Hindu Bhushan Smarak Trust

Hindu Bhushan Smarak Trust हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी-चिंचवड, पुणे. ची स्थापना करण्यात आली आहे. ट्रस्टची अधिकृत माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सुरू केलेले अधिकृत पेज आहे.🚩

धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प अर्थात  ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण‘‘ स्मारक परिसरात इंटे...
17/07/2026

धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण‘‘ स्मारक परिसरात इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या हातांनी मोठा संदेश दिला—"झाडे लावा, झाडे जगवा!" पिंपळ, वड, कडुलिंब यांसारख्या वृक्षांची लागवड करताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पर्यावरणाप्रती असलेली जाणीव पाहून मन अभिमानाने भरून आले.

हिंदूभूषण स्मारक हे केवळ आपल्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक नाही, तर सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा देणारे केंद्रही आहे. भावी पिढीला हरित आणि समृद्ध वारसा देण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जपण्याचा संकल्प करूया. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांसाठी दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे. इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, प्राचार्या शिबी राजू, शिक्षकवृंद आणि हिंदूभूषण स्मारक ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या स्तुत्य उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन व आभार..!

"वाकला नाही, झुकला नाही, संकटांपुढे कधी थांबला नाही;
धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास आजही स्वाभिमान शिकवितो."

नव्या पिढीत आता हाच स्वाभिमान आपल्याला रुजवायचा आहे..!

जय श्रीराम.. जय शिवराय... जय शंभुराजे..!

वटवृक्षाप्रमाणे नात्यांना लाभो दृढता, आयुष्याला लाभो समृद्धी आणि प्रत्येक घरात नांदो सुख, शांती व आनंद.मंगलमय वटपौर्णिमा...
29/06/2026

वटवृक्षाप्रमाणे नात्यांना लाभो दृढता, आयुष्याला लाभो समृद्धी आणि प्रत्येक घरात नांदो सुख, शांती व आनंद.

मंगलमय वटपौर्णिमा! 🙏💐

देव देश अन धर्मरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीरांना मानाचा मुजरा..!हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्...
26/06/2026

देव देश अन धर्मरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीरांना मानाचा मुजरा..!

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोशी बोऱ्हाडेवाडी येथील शंभूराजांचे जगातील सर्वात उंच शिल्प 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' यांच्या चरणी दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करत मानाचा मुजरा करण्यात आला.

धर्म, स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या शंभूराजांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या अद्वितीय पराक्रमाला आणि बलिदानाला कृतज्ञतापूर्वक नमन करण्यात आले.

यावेळी हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी, सहकारी आणि शिवभक्त बांधव उपस्थित होते.

शंभूराजांचे जीवन आणि बलिदान हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांचा आदर्श जपत हिंदवी स्वराज्याची मूल्ये पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

जय शिवराय.. जय शंभूराजे..!🚩

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्वितीय पराक्रम, असामान्य विद्वत्ता आणि धर्मरक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे धर्मवीर छ...
26/06/2026

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्वितीय पराक्रम, असामान्य विद्वत्ता आणि धर्मरक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज #संभाजीमहाराजजयंती #शौर्य #स्वराज्य #मराठा_इतिहास #जयशिवराय #जयसंभाजीराजे

जिजाऊंनी शिवरायांना दिलेले संस्कार, राष्ट्रभक्ती, न्यायनिष्ठा आणि स्वाभिमानाचे धडे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत...
17/06/2026

जिजाऊंनी शिवरायांना दिलेले संस्कार, राष्ट्रभक्ती, न्यायनिष्ठा आणि स्वाभिमानाचे धडे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या दूरदृष्टी, त्याग आणि कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली.
राजमाता जिजाऊ यांच्या पावन स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! 🙏🚩

‘स्टॅच्यू ऑफ हिंदु भूषण’ ला जर्मनीच्या पर्यटकांचा मुजरा..!  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास, शौर्यगा...
16/06/2026

‘स्टॅच्यू ऑफ हिंदु भूषण’ ला जर्मनीच्या पर्यटकांचा मुजरा..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास, शौर्यगाथा साता समुद्रापार कळली पाहिजे. शिव-शंभू विचारांची जागृती झाली पाहिजे. या संकल्पनेतून शंभूराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये साकारला आहे. ऐतिहासिक शंभूसृष्टीचे कामही प्रगतीपथावर आहे. सोशल मीडियामुळे या भव्य मूर्तीची जगभरातील शिव-शंभूप्रेमींमध्ये चर्चा आहे. त्यामुळे देशविदेशातील नागरिक पुणे- महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जुन ‘‘स्टॅचू ऑफ हिंदुभूषण’’ ला भेट देतात. शिवविचारांना मानाचा मुजरा करतात, ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

आज जर्मनी या प्रगत युरोपीय देशातील मान्यवर नागरिकांनी आपल्या स्टॅच्यू ऑफ हिंदु भूषण येथे सदिच्छा भेट देऊन या भव्य स्मारकाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी स्मारकाची संकल्पना, त्यामागील इतिहास, हिंदू संस्कृतीची महान परंपरा आणि समाजजागृतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. भारतीय संस्कृती, अध्यात्म, इतिहास आणि हिंदू समाजाच्या वैभवशाली वारशाबद्दल त्यांनी विशेष आदर व्यक्त केला.

आज जग एका जागतिक कुटुंबाच्या संकल्पनेकडे वाटचाल करत असताना, आपल्या संस्कृतीचे आणि विचारांचे महत्त्व जगभर पोहोचत असल्याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. जर्मनीसारख्या देशातील नागरिकांनी येथे येऊन दाखवलेली उत्सुकता ही केवळ या स्मारकाची नव्हे, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीची आणि हिंदू सभ्यतेच्या वैश्विक प्रभावाची पावती आहे. अशा आंतरराष्ट्रीय भेटीमुळे सांस्कृतिक संवाद अधिक दृढ होतो, परस्पर समज वाढते आणि जगभरात भारताच्या गौरवशाली परंपरेचा संदेश पोहोचण्यास बळ मिळते. जर्मनीहून आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि आभार! त्यांच्या या भेटीच्या आठवणी आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील. "हिंदू संस्कृतीचा गौरव, भारताच्या वैभवाचा संदेश आणि विश्वबंधुत्वाचा विचार – याच भावनेतून स्टॅच्यू ऑफ हिंदु भूषण जगाला जोडत आहे, याचा सार्थ अभिमान आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🚩हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास घडवणारा शिवराज्याभिषेक सो...
06/06/2026

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🚩

हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास घडवणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणाचा प्रेरणादायी दिवस आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य आणि माणुसकी जपण्याचा संकल्प करूया.

जय भवानी..! जय शिवराय..! 🚩

#शिवराज्याभिषेक #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य #जयभवानी #जयशिवराय

🚩 ऐतिहासिक, तेजस्वी आणि अविस्मरणीय सोहळा..! 🚩धर्म, स्वराज्य आणि हिंदवी अस्मितेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर...
16/05/2026

🚩 ऐतिहासिक, तेजस्वी आणि अविस्मरणीय सोहळा..! 🚩

धर्म, स्वराज्य आणि हिंदवी अस्मितेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य ऐतिहासिक सोहळा अत्यंत दिमाखात आणि जनसागराच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आकर्षक विद्युत रोषणाई, अत्याधुनिक डिजिटल मॅपिंगद्वारे सादर झालेला शिवशंभुंचा तेजस्वी इतिहास व धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे थरारक दर्शनाने उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. इतिहास केवळ ऐकायचा नाही, तर अनुभवायचा असतो, हे या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.
'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे साकारलेला हा सोहळा म्हणजे हिंदवी स्वाभिमानाचा जिवंत जागर होता. सहकुटुंब उपस्थित राहिलेल्या असंख्य शिवप्रेमींनी कार्यक्रमाला अभूतपूर्व भव्यता दिली.

जय शिवराय.. जय शंभूराजे..!

#जयशिवराय #जयशंभूराजे

14/05/2026

🚩 धर्मासाठी जगले... स्वराज्यासाठी झुंजले...
अखंड हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे
शौर्य, विद्वत्ता आणि राष्ट्रभक्तीचे तेजस्वी प्रतीक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन..! 🙏🚩

जय जिजाऊ… जय शिवराय… जय शंभूराजे..!”

#जयशंभूराजे #धर्मवीर #जयशिवराय

“ज्यांनी धर्मासाठी, स्वाभिमानासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली… ज्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाला...
14/05/2026

“ज्यांनी धर्मासाठी, स्वाभिमानासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली… ज्यांच्या पराक्रमाने औरंगजेबालाही हादरवून सोडलं… अखंड शौर्य, अदम्य धैर्य आणि तेजस्वी इतिहासाचे प्रतीक म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज..!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, संकटांच्या काळातही स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवत ठेवणारे रणधुरंधर योद्धे… संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे त्याग, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचा प्रेरणादायी इतिहास आहे.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
जय जिजाऊ… जय शिवराय… जय शंभूराजे..!”

#जयशंभूराजे #धर्मवीर #जयशिवराय

Address

Moshi, Pimpri Chinchwad
Pune
411070

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindu Bhushan Smarak Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share