15/11/2025
Our home visit process is a priority before approval of scholarship.
Our mentor Balasaheb Kanade's home visit report for one of our student from Kalamb village near Narayangaon taluka Ambegaon District: Pune
आदरणीय सर , सस्नेह नमस्कार !
काल रविवार , दि.२७/०७/२०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही उभयता कु.साक्षी लक्ष्मण थोरात हिचे घरी बागवस्ती (कळंब) ता.आंबेगाव येथे पोहोचलो .
साधू वासवानी कॉलेज पुणे येथे साक्षी परिचारिका पदवी (BSC Nursing)चे व्यावसायिक शिक्षण घेते . घरी वडील ,आई , दोन बहिणी अन आजी राहतात . जिरायत अन बागायत असे सव्वा दोन एकर क्षेत्र असून पूर्ण कुटुंब शेतीकाम करते . पालक पुर्णतः निर्व्यसनी असून आपल्या तीनही मुलींचा योग्यप्रकारे सांभाळ करत शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत . अगदी साक्षी सुद्धा सुट्टीला गावी आल्यावर शेतकामात मदत करते . घर साधे पण नीटनेटके लोखंडी पत्रा वीट प्लॅस्टरचे आहे . दोन गायीमुळे घरखर्च चालतो . चालू वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसाने खरिप हंगामात काहीही हाती लागले नाही . तरीही आई-वडील मुलींच्या शिक्षणासाठी सतत धडपडत आहेत .
साक्षीच्या आई-वडिलांचा मुलींचे शिक्षण अन उदरनिर्वाहाचा प्रामाणिक संघर्ष पाहता , आपण या परिवारास उच्च शिक्षण करीता शिष्यवृत्ती मदत करणे गरजेचे आहे. कृपया पुरेपुर उचित सहकार्य घडावे , ही विनंती.
*श्री.व सौ.मनीषा बाळासाहेब कानडे*
(ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान , कळंब , ता.आंबेगाव , जि.पुणे)