Goodwill India

Goodwill India Goodwill India is a Non-Profit NGO which collects then Washes, Alters, Irons and then distributes use We further distribute them to needy people.

You can donate used clothes, utensils, and other reusable household items to us .

'गुडविल' च्या कामाची शासनाने दखल घ्यावी : ग्रुप कॅप्टन फाटकगुडविल इंडिया या सामाजिक संस्थेचे काम पथदर्शक आहे. महाराष्ट्र...
15/04/2026

'गुडविल' च्या कामाची शासनाने दखल घ्यावी : ग्रुप कॅप्टन फाटक

गुडविल इंडिया या सामाजिक संस्थेचे काम पथदर्शक आहे. महाराष्ट्र शासनाने या कामाची दखल घेऊन ते राज्याच्या विविध भागात न्यावे असे प्रतिपादन एअर फोर्स मधील ग्रुप कॅप्टन (निवृत्त) सुहास फाटक यांनी आज येथे केले.

गुडविल इंडियाच्या कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत किरण राजपूत, उत्तमनगर आणि श्रुतिका साळुंखे, कर्वेनगर या दोन गरजू मुलींना भांड्यांचा संसार श्री सुहास फाटक आणि सौ फाटक तसेच विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळेस ते बोलत होते. यावेळेस गुडविल इंडियाचे संस्थापक कालिदास मोरे, विश्वस्त संपदा अलाटे, विवेक विप्रदास, मुक्त पत्रकार प्रसाद घारे आदी उपस्थित होते.

सुहास फाटक आणि विनायक डावरे यांनी गुडविल करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. समाजातील वंचित घटकास गुडविलच्या विविध उपक्रमातून मदतीचा हात दिला जातो ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय आहे.असे ते म्हणाले.

श्री कालिदास मोरे यांनी प्रारंभी प्रमुख पाहुणे श्री फाटक, सौ फाटक आणि श्री डावरे यांचे पुष्पगुच्छ व गुडविल वरील पुस्तक भेट देऊन स्वागत केले. तसेच प्रास्ताविकात गुडविल इंडियाच्या उपक्रमाची माहिती दिली. धीरजकुमार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

प्रि- ऑस्करच्या 65 नॉमिनिजने  गुडविल इंडियाच्या कामाची घेतली दखल : कालिदास मोरेपुणे, १ एप्रिल २०२६ अमेरिकेतील प्री ऑस्कर...
13/04/2026

प्रि- ऑस्करच्या 65 नॉमिनिजने गुडविल इंडियाच्या कामाची घेतली दखल : कालिदास मोरे

पुणे, १ एप्रिल २०२६ अमेरिकेतील प्री ऑस्कर नाॅमिनींसाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात गुडविल इंडियाच्या कामाची माहिती सांगण्याची संधी मिळाली ही गुडविल च्या दृष्टिने आनंदाची गोष्ट होती असे प्रतिपादन गुडविल इडियांचे संस्थापक कालिदास मोरे यांनी आज येथे केले.

अमेरिकेतील लाॅस एंजलिस येथे झालेल्या प्री ऑस्कर नाॅमिनींसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होवून श्री मोरे नुकतेच भारतात परतले. यानिमित्त परिवर्तन, दीपस्तंभ स्वप्नशिल्प व ताथवडे गार्डन ग्रुप या समविचारी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस ते बोलत होते.

यावेळी परिवर्तन ग्रुपचे गुलाब देडगे, समीर जाधवराव, जीवन जाधव, राहुल मोकाशी आणि किशोर ढगे. दीपस्तंभचे अमेय जोशी, स्वप्नशिल्प सोसायटीचे अरविंद लेले, विवेक विप्रदास, झानपुरे. गार्डन ग्रुपचे सुनील नखाते, संजय पायगुडे, चव्हाण, पत्रकार महादेव पवार तसेच गुडविल इंडियाच्या विश्वस्त संपदा अलाटे, रजनी मोरे, अनिश मोरे, प्रसाद घारे, प्रशांत व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री मोरे म्हणाले, गुडविल इंडियाची कल्पना मला अमेरिकेतील गुडविल स्टोअर पाहूनच सुचली होती. गेली तेरा वर्ष गुडविल इंडिया जुने कपडे गोळा करणे, रोज १५०० जणांना मोफत जेवण देणे, लग्न ठरलेल्या गरीब मुलींना भांड्यांचा संसार देणे आणि महिला सबलीकरण अशी विविध कामे करीत आहे. हे काम अमेरिकेतील जनतेला सांगायला मिळाले ही नक्कीच आनंदाची गोष्ट होती.

प्रि ऑस्कर नाॅमिनेशन मिळालेल्या ६५ जणांना गुडविल च्या वतीने श्री कालिदास मोरे यांची अमेरिकास्थित कन्या अनघा देशमुख आणि जावई विजय देशमुख यांनी गुडविल इंडियाची माहिती दिली. यातील काही जणांनी ऑगस्ट मध्ये पुण्यात येऊन गुडविलचे काम समजून घेण्याची तयारी दर्शविली आहे.

यावेळेस उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींनी यथोचित भाषणे केली आणि गुडविल च्या भविष्यातील कामास शुभेच्छा दिल्या. अनिश मोरे यांनी आभार मानले. श्री धीरजकुमार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मॉडर्न कॉलेजच्या मधील विद्यार्थी, आजी व माजी प्रोफेसर्स यांचा गुडविलसाठी कपडे संकलन उपक्रमाचे आयोजनपुणे : प्रोग्रेसिव्ह ...
10/04/2026

मॉडर्न कॉलेजच्या मधील विद्यार्थी, आजी व माजी प्रोफेसर्स यांचा गुडविलसाठी कपडे संकलन उपक्रमाचे आयोजन

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बी.एड. कॉलेजने मधील आजी माजी प्रोफेसर्स व विद्यार्थी यांनी सामाजिक कार्याची दखल घेत गुडविल इंडिया साठी नको असलेल्या कपडे संकलनाचा कार्यक्रम राबविला. याप्रसंगी प्रोफेसर व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने कपडे गोळा केले होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. तृप्ती भालेराव यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन मोठ्या संख्येने कपडे गोळा केले. व त्याला विद्यार्थी व प्रोफेसर्स यांनी उत्तम प्रतिसाद दिला. या वेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निस्वार्थी सेवेबद्दल गुडविलतर्फे सन्मानपूर्वक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या त्यांच्या हातभारामुळे ही मदत तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचणार आहे.

गुडविल इंडियाच्या विश्वस्त सौ. रजनी अनीश मोरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या करिअरविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षणा बरोबर समाजकार्याची देखील जाणीव ठेवून पुढे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमास कॉलेजमधील सर्व प्रोफेसर्स, विद्यार्थी, कर्मचारी व गुडविल टीमचे सदस्य हजर होते.

कावेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपपुण्यातील प्रसिद्ध कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील 3...
08/04/2026

कावेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

पुण्यातील प्रसिद्ध कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत, गुडविल इंडिया या सामाजिक संस्थेकडून त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या निस्वार्थी सेवेबद्दल सन्मानपूर्वक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
गुडविलतर्फे ट्रस्टी सौ रजनी मोरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या करिअर बद्द्लही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गुडविलतर्फे संपदा अलाटे, स्वप्निल माळी, धनंजय पवार व इतर कर्मचारी हजर होते.

मुथूट फायनान्स व गुडविल इंडियाचा स्तुत्य उपक्रम, २५ विद्यार्थ्यांना सायकली भेट.गेल्या 13 वर्षांपासून पुण्यातील विविध भाग...
01/04/2026

मुथूट फायनान्स व गुडविल इंडियाचा स्तुत्य उपक्रम, २५ विद्यार्थ्यांना सायकली भेट.

गेल्या 13 वर्षांपासून पुण्यातील विविध भागामध्ये सतत सामाजिक कार्य करत असणाऱ्या गुडविल इंडिया या सामाजिक संस्थेने मुथुट फायनान्स च्या सहयोगाने तोरणा विद्यालय,ता वेल्हे येथील २५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. ​
या ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुथूट फायनान्सचे प्रादेशिक अधिकारी व नि. लेफ्टनंट कर्नल श्री सचिन घोरपडे, श्री शरण बोलशेट्टी, गुडविल इंडियाचे विश्वस्त चंद्रशेखर मोरे, संपदा अलाटे, स्वप्निल माळी, स्वाती पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
​याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट कर्नल सचिन घोरपडे यांनी आपल्या जीवनातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी असेल, तर जगात कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही." तर चंद्रशेखर मोरे यांनी गुडविल इंडियाच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देत भविष्यातही शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्यध्यापक मा. चव्हाण सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे व गुडविलच्या संपूर्ण टीमचे स्वागत करत सत्कार केला. जेष्ठ शिक्षक सागळे सरांनी प्रस्ताविक सादर करतांना विद्यालयात सुमारे ५२० विद्यार्थी शिक्षण घेत असुन यातील अनेक विद्यार्थी ५ ते १० किलोमीटर अंतरावरून पायपीट करत शाळेत येतात, ज्यामुळे त्यांना वेळेवर पोहोचणे कठीण होते हे नमूद करत विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. श्री चव्हाण सर यांनी विद्यालयातील गरजा आणी विद्यालयाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली.
प्रसंगी कु. चैत्राली मराडे, गोऱ्हे या गरजू मुलीला तिच्या विवाहप्रित्यर्थ गुडविल तर्फे संपूर्ण भांड्यांचा संच, साडी व चप्पल भेट म्हणुन देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुतवळ सर व आभार प्रदर्शन श्री मुठे सर यांनी केले.
​या उपक्रमासाठी गुडविलचे धनंजय पवार आणि शाळेचे सेवक श्री. कांबळे मामा यांचे विशेष सहकार्य लाभले. सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थी, त्यांचे पालक व संपुर्ण शिक्षक वृंद यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

विद्यार्थ्यांनी सोशल मिडियापासून दूर रहावे : दिलीप ओक पुणे, मार्च २०२६  महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थांनी सोशल मिडिय...
30/03/2026

विद्यार्थ्यांनी सोशल मिडियापासून दूर रहावे : दिलीप ओक
पुणे, मार्च २०२६ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थांनी सोशल मिडिया आणि मोबाईलपासून चार हात दूर रहावे. कारण हे एक प्रकारचे विषच आहे. तरुणाईने कष्ट, वाचन, सामाजिक भान याची कास धरावी यातूनच त्यांचा उत्कर्ष होईल असे प्रतिपादन ओक अकॅडमीचे संचालक सीए दिलीप ओक यांनी केले.

गुडविल इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने अपर्णा ठोंबरे, चेतना पवार, ऋतिका निवंगुणे या तीन गरजू मुलींना कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत भांड्यांचा संसार (झाल) देण्यात आला त्यावेळेस श्री ओक बोलत होते. यावेळेस 'बीएमसीसी' काॅलेज चे माजी विद्यार्थी कीर्तनकार श्रीकृष्ण बराटे, निवेदक सुहास धारणे, गुडविलचे कालिदास मोरे, विवेक विप्रदास, प्रशांत व्यास, पत्रकार प्रसाद घारे, संपदा अलाटे, कावेरी काॅलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रारंभी गुडविलच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कालिदास मोरे यांनी प्रास्ताविकात गुडविलच्या कन्यारत्न विवाह मदत योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेतून आजपर्यंत अकराशे मुलींना भांड्यांचा संसार देण्यात आला असून यंदा दोनशे मुलींना असा संसार देण्याचा विचार आहे. श्रीकृष्ण बराटे म्हणाले, गुडविल आणि मोरे परिवार 'जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले' असे म्हणत समाजातील गरीब जनतेची सेवा करीत आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तरुणाईला यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही असे सुहास धारणे यांनी नमूद केले. धीरजकुमार इंगोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

गुंज फाउंडेशन, दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष श्री अंशु गुप्ता यांना मोरे वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेने केलेल्या सामाजिक कार्य...
27/03/2026

गुंज फाउंडेशन, दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष श्री अंशु गुप्ता यांना मोरे वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देणारे 'गुडविल: लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम' हे पुस्तक देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालिदास मोरे, चंद्रशेखर मोरे, संपदा अलाटे, स्वप्नील माळी आणी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे डेप्युटी डायरेक्टर ऋषिकेश धांडे उपस्थित होते.
हि संस्था संपूर्ण भारतातील प्रमुख शहरांमधील जुने कपडे आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून त्या ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवते आणि त्या बदल्यात तिथे विकासकामे घडवून आणते.

'श्री पेरुमल थुनाई काऊबॉयज मित्र मंडळ' धारावी तर्फे गुडविल इंडिया संस्थेचा सन्मान.​धारावी, मुंबई येथील सामाजिक क्षेत्रात...
20/02/2026

'श्री पेरुमल थुनाई काऊबॉयज मित्र मंडळ' धारावी तर्फे गुडविल इंडिया संस्थेचा सन्मान.

​धारावी, मुंबई येथील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्री पेरुमल थुनाई काऊबॉयज मित्र मंडळातर्फे नुकताच गुडविल इंडिया संस्थेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विधायक कामांना प्रोत्साहन देण्यासाठी गुडविलतर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
​व्यसनमुक्तीसाठी पेरूमल संस्था मोलाचे कार्य करत असते. मुख्यत्वे तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ​समुपदेशन आणि ​व्यसनमुक्ती अभियान राबवत असते.

गरजू सात मुलींना लग्नात भांड्याचा संसार भेट मागील तेरा वर्षापासून गुडविलच्या "कन्यारत्न विवाह मदत योजना" या सामाजिक उपक्...
16/02/2026

गरजू सात मुलींना लग्नात भांड्याचा संसार भेट

मागील तेरा वर्षापासून गुडविलच्या "कन्यारत्न विवाह मदत योजना" या सामाजिक उपक्रमांतर्गत लग्न होणाऱ्या गोरगरीब व गरजू मुलींना संपूर्ण भांड्यांचा संसार, साडी व चप्पल त्यांच्या विवाहप्रित्यर्थ भेट दिली जाते. अशाच सामाजिक कामाचे भान ठेवून कु दिव्या पवार शिवणे, श्रुती गायकवाड ताडीवाला रोड, शिल्पा आंग्रे जनता वसाहत, आरती खोरखेडे आळंदी रोड, तनुजा सावंत, अंकिता तेलंगे व नेहा कुऱ्हाडे उत्तम नगर या सात मुलींना हा संसार भेट दिला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक व उद्योजक श्री प्रभाकर गणबोटे, संजय आढाव, युवराज आढाव आणी सुनील नखाते उपस्थित होते. गुडविल तर्फे कालिदास मोरे, सौ संपदा अलाटे, स्वप्नील माळी, महेश कुलकर्णी व गुडविल टीम उपस्थित होती.

प्रमुख पाहुणे श्री गणबोटे बोलताना म्हणाले आपण समाजाला काही देणे लागतो आणी जोपर्यंत या भावनेची जाणीव सर्वसामान्यांना होणार नाही तोपर्यंत सामाजिक प्रगती होणार नाही.

*​दिव्यांग जोडप्यांच्या संसाराला 'गुडविल'चा आधार*दुर्लक्षित ​दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्य...
04/02/2026

*​दिव्यांग जोडप्यांच्या संसाराला 'गुडविल'चा आधार*

दुर्लक्षित ​दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात आनंदाने व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गुडविल इंडिया या संस्थेने सात दिव्यांग जोडप्यांना त्यांच्या विवाहामध्ये संसार उपयोगी संपूर्ण भांड्याचा संच साडी व पादत्राणे देऊन आगळीवेगळी व बहुमूल्य मदत केलेली आहे. गेल्या सात वर्षापासून गुडविल या प्रकारची मदत दिव्यांग जोडप्यांना करत आहे.
हा सामूहिक विवाह सोहळा दिव्यांग प्रतिष्ठानतर्फे व श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या सहकार्याने संत गाडगेबाबा धर्मशाळा या ठिकाणी पार पडला. जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी गुडविल इंडियाचे कालिदास मोरे, संपदा अलाटे, महेश कुलकर्णी, स्वप्निल माळी व अमर रेणुसे उपस्थित होते.

पदपथावरील 300 लोकांना उबदार कपड्यांचे वाटप गुडविल इंडिया व एव्हिएंट मटेरियल इंडिया प्रायव्हेट ली.यांचे संयुक्त विद्यमाने...
20/01/2026

पदपथावरील 300 लोकांना उबदार कपड्यांचे वाटप

गुडविल इंडिया व एव्हिएंट मटेरियल इंडिया प्रायव्हेट ली.यांचे संयुक्त विद्यमाने या वर्षीच्या अत्यंत कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी पदपथावर झोपणाऱ्या 300 गरीबांना उबदार ब्लँकेटस,स्वेटर्स, चहा व बिस्कीट यांचे वाटप करण्यात आले. हे वाटपाचे काम गुडविलचे विश्वस्त श्री अनिश मोरे व मुलगा राम यांचे पुढाकाराने गुडविल टीमने कोथरूड ते पुणे रेल्वेस्टेशन पर्यंत रात्री आठ पासून सकाळी पहाटे चार पर्यंत केले. तसेच गेल्या महिन्यातही गुडविलतर्फे कर्वेनगर येथे तृतीय पंथी डॉ. दीपा नंदिगिरी व मीना मोरे यांचे पुढाकाराने 100 ब्लँकेटस गरजूंना वाटण्यात आले. हा उपक्रम गेली आठ वर्ष सातत्याने चालू आले. यावर्षी एव्हिएंट मटेरियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी सी एस आर च्या माध्यमातून 350 ब्लेंकेट्स वाटण्यासाठी गुडविल कडे सुपूर्द केले.

या वाटपाची सुरुवात एव्हिएंटचे श्री. तुषार वाटकर व की ट्रॉनिक्स कंपनीच्या डायरेक्टर सौ दीपा कुलकर्णी यांनी गुडविलच्या गाड्यांना झेंडा दाखवून केली. या प्रसंगी सचिन फुलसे (एच आर मॅनेजर), मनीषकुमार पांचाळ, सौरभ डाबळे, समीर अन्सारी, गुडविलच्या सौ रजनी मोरे व संपदा अलाटे, कालिदास मोरे स्वप्नील माळी, स्वाती पाटील व गुडविल टीम उपस्थित होती.

उदघाटनपार भाषणात श्री. तुषार वाटकर म्हणाले "ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे हे आमचे पहिले वर्ष आहे. आम्ही कंपनीचे सर्व अधिकारी गुडविलचा हा उपक्रम व इतर सामाजिक काम पाहून भारावून गेलो आहोत. अशा उपक्रमांची गरजू लोकांना खुप गरज आहे. भविष्यात आमच्या कंपनीतर्फे आम्ही जास्तीतजास्त मदत करण्याचा प्रयत्न करु." तसेच की ट्रॉनिक्स च्या सौ. दिपा कुलकर्णी यांनी गुडविलच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशा कडक्याच्या थंडीत रस्त्यांवर झोपलेल्या नागरिकांवर मायेची फुंकर घालत त्यांना मदतीची ऊब देण्याचे गुडविलचे काम सर्वोत्तम आहे.

गुडविल लॉन्ड्री येथील महिला कर्मचाऱ्यांना  लॉन्ड्री व कपड्यांची स्वच्छता कशी करावी सोबतच नवीन अत्याधुनिक मशीन्स व केमिकल...
12/01/2026

गुडविल लॉन्ड्री येथील महिला कर्मचाऱ्यांना लॉन्ड्री व कपड्यांची स्वच्छता कशी करावी सोबतच नवीन अत्याधुनिक मशीन्स व केमिकल्स याबद्दल मार्गदर्शकपर माहिती मिळावी म्हणून एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्लासिक लॉन्ड्री नारायण पेठ चे श्री दुष्यंत निकम व टीम यांनी मार्गदर्शन केले व कपड्यांवरील डाग काढण्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

Address

More Petrol Pump, NDA Road, Shivane , Uttamnagar
Pune
411023

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919011013330

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goodwill India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Goodwill India:

Share