स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Pune
  • स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान
Call Directions Website Contact the organization

स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान दानोपभोगरहिता दिवसा यस्य यान्ति वै। ?

एकनाथकाका प्रतिष्ठान हे शैक्षणिक ,सामाजिक ,आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे अग्रगण्य प्रतिष्ठान आहे.जे की एकनाथकाका यांच्या प्रेरणातुन उभारले गेले आहे .एकनाथकाका प्रतिष्ठान ची स्थापना 2007.

02/09/2026

गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय, हिवरे येथे स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा एक छोटासा हातभार म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले.
या वह्या वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. एम. के. नाना गायकवाड, मा. शबीरभाई शेख, मा. रमेश कुदळे, मा. सुदर्शन कुदळे, मा. सागर कुदळे व मा. नंदूशेठ गायकवाड व प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

01/09/2026
नसरापुर बालिका अत्याचार व क्रूर हत्या प्रकरणाचा सासवड येथे तीव्र निषेध व्यक्त केला व आरोपीला तात्काळ फाशीची देण्याची माग...
06/05/2026

नसरापुर बालिका अत्याचार व क्रूर हत्या प्रकरणाचा सासवड येथे तीव्र निषेध व्यक्त केला व आरोपीला तात्काळ फाशीची देण्याची मागणी समस्त सासवडकर नागरिकांच्या वतीने करण्यात आली आणि चिमुकलीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. भीमराव कांबळे या नराधमास फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी असे निवेदन स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान च्या वतीने चिमुकली कु.मुक्ता शिवरकर हिच्या हस्ते पोलिसांना आज दिले .

14/03/2026

स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान सासवड यांच्या वतीने हरणी येथील वनक्षेत्रातील पानवठ्या मध्ये वन्यजीवांसाठी पाण्याचा टँकर सोडण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सचिव हेमंत ताकवले, सुयश इन्फोटेकचे गणेश सर, चव्हाण सोनोग्राफी सेंटरचे डॉ.हर्षल चव्हाण, परिंचेचे पाटील विक्रमसिंह जाधव, जयहिंद ऍग्रोचे साजिद शेख,प्राध्यापक संदीप कदम उपस्थित होते. पुढील दोन महिने हा उपक्रम प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येणार आहे.

सध्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना शुभेच्छा व निरोप समारंभाचे आयोजन केले ह...
18/02/2026

सध्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना शुभेच्छा व निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये १) श्री.कातोबा स्कूल दिवे, २) रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर,३) सदगुरु नारायण महाराज माध्यमिक विद्यालय नारायणपूर,४) कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी, ५) कृषी औद्योगिक विद्यालय कोडीत. या शाळांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेसाठी उपयुक्त कंपास पेटी व बेस्ट ऑफ लक किट चे वाटप केले.

पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे  STEM  lab च्या उद्घाटनप्रसंगी  उपस्थित राहून आयोजित विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली....
23/01/2026

पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे STEM lab च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आयोजित विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध वैज्ञानिक प्रयोग आवर्जून पाहिले व त्यामागील संकल्पना समजून घेतल्या. मुलांच्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होऊन नव्या संशोधनाला चालना मिळेल.

Address

Ram Heights, Hadako Road, Near Deccan Bank, Saswad Tal-Purandhar Dist-Pune, 9422522527
Pune
412301

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919422522527

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान:

Shortcuts

Share