05/06/2026
प्रसन्न ऑटिझम सेंटर चा वर्धापनदिन उत्साहात..
स्वमग्नता( ऑटिझम) ही एक मानसिक वैकासिक गुंतागुंतीची समस्या असून विशेषतः लहान मुलांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या समस्येसाठी आवश्यक असणाऱ्या स्पीच, ऑक्क्युपेशनल , रेमेडियल, वर्तणूक अश्या वेगवेगळ्या थेरपीज द्वारे उपचार करून या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रसन्न ऑटिझम सेंटरने नुकतेच २७ व्या वर्षात पदार्पण केले . यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यासाठी Astimo fie चे संचालक सुधीर गोगटे, डॉ. कल्याणी मांडके, डॉ. अपर्णा कुलकर्णी, रोटरी क्लबचे राजेश वाडेकर, रोहित फडणीस, स्वाती यादव,
डॉ. कुबेर तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक सहकारी, हितचिंतक आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा साधना गोडबोले, विश्वस्त सुचेता राजहंस, संध्या जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या विद्यार्थ्याना नेहमीच्या शिक्षण पद्धतीबरोबरच व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय साधना गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केला.