Rugna Hakka Parishad

Rugna Hakka Parishad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rugna Hakka Parishad, Non-Governmental Organization (NGO), pune, Pune.

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १३ व्या शाखेचे उदघाट्न कमला नेहरू हॉस्पिटल समोर संपन्न._____________________________...
12/03/2025

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १३ व्या शाखेचे उदघाट्न कमला नेहरू हॉस्पिटल समोर संपन्न.
___________________________________
कमरेचा बॉल बसवणे आणि गुडघ्यांच्या वाट्या बदलण्याचे ऑपरेशन होणार मोफत!

पुणे दि. ११ मार्च - रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर सरचिटणीस सौ. शारदाताई गजानन लडकत यांचे नेतृत्वाखाली आणि शाखाध्यक्ष गौरीताई मुकुंद चव्हाण यांच्या पुढाकाराने आज मंगळवार पेठ येथील कमला नेहरू हॉस्पिटल समोर, रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १३ व्या शाखेचे उद्घाटन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे शहर सचिव .प्रभाताई अवलेलू, संघटक रेश्मा ताई जांभळे, पुणे शहर सदस्य दिलीप ओव्हाळ, गजानन लडकत, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद चव्हाण, कार्यालयीन सचिव अमृता जाधव आणि परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी स्थानिक माता भगिनी व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
१३ व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त *गुडघ्याच्या वाट्या बदलणे आणि बसवण्याचे ऑपरेशन तसेच कमरेचा बॉल बदलणे आणि बसवण्याचे ऑपरेशन शासकीय योजनांमधून मोफत केले जाणार आहेत.
यासाठी 8956185702 या क्रमांकावर रुग्णांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन पुणे शहर सरचिटणीस शारदाताई लडकत यांनी केले. तसेच सदर ऑपरेशन पुण्यातील शनिवार वाडा जवळील युनिव्हर्सल हॉस्पिटल येथे करण्यात येतील, अशी माहिती रेश्माताई जांभळे आणि प्रभा अवलेलू यांनी दिली.

अधिक माहितीसाठी- 8956185702
̇nstanews

🇮🇳 विश्वविजेता भारत खूप खूप शुभेच्छा असेच लढत रहा 🇮🇳
10/03/2025

🇮🇳 विश्वविजेता भारत खूप खूप शुभेच्छा असेच लढत रहा 🇮🇳

हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे - लेखक - उमेश चव्हाण वैद्यकीय जगतासह देशभरात अल्पवधीत खळबळजनक ठरलेले पुस्तक.25,000 हून अधिक...
08/03/2025

हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे - लेखक - उमेश चव्हाण

वैद्यकीय जगतासह देशभरात अल्पवधीत खळबळजनक ठरलेले पुस्तक.
25,000 हून अधिक रुग्णांवर कोट्यावधी रुपयाचे मोफत उपचार करणाऱ्या
रुग्ण हक्क परिषद संघटनेच्या अनुभवातून सिद्ध झालेला माहिती पत्र ग्रंथ.

हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे....
#2025

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
07/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

स्थळ - युनिव्हर्सल हॉस्पिटल , कसबा पेठ.रुग्ण हक्क परिषद तथा कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान चे प्रमुख - संस्थापक - अध्यक्...
05/03/2025

स्थळ - युनिव्हर्सल हॉस्पिटल , कसबा पेठ.

रुग्ण हक्क परिषद तथा कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान चे प्रमुख - संस्थापक - अध्यक्ष "श्री. उमेश जी चव्हाण" सर.

दर मंगळवारी युनिव्हर्सल हॉस्पिटल मध्ये ओपीडी असते आणि तिथे स्वतः उमेश चव्हाण सर उपस्थित असतात पेशंट सोबत त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधतात त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे आपण त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतो सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं आणि रुग्ण हक्क परिषद सदैव आपल्या सोबत आहे.
हा विश्वास प्रत्येकाला देतात.

अधिक माहितीसाठी - 8956185702

करुणा हाउसिंग सोसायटी, येरवडा पुणे येथे  "जागृती महिला बहुउद्देशीय संस्थेचे" आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बापूसा...
03/03/2025

करुणा हाउसिंग सोसायटी, येरवडा पुणे येथे "जागृती महिला बहुउद्देशीय संस्थेचे" आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, मुख्य संयोजक रेखाताई वाघमारे, रुग्ण हक्क परिषदेच्या प्रभाताई अवलेल, चित्राताई साळवे यांच्यासह जागृती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या 12 व्या शाखेचे गोळीबार मैदान समोर उद्घाटन संपन्न.
03/03/2025

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या 12 व्या शाखेचे गोळीबार मैदान समोर उद्घाटन संपन्न.

पुणे शहर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे ५० लाख रुपयांचे ऑपरेशन केले मोफत; रुग्ण हक्क परिषदेने गेले वर्षभर केला पाठपुरावापिंपर...
03/03/2025

पुणे शहर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे ५० लाख रुपयांचे ऑपरेशन केले मोफत; रुग्ण हक्क परिषदेने गेले वर्षभर केला पाठपुरावा

पिंपरी पुणे दि. २६ - पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी श्रीम. स्मिता कीरतकर यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Lung Transplant Operations) करण्याचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निश्चित झाले होते. रुग्ण हक्क परिषदेने वारंवार लेखी पाठपुरावा करून गेल्या वर्षी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री असताना ऑपरेशन करिता सुमारे ५० लाख रुपये मंजूर करून घेतले होते.
दुर्मिळ एबी रक्तगट असणाऱ्या स्मिता किरतकर यांच्यासाठी गेले वर्षभर अवयव उपलब्ध होत नसल्याकारणाने महिला पोलीस कर्मचारी स्मिता यांच्यावरचे ऑपरेशन होऊ शकत नव्हते. मात्र गेल्याच आठवड्यात स्मिता किरतकर यांच्यावरील ५० लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. ५० लाखांपैकी किरतकर यांनी स्वतः भरलेली १५ लाख रुपयांच्या रकमेचा परतावा देखील त्यांना शासन स्तरावरून परत देण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत स्मिता यांची तब्येत आता स्थिर असली तरी आणखी पंधरा दिवस त्यांच्यावर डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी पुणे येथे उपचार सुरू राहणार आहेत. त्यांचे वरील उपचारांसाठी पिंपरी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मुख्य संचालक श्री. यशराज पी. पाटील, हॉस्पिटलचे प्रमुख हनुमंत चव्हाण, प्रमोद पाटील यांचे शस्त्रक्रिया करण्याबद्दल रुग्ण हक्क परिसराचे अध्यक्ष उमेश चव्हाण, स्मिता किरतकर यांचा भाऊ समाधान कीरतकर, रुग्ण हक्क परिषदेचे समन्वयक राजाभाऊ कदम यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले!
स्मिता किरतकर यांची ५० लाख रुपयांची शस्त्रक्रिया मोफत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, परिषदेचे मुख्य समन्वयक राजेंद्र (राजाभाऊ) कदम, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वरजी नाईक, भारतीय जनता पार्टीचे अमोल शुक्ला, तत्कालीन भाजपचे आणि आताचे राष्ट्रवादीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, दूरदर्शनचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे - साठ्ये, पुणे शहर पोलीस अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया यांनी अत्यंत तळमळीने लक्ष घालून, पाठपुरावा करून स्मिता किरतकर यांची शस्त्रक्रिया होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले.
- उमेश चव्हाण, अध्यक्ष - रुग्ण हक्क परिषद मो. ९८२२०८१५४०

शिवसन्मान पुरस्कार सोहळा 2025
28/02/2025

शिवसन्मान पुरस्कार सोहळा 2025

Address

Pune
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rugna Hakka Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share