18/04/2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि. १५ एप्रिल २०२६ रोजी समाज विकास विभाग पुणे मनपा,युवराज तेली फौंडेशन व जान्हवी फौडेशन यांच्या वतीने पुणे स्टेशन येथील दिवस-रात्र निवारा प्रकल्पात लाभार्थ्यांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचा मुख्य उद्देश बेघर, निराश्रित व गरजू नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे हा होता. पुणे स्टेशन निवाऱ्यात राहणारे लाभार्थी तसेच आसपासच्या गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवला.
या शिबिराचा एकूण ४२३ नागरिकांनी लाभ घेतला. त्यामध्ये:
१) ३८१ जणांची नेत्र तपासणी करून त्यांना जवळच्या दृष्टीसाठी चष्मे वाटप करण्यात आले.
२ ) २५ जणांना दूरच्या दृष्टीसाठी चष्मे देण्यात आले.
सहभागी लाभार्थ्यांना आवश्यक त्या गोळ्या, औषधे, क्रीम व इतर वैद्यकीय साहित्यही विनामूल्य वितरित करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना त्यांच्या आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन मिळाले तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी वैद्यकीय मदतही मिळाली. संपूर्ण शिबिर अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जान्हवी फौडेशनचे काळजीवाहक किरण कांबळे, रेखा बोरकर, अलिम शेख तसेच युवराज तेली मेमोरियल ट्रस्टचे पुढील मान्यवर व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले:
१) श्री. दिगंबर हणमंते (मॅनेजर)
२) डॉ. साक्षी गोरे (BHMS)
३) डॉ. महेश कांबळे (नेत्रतज्ज्ञ)
४) विश्वास भोसले (स्टाफ)
५) रोहिदास वाळुंज (स्टाफ)
६) लक्ष्मण कोळी (स्टाफ)
या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.