26/12/2025
आज दिनांक 25/12/2025 रोजी आपले सभासद श्री.उमेश नवघणे सर यांचे मित्र व संस्थेचे देणगीदार श्री. राहुल काकरे सर यांचे नातेवाईक श्री. नचिकेत जांभुळकर सर, सानिया हर्षद लोहंडे मॅडम रावेत व त्यांचा मुलगा सुमित यांनी संस्थेला भेट दिली तसेच मुलांबरोबर गप्पा गोष्टी केल्या तसेच मुलांना खाऊ दिला व संस्थेला घरगुती पिठाची गिरणी देणगी स्वरूपात भेट दिली. सर/मॅडम आपण जो खारीचा वाटा उचलला त्याबद्दल ....
"करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयाचे"
साने गुरुजींच्या या कवितेतील ओळीप्रमाणे आपण आज आपल्या या सर्व बालकांच्या आयुष्यामध्ये जो आनंदाचा क्षण आणलेला आहे त्यासाठी भावना व्यक्त करायला आमच्याकडे शब्द नाहीत.
आपण दिलेली देणगी मुलांना व संस्थेला दैनंदिन आयुष्यात खूपच महत्त्वाची आहे. बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान या सर्व गोष्टींचे मोल आपोआपच सांगून जातो. आपल्या या अमूल्य भेटीबद्दल संस्थेतील बालके व संस्था ही कायमच आपली ऋणी असेल धन्यवाद.
आपला कृपाभिलाशी
श्री लिखित नाशिककर
मायेचा हात सोशल फाउंडेशन
कामशेत