SwarSagar Social Foundation

SwarSagar Social Foundation शिक्षणासाठी हात, आरोग्यासाठी साथ, पर्यावरणासाठी वचन | Empowering lives through education | health

पूराच्या या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी शांत राहणे, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणे हाच मोठा आधार आहे.ही वेळह...
21/08/2025

पूराच्या या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी शांत राहणे, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणे हाच मोठा आधार आहे.

ही वेळही नक्कीच जाईल!


20/08/2025

A single donation can save up to three lives and our donors proved it. 🩸
Each hero stepped up to make hope possible.

Together, we’re not just donated blood, we gave life to many.

Because when we unite for a cause, the impact is limitless.

-Thank you all donors for the fearless act-

Today, many hearts beat stronger because of our incredible donors. 🩸❤️Each one stepped forward, rolled up their sleeves,...
19/08/2025

Today, many hearts beat stronger because of our incredible donors. 🩸❤️
Each one stepped forward, rolled up their sleeves, and became a hero in someone’s story.
To all who donated you didn’t just give blood, you gave hope, life, and love.

Thanks a lot all donors for your cooperation.

आपल्या समाजात अनेकजण अशा कठीण परिस्थितीत असतात, जिथे त्यांचं जीवन वाचवण्यासाठी रक्ताची गरज अत्यंत तातडीची असते. अशा वेळी...
19/08/2025

आपल्या समाजात अनेकजण अशा कठीण परिस्थितीत असतात, जिथे त्यांचं जीवन वाचवण्यासाठी रक्ताची गरज अत्यंत तातडीची असते. अशा वेळी आपण दिलेलं रक्त त्यांच्यासाठी नवसंजीवनी ठरू शकतं.

"रक्तदान – आरोग्य, आनंद आणि आपुलकीचा सेतू" ही केवळ एक घोषणा नाही, तर जीवन वाचवण्याची खरी संधी आहे. आपल्या काही मिनिटांच्या योगदानातून एखाद्याला संपूर्ण आयुष्याचा आशीर्वाद मिळू शकतो. 🙏🏻

याच भावनेतून रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन, एक खऱ्या अर्थाने निःस्वार्थ कार्याचा भाग व्हावे, अशी मनापासून विनंती आहे.

🩸 लक्षात ठेवा –
आपल्या रक्ताचा एक थेंब, कुणाच्या आयुष्यात नवप्रभात आणू शकतो.

------------------------------------------------
🗓️ दिनांक, वेळ:
१४ ऑगस्ट २०२५ रोजी , स. ९ - सायं ५ वा

ठिकाण:
ग्रीन सोल्युशन हेड ऑफीस, वाकडेवाडी, शिवाजी नगर

गतवर्षी आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वी पार पडलेला रक्तदान उपक्रम यावर्षीही आपल्या सहकार्याने आयोजित केला ...
19/08/2025

गतवर्षी आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वी पार पडलेला रक्तदान उपक्रम यावर्षीही आपल्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.

"रक्तदान – आरोग्य, आनंद आणि आपुलकीचा सेतू."

सागर सरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या 'रक्तदान शिबिरा' मध्ये आपण सर्वांनी मनापासून सहभाग नोंदवून, खऱ्या अर्थाने जीवनदान देण्याची ही अमूल्य संधी साधावी.

🩸 आपल्या रक्ताच्या एका थेंबातून कोणाचं जीवन वाचू शकतं – हाच वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
------------------------------------------------
🗓️ दिनांक, वेळ:
१४ ऑगस्ट २०२५ रोजी , स. ९ - सायं ५ वा

ठिकाण:
ग्रीन सोल्युशन हेड ऑफीस , वाकडेवाडी, शिवाजी नगर

सर्वांना सप्रेम नमस्कार, जय हिंद! 🇮🇳आपण सर्व येत्या १५ ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा कर...
19/08/2025

सर्वांना सप्रेम नमस्कार, जय हिंद! 🇮🇳

आपण सर्व येत्या १५ ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणार आहोत. त्याचबरोबर, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आदरणीय सागर अहिवळे सरांचा वाढदिवस देखील १४ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.

🩸 गतवर्षी आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीपणे पार पडलेला रक्तदान उपक्रम यावर्षीही आपल्या उपस्थितीत आणि सहकार्याने आयोजित केला जात आहे.

"रक्तदान – आरोग्य, आनंद आणि आपुलकीचा सेतू."

सागर सरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या 'रक्तदान शिबिरा' मध्ये आपण सर्वांनी मनापासून सहभाग नोंदवून, खऱ्या अर्थाने जीवनदान देण्याची ही अमूल्य संधी साधावी. 🙏🏻

🙂 आपल्या एका थेंबातून निर्माण होणारी आशा आणि आनंद – हाच आपल्या समाजाचा खरा उत्सव आहे.

------------------------------------------------

🗓️ दिनांक, वेळ:
१४ ऑगस्ट २०२५ रोजी , स. ९ - सायं ५ वा

ठिकाण:
ग्रीन सोल्युशन हेड ऑफीस, वाकडेवाडी, शिवाजी नगर

एका छोट्या ठिणगीने कधी कधी मोठा दिवा पेटतो…‘स्वरसागर सामाजिक फाऊंडेशन’ची सुरुवातसुद्धा अशाच एका छोट्या विचारातून झाली. स...
19/08/2025

एका छोट्या ठिणगीने कधी कधी मोठा दिवा पेटतो…

‘स्वरसागर सामाजिक फाऊंडेशन’ची सुरुवातसुद्धा अशाच एका छोट्या विचारातून झाली. समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करायचं, बदलाची नवी दिशा द्यायची आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करायची – हीच आमच्या प्रवासाची पहिली पायरी होती.

आज शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या तीन मजबूत आधारस्तंभांवर आम्ही आमचं कार्य उभं करतो आहोत. कारण आम्हाला ठाम विश्वास आहे – ‘शिक्षित समाज म्हणजे प्रगत समाज, निरोगी समाज म्हणजे आनंदी समाज आणि हिरवेगार पर्यावरण म्हणजे सुरक्षित भविष्य.’

तुम्ही दिलेला प्रत्येक हात, साथ, आणि प्रोत्साहन या प्रवासाला अधिक बळकटी देईल.

आम्हाला खात्री आहे की उद्याचा बदल प्रत्येकाच्या सहभागातून घडेल.

चला, मिळून एकत्र नवा संवेदनशील, जागरूक आणि उज्ज्वल समाज घडवूया.

#स्वरसागर

Address

Shivaji Nagar
Pune
411003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwarSagar Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share