://maharashtrafoundationawards.com/project/pannalal-surana/ #

पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणाची चित्रफित पाहण्यासाठी लिंक :
https://www.youtube.com/watch?v=jhL4GUs6nWI

पन्नालाल सुराणा महाराष्ट्र फाउंडेशन विशेष गौरव पुरस्कार- २००६ पन्नालाल सुराणा म्हटले की डोळ्यांसमोर येते ते उं.....

डॉ. जयंत नारळीकर यांना 2012 चा महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत ...
21/05/2025

डॉ. जयंत नारळीकर यांना 2012 चा महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि अ. पा. देशपांडे यांनी त्यांची ओळख करून दिलेला लेख वाचण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या :
https://maharashtrafoundationawards.com/project/jayant-naralikar-2013/

ज्येष्ठ विचारवंत न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे काल निधन झाले. त्यांना विनम्र आदरांजली..न्या. नरेंद्र चपळगावकर यांना  महार...
26/01/2025

ज्येष्ठ विचारवंत न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे काल निधन झाले. त्यांना विनम्र आदरांजली..

न्या. नरेंद्र चपळगावकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा 2021 चा दिलीप वि.चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचे दोन व्हिडिओ..

लिंक : भाग 1
https://youtu.be/xdaeskAB-WQ?feature=shared

लिंक : भाग 2
https://youtu.be/YapRiSIGaaA?feature=shared

महाराष्ट्र फाउंडेशनच्या स्मरणिकेतील डॉ. सुधीर रसाळ यांनी न्या. चपळगावकर यांच्यावर लिहिलेला लेख वाचण्यासाठी लिंक : https://maharashtrafoundationawards.com/project/narendra-chapalgaovkar/

Mukund Taksale

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2024पुरस्कार वितरण समारंभ, शनिवार 18 जानेवारी 2025 रोजी एस...
22/01/2025

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2024
पुरस्कार वितरण समारंभ, शनिवार 18 जानेवारी 2025 रोजी एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झाला त्याची काही क्षणचित्रे...

हार्दिक निमंत्रणसुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2024पुरस्कार वितरण समारंभवेळ : शनिवार 18 ज...
18/01/2025

हार्दिक निमंत्रण

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2024
पुरस्कार वितरण समारंभ
वेळ : शनिवार 18 जानेवारी २2025
सायंकाळी : 5 ते 7:30
स्थळ : एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे 411030

जरूर या..

हार्दिक निमंत्रणसुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2024पुरस्कार वितरण समारंभवेळ : शनिवार 18 ज...
16/01/2025

हार्दिक निमंत्रण

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2024

पुरस्कार वितरण समारंभ

वेळ : शनिवार 18 जानेवारी २2025
सायंकाळी : 5 ते 7:30
स्थळ : एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे 411030

जरूर या..

Mukund Taksale

हार्दिक निमंत्रणसुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२४सप्रेम नमस्कारअमेरिकेत स्थायिक झालेल्य...
10/01/2025

हार्दिक निमंत्रण

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२४

सप्रेम नमस्कार
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने, १९९४ पासून साहित्य क्षेत्रातील, तर १९९६ पासून समाजकार्य क्षेत्रातील व्यक्तींना वा संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. या पुरस्काराचे संयोजन २०१९ पासून महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) पुणे आणि साधना ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. २०२४ या वर्षी साहित्य आणि समाजकार्य या दोन क्षेत्रातील मिळून आठ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. या समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून, डॉ. मीरां चड्डा बोरवणकर उपस्थित राहणार आहेत.

कृपया या समारंभाला आपण मित्रपरिवारासह यावे.

आपले नम्र,
विवेक पाटणकर
अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)
प्रतिभा देशमुख
अध्यक्ष, सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार
शोभा चित्रे
निवड समिती समन्वयक, सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)
मनीषा गुप्ते
सह समन्वयक, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे
रमेश अवस्थी
सह समन्वयक, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे
विनोद शिरसाठ
साधना ट्रस्ट, पुणे
मुकुंद टाकसाळे
समन्वयक, साहित्य पुरस्कार निवड समिती, पुणे

पुरस्कार वितरण समारंभ

समारंभाच्या प्रमुख पाहुण्या मा. डॉ. मीरां चड्डा बोरवणकर
या समारंभात प्रा. आ. ह. साळुंखे, डॉ. शरद जावडेकर, देवेंद्र सुतार आणि प्रमुख पाहुणे डॉ. मीरां चड्डा बोरवणकर यांची भाषणे होतील.

तसेच विलास शेळके,अंजली चिपलकट्टी, वामन पंडित, हसीना खान आणि डॉ. रूपेश पाटकर यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफीत दाखवली जाईल, याचवेळी सर्व आठ पुरस्कारप्राप्त व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातील.

वेळ : शनिवार १८ जानेवारी २०२५
सायंकाळी : ५ ते ७.३०
स्थळ : एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे ४११०३०.

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्कार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share