This is Non profit organization. उदयकाळ फौंडेशन ही सामाजिक संस्था सन २०१२ पासून विविध समाजिक कार्यक्रम समाजा मध्ये राबवीत असते. संस्थेची अधिकृत पणे २०१५ साली नोदणी झाली असून संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल यांनी अमळनेर या शहारत सुरु केली. उदयकाळ हे अंधारातून उजेडाकडे वाट दाखवण्याचे काम करत आले आहे यांच विचारांनी श्री. बाळकृष्ण बागुल यांनी आपल्या साप्ताहिक उदयकाळ या वृत्तपत्रा सोबतच सामाजिक क
ाम करण्यासाठी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेची स्थापना केली. संस्थेचे मुख्य उद्देश समाजातील सर्व स्तराचा सर्वागिण शाश्वत विकास करणे ज्यामुळे समाजातील विषमता कमी होईल. संस्थेने आज वर विविध सामाजिक कार्यक्रम घेतले असून भविष्यात विविध स्तरातील कंपनी व शासकीय विभागा अंतर्गत प्रकल्प घेऊन अमळनेर शहरात शाश्वत विकासासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
उदयकाळ संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व उपजीविकेचे साधन या मुख्य क्षेत्रात काम करत असते. या विविध क्षेत्रात काम करतांना शाश्वत विकास हा कशा करता येईल यांची काळजी घेऊन प्रकल्प तयार केले जाते. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असून सध्या संस्था अमळनेर या शहरात काम करण्याचे ठरवले आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागाचा विकास करून समाजातील लोकांना सक्षम करणे ज्यामुळे ते स्वतः समाजतील विषम परिस्थितीतून बाहेर येतील. यासाठीच आता पर्यत संस्थेने सामाजिक उपक्रम घेऊन आपले काम सुरु ठेवले आहे.
ज्या उपक्रम मुळे समाजातील लोकांना संस्थे कडून अधिक अशा व अपेक्षा वाटू लागल्या आहे त्यामुळे संस्था विविध प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.