लेक - माहेरचा कट्टा

  • Home
  • India
  • Pune
  • लेक - माहेरचा कट्टा

लेक - माहेरचा कट्टा 🌸 प्रेम, हसू आणि साथ असेल जिथे,
💫 स्वप्नंही सहज पूर्ण होतील तिथे.
(656)

लेक-माहेरचा कट्टा ---
या पेज वर आपले स्वागत आहे.हे पेज खास महिलांसाठी बनवले आहे.या पेज चा उद्देश केवळ महिलांना त्यांच्या समस्येबाबत मार्गदर्शन करणे व वैद्यकीय ,कायदेशीर ,सुरक्षेविषयक मदत करणे हा आहे.महिलांच्या सामाजिक प्रश्नांबाबत योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे जेणे करून महिला जागरूक होतील !

23/07/2026

एक मदत हवी आहे
माझी मावस बहिण आहे जी माझी खुप छान मैत्रीण पण आहे , आमच वय पण same आहे . माझं लग्न 18 वय वर्षी झालं आणि लगेच मूल सुद्धा झालं. तीच लग्न 24 वय असताना झालं आणि तिला सुद्धा एक छान 6 वर्षाची गोड मुलगी आहे . आम्ही अधून मधून फोन आणि msg करत असतो . आमच दोघींचं खूप छान नात आहे .

आता प्रोब्लेम सांगते . तिचा नवरा तिच्याशी खूप छान वागतो ,सगळे लाड करतो , माहेरची आर्थिक जबाबदारी , दवाखाना बऱ्यापैकी सपोर्ट करतो त्यामुळे त्याचं नात खूप छान आहे . पण मला तो माणूस अजिबात आवडत नाही . तो मला सारखा social media वर कुठे न कुठे msg करत असतो . बरं msg फालतू नसतात पण irrited होईल असे वागतो . Rose चे फोटो पाठवण, दिवसभरात सकाळ संध्याकाळ जेवली का , काय करताय , इकडे कधी येणार आहे असे msg. मी त्याला रिप्लाय देत नाही पण तरीही रोज काहीतरी msg करत असतो . मी त्याचा personal न. ब्लॉक केला मग तो insta, fB वर सुरू झाला . मी तिकडे पण ब्लॉक केले तर तो चक्क माझ्या बहिणीच्या फोन वरून msg करतो. तिला ब्लॉक करू शकत नाही कारण आम्ही बहिणी खूप चांगल्या आहोत .

एकदा तो माझ्या शहरात आला होता काही कामानिमित्त तर त्यांनी मला फोन केला की मी आलोय , तर तो मित्राकडे थांबला होता मग मी म्हटले की थांबा तिकडेच sunday ला माझे mr असतील तेव्हा या घरी जेवायला .तर त्या नंतर माझ्या बहिणीचा फोन आला की त्यांचा कडे cash नाहीये त्यांना अर्जेंट काम आहे तर तू त्यांना cash दे मी तुला online पाठवते . तिने मला 20k ऑनलाईन पाठवले आणि मग मला बँकेत जाऊन cash काढून आणावी लागली मी तिच्या mr ना बँकेत बोलावून तिथेच cash दिली. तर त्यावेळी त्याला अपेक्षा होती की आता तरी घरी नेईल पण मी काहीच बोलली नाही आणि घरी निघून आली . तर तो माणूस पुन्हा मला कॉल करत होता की तुमच्या घराजवळ एक मित्राकडे आलोय मग मी चिडली आणि त्याला सुनावलं की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय आणि कसे वागत आहात , आपलं नातं काय याच जरा भान ठेवा मी कोणाची तरी बायको आहे आणि मुलांची आई आहे , अस कुठल्या माणसांनी मला msg केलेलं सारखं कॉन्टॅक्ट मधे राहिलेलं आवडत नाही आणि मी काही तुम्हाला घरी बोलवणार नाहीये तुम्ही फक्त माझ्या बहीण असेल तेव्हाच घरी येऊ शकतात बास. आता मला msg call काहीच करू नका . हे सगळ मी लगेच call करून माझ्या बहिणीला सांगितलं तर ती म्हणाली की आग अस काही नाहीये ते सहज करतात msg . मी तिला सांगितलं की सहज पण नको करायला सांगू , माझ्या नवऱ्याला नाही आवडणार . मी माझ्या नवऱ्याला अजून काहीच सांगितलं नाही उगाच नात खराब होतील आणि सगळ्या नातेवाईकात पसरेल .

पण तो माणूस अजूनही ही थांबवत नाहीये , बहिणीच्या फोन वरून msg करतोच , मला कळत नाहीये माझी बहीण मंद सारखी का वागते तिला कळत नाहीये का ? हे सगळ तिला नॉर्मल कस वाटतंय ? का तो तिच्या फोन वरून msg करून डिलिट करतो आणि तिला समजत नाहीये . मी रिप्लाय देत नाही फक्त बहिणीचा फोन आला तर तेवढाच नॉर्मल बोलते .पण याचा msg चा तिटकारा आलाय कारण हे सगळ 5/6 वर्षापासून चालू आहे .

कोणी allepy केरळ ला houseboat मध्ये राहिले आहे का कसे वाटते .अनुभव शेअर करा आम्हाला जायचे आहे.कारण असे ऐकले आहे की काही ...
17/07/2026

कोणी allepy केरळ ला houseboat मध्ये राहिले आहे का कसे वाटते .अनुभव शेअर करा आम्हाला जायचे आहे.कारण असे ऐकले आहे की काही ठिकाणी पाण्याचा खूप वास येतो मच्छर असतात तुमचा अनुभव सांगा

🚿 बाथरूमचा आरसा धुक्याने भरतोय? 🪞गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर आरशावर धुके (Fog) जमा होणे ही खूप सामान्य समस्या आहे. पण ...
14/07/2026

🚿 बाथरूमचा आरसा धुक्याने भरतोय? 🪞

गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर आरशावर धुके (Fog) जमा होणे ही खूप सामान्य समस्या आहे. पण काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही आरसा नेहमी स्वच्छ आणि धुकेमुक्त ठेवू शकता.

🧼 १. साबणाचा वापर

काय करावे? • आरसा पूर्णपणे कोरडा असताना साबणाची वडी हलक्या हाताने आरशावर चोळा.

नंतर काय करावे? • स्वच्छ, कोरड्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने आरसा नीट पुसून घ्या.

✅ फायदा: आरशावर एक पातळ थर तयार होतो, ज्यामुळे धुके साचत नाही.

---

🪒 २. शेव्हिंग क्रीम

काय करावे? • आरशावर थोडी शेव्हिंग क्रीम लावा.

नंतर काय करावे? • मऊ कापडाने संपूर्ण आरशावर पसरवून स्वच्छ पुसून घ्या.

✅ फायदा: हा उपाय साधारण १ ते २ आठवडे आरशावर धुके जमा होऊ देत नाही.

---

🧴 ३. व्हिनेगर स्प्रे

काय करावे? • स्प्रे बाटलीमध्ये समप्रमाणात पाणी आणि पांढरा व्हिनेगर (White Vinegar) मिसळा.

नंतर काय करावे? • हे मिश्रण आरशावर स्प्रे करून मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ पुसा.

✅ फायदा: आरसा चमकदार राहतो आणि धुकेही कमी साचते.

---

💡 अतिरिक्त टीप

🚿 अंघोळ करताना एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा किंवा बाथरूमचा दरवाजा थोडासा उघडा ठेवा. त्यामुळे वाफ बाहेर जाऊन आरशावर धुके कमी जमा होते.

💬 तुम्ही यापैकी कोणता उपाय आधी करून पाहणार? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇

❤️ मजबूत नात्याचे ५ साधे नियम१. विश्वास ठेवा आणि तो कधीही तोडू नका.विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. एकदा विश्वास ...
10/07/2026

❤️ मजबूत नात्याचे ५ साधे नियम

१. विश्वास ठेवा आणि तो कधीही तोडू नका.
विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. एकदा विश्वास तुटला की तो परत मिळवणं खूप कठीण असतं.

२. मनात काहीही ठेवू नका, मोकळेपणाने बोला.
गैरसमज वाढू देण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे बोलून प्रश्न सोडवले तर नातं अधिक मजबूत होतं.

३. एकमेकांचा आदर कायम ठेवा.
मतभेद असले तरी बोलताना शब्दांची काळजी घ्या. आदर कमी झाला की नात्यात दुरावा येऊ लागतो.

४. सुखातच नाही तर दुःखातही साथ द्या.
खरी माणसं तीच असतात जी कठीण काळातही आपली साथ सोडत नाहीत.

५. प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत राहा.
एक प्रेमळ शब्द, एक कौतुक किंवा थोडा वेळ दिला तरी नातं अधिक घट्ट होतं.

💚 मजबूत नातं हे पैशाने नाही, तर विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि प्रेमाने टिकतं.

श्री स्वामी समर्थ
09/07/2026

श्री स्वामी समर्थ

🌸 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌸🌅 शुभ सकाळ!काळ कितीही कठीण असला तरीश्री स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही कमी करू नका.योग्य वेळ ...
07/07/2026

🌸 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌸

🌅 शुभ सकाळ!

काळ कितीही कठीण असला तरी
श्री स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही कमी करू नका.

योग्य वेळ आल्यावर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात. 🙏✨

स्वामींची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या परिवारावर राहो. ❤️

॥ श्री स्वामी समर्थ ॥

गरज असेपर्यंत सोबत राहणारी माणसं आणि गरज संपली की ओळखही न दाखवणारी माणसं, आयुष्य खूप काही शिकवून जातात.जीवनात अनेक प्रका...
06/07/2026

गरज असेपर्यंत सोबत राहणारी माणसं आणि गरज संपली की ओळखही न दाखवणारी माणसं, आयुष्य खूप काही शिकवून जातात.

जीवनात अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही माणसं कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या सुख-दुःखात कायम सोबत उभी राहतात, तर काही जण फक्त स्वतःची गरज असेपर्यंतच आपल्याशी चांगले वागतात. त्यांची गरज पूर्ण झाली की ते हळूहळू दूर जातात, इतकेच नाही तर कधी कधी ओळखही दाखवत नाहीत. अशा अनुभवांमुळे सुरुवातीला मनाला खूप दुःख होते, पण कालांतराने हेच अनुभव आपल्याला आयुष्याचे खरे धडे शिकवतात.

अशा प्रसंगांमधून आपण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नये, नात्यांमध्ये स्वार्थ आणि निस्वार्थपणा यातील फरक ओळखावा आणि स्वतःची किंमत कधीही कमी समजू नये, हे शिकतो. खरे नाते तेच असते जे फक्त आनंदाच्या क्षणी नव्हे, तर अडचणीच्या काळातही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहते.

म्हणूनच प्रत्येक व्यक्तीकडून कायम साथ मिळेल, अशी अपेक्षा न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवणे आणि जे खऱ्या मनाने आपल्या सोबत असतात त्यांची कदर करणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, तो चांगला असो किंवा वाईट, आपल्याला अधिक समजूतदार, मजबूत आणि वास्तववादी बनवत असतो. म्हणूनच गरज संपल्यानंतर दूर जाणारी माणसंही नकळत आपल्याला आयुष्याचा एक महत्त्वाचा धडा शिकवून जातात.

🕯️ विझणारी मेणबत्ती "एकट्याने नातं जपता जपता... शेवटी मीच विझलो."नातं वाचवण्याचे प्रयत्न फक्त एका बाजूने होत राहिले.दुसऱ...
05/07/2026

🕯️ विझणारी मेणबत्ती
"एकट्याने नातं जपता जपता... शेवटी मीच विझलो."
नातं वाचवण्याचे प्रयत्न फक्त एका बाजूने होत राहिले.
दुसऱ्या बाजूने मात्र शांतता आणि अंतर वाढत गेलं.
प्रेम होतं, पण साथ नव्हती.
शेवटी नातं नाही, तर विश्वासच तुटला.
काही नाती संपत नाहीत... ती हळूहळू विझत जातात. 🕯️

स्वामी म्हणतात...विश्वास ठेवा, संयम ठेवा,योग्य वेळ आल्यावरसगळं तुमच्या मनासारखंच होईल.॥ श्री स्वामी समर्थ ॥शुभ सकाळ!
05/07/2026

स्वामी म्हणतात...
विश्वास ठेवा, संयम ठेवा,
योग्य वेळ आल्यावर
सगळं तुमच्या मनासारखंच होईल.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
शुभ सकाळ!

प्रत्येक वेळी शांत राहतो म्हणजे काहीच कळत नाही असं समजू नका... फक्त तुमच्या पातळीवर उतरायचं नसतं.आयुष्यात काही माणसं अशी...
04/07/2026

प्रत्येक वेळी शांत राहतो म्हणजे काहीच कळत नाही असं समजू नका... फक्त तुमच्या पातळीवर उतरायचं नसतं.
आयुष्यात काही माणसं अशी भेटतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत वाद घालायची सवय असते. समोरच्याला दुखावून, कमी लेखून किंवा टोमणे मारून जिंकल्याचा आनंद त्यांना मिळतो. अशा वेळी प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं.
शांत राहणं म्हणजे भीती नाही आणि गप्प बसणं म्हणजे चूक मान्य करणंही नाही. कधी कधी समोरची व्यक्ती कोणत्या विचारांची आहे, हे समजल्यावर बोलण्यापेक्षा शांत राहणंच योग्य वाटतं.
प्रत्येकाला आपल्या भाषेत उत्तर देता येतं. पण स्वतःचे संस्कार, स्वाभिमान आणि मर्यादा जपणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण क्षणभराचा राग निघून जातो, पण बोललेले शब्द कायम लक्षात राहतात.
म्हणून माझ्या शांततेचा अर्थ काहीच कळत नाही असा लावू नका. मला सगळं दिसतं, सगळं समजतं... फक्त प्रत्येकाला उत्तर देण्याइतकं महत्त्व मी प्रत्येकाला देत नाही.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लेक - माहेरचा कट्टा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to लेक - माहेरचा कट्टा:

Shortcuts

Share