संस्कृत संस्कृति संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी

  • Home
  • India
  • Pune
  • संस्कृत संस्कृति संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी
Directions Website

संस्कृत संस्कृति संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी Research wing of Jnana Prabodhini
(Sanskrit, and cultural studies)

श्री कृष्णमुकुंद उजळंबकर शिष्यवृत्ती योजना २०२६-२७ (वर्ष२रे)संस्कृत या विषयांत पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यास व संशोधन कर...
05/08/2026

श्री कृष्णमुकुंद उजळंबकर शिष्यवृत्ती योजना २०२६-२७ (वर्ष२रे)

संस्कृत या विषयांत पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यास व संशोधन करु इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी उत्तेजनार्थ राज्यस्तरीय शिष्यवृत्ती योजना. (पदवीपूर्व विद्यार्थी रु. २०००/- प्रतिमहिना, पदव्युत्तर रु. ३०००/- प्रतिमहिना)
 पात्रता निकष –
 राज्यातील कोणत्याही मान्यता प्राप्त महाविद्यालयात संस्कृत अभ्यासक्रमात प्रवेश व शिक्षण आवश्यक.
 किमान ६०% गुण आवश्यक.
 वयाची अट नाही.

संस्कृत संस्कृति संशोधिका विभाग, ज्ञान प्रबोधिनी , ५१०, सदाशिव पेठ, पुणे ३०. संपर्क - ०२० - २४२०७१४६, ७३७८३०५६९६ , ईमे.....

ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था, पुणे   संस्कृत  संस्कृति  संशोधिका विभाग पुरस्कृत    ई-मेल – santrika@jnanaprabodhini.org...
05/08/2026

ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था, पुणे
संस्कृत संस्कृति संशोधिका विभाग पुरस्कृत
ई-मेल – [email protected]
दूरध्वनी - ०२०-२४२०७१४६ /१८७, ७४९८७३०५३४ ( 020- 24207146/ 187, 7498730534)
श्री कृष्णमुकुंद उजळंबकर शिष्यवृत्ती योजना २०२६-२७ (वर्ष२रे)

संस्कृत या विषयांत पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यास व संशोधन करु इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी उत्तेजनार्थ राज्यस्तरीय शिष्यवृत्ती योजना. (पदवीपूर्व विद्यार्थी रु. २०००/- प्रतिमहिना, पदव्युत्तर रु. ३०००/- प्रतिमहिना)
 पात्रता निकष –
 राज्यातील कोणत्याही मान्यता प्राप्त महाविद्यालयात संस्कृत अभ्यासक्रमात प्रवेश व शिक्षण आवश्यक.
 किमान ६०% गुण आवश्यक.
 वयाची अट नाही.
 शिष्यवृत्ती स्वरूप – एका शैक्षणिक वर्षानुसार शिष्यवृत्ती व १ महिन्याची विभागात आंतरवासिता अनिवार्य.
(अनिवासी विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था केली जाईल.)
 शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत – २० ऑगस्ट २०२६.
 शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती – सप्टेंबर पहिला आठवडा. (दूरस्थ पद्धतीने)
 निवड झालेल्यांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी – सप्टेंबर दुसरा आठवडा.
 अर्ज करण्यासाठी - https://forms.gle/YdvA3LuFhzwcASC99 हा गूगल फॉर्म भरावा व कागदपत्रे निवेदनासह ई-मेल करावीत.
 हस्ते अथवा पत्राद्वारे/कुरिअरने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी नमूद कराव्यात -
१) आवेदन देताना संस्कृत हा विषय अभ्यासासाठी निवडण्यामागील भूमिका स्पष्ट करावी.
२) अभ्यासेतर उपक्रमांची (Extra curricular activity) माहिती व फोटोकॉपी जोडावी.
३) पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष अभ्यास विषय लिहावा.
४) विद्यार्थ्यांनी द्यावयाची कागदपत्रे -
आवेदन भरताना आवश्यक गुणपत्रके –
 पदवी (बी.ए.) ( पदवी २ रे वर्ष व पुढे) - १०वी व १२वी गुणपत्रक, पदवी १ ले वर्ष गुणपत्रक आवश्यक. आधीच्या वर्षाचे गुणपत्रक, स्वसाक्षान्कित आधार कार्ड प्रत, फोटोसह बायोडाटा, सद्य शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील/महाविद्यालयातील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतल्याचा दाखला/ फ़ी भरल्याची पावती
 पदव्युत्तर (एम.ए.) ( पदव्युत्तर १ ले वर्ष)- १०वी व १२वी गुणपत्रक, पदवीचे गुणपत्रक आवश्यक. स्वसाक्षान्कित आधार कार्ड प्रत, फोटोसह बायोडाटा, सद्य शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील/महाविद्यालयातील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतल्याचा दाखला/ फ़ी भरल्याची पावती

# निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी Email द्वारे कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड विशेष निवड समिती करेल. संपूर्ण मार्गदर्शन व अधिकार निवड समितीचे राहतील.

संस्कृत संस्कृति संशोधिका विभाग, ज्ञान प्रबोधिनी , ५१०, सदाशिव पेठ, पुणे ३०. संपर्क - ०२० - २४२०७१४६, ७३७८३०५६९६ , ईमे.....

पुणे व डोंबिवली पुरोहित गटाची ज्येष्ठ सदस्यांबरोबर झालेली प्रदीर्घ बैठक .. एक नवा समृद्ध अनुभव. आज पर्यंत ज्ञान प्रबोधिन...
13/06/2026

पुणे व डोंबिवली पुरोहित गटाची ज्येष्ठ सदस्यांबरोबर झालेली प्रदीर्घ बैठक .. एक नवा समृद्ध अनुभव. आज पर्यंत ज्ञान प्रबोधिनी मधील अनेक बैठकीत सदस्य म्हणून सहभागी होण्याचा अनुभव घेतल्यानंतर सहकारी सदस्यांना बरोबर घेऊन वेल्हा येथे निवासी बैठकीचे आयोजन करताना, सत्रे ठरवताना व प्रत्यक्ष घडताना तटस्थपणे दुरून बघतानाचा अनुभवशिक्षणाचा पाठ फारच सुंदर होता..

अधिक मास – पुरुषोत्तम मासाचे आगमन या वर्षी १७ मे ते १५ जून हा कालावधी चांद्र पंचांगाप्रमाणे अधिक मास म्हणजे ‘अधिक ज्येष्...
17/05/2026

अधिक मास – पुरुषोत्तम मासाचे आगमन
या वर्षी १७ मे ते १५ जून हा कालावधी चांद्र पंचांगाप्रमाणे अधिक मास म्हणजे ‘अधिक ज्येष्ठ’ मास म्हणून येत आहे. भारतभर व्यावहारिक कामासाठी ग्रेगोरियन कालगणना वापरली जाते तरी सण वार साजरे करताना मात्र अनेक प्रकारची कालगणना विविध प्रांतात वापरली जाते. सौर व चांद्र कालगणना, पौर्णिमान्त व अमान्त महीने यामुळे मुख्यत्वे चांद्र कालगणना ज्या प्रदेशात वापरात आहे तिथे पंचांगात दर तीन वर्षानी अधिक महिना अवतरतो कारण चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे १० ते ११ दिवसांनी कमी असते. यासाठी चंद्र आणि सौर कालगणनेतील हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षानी एक अधिक मास घ्यायला लागतो. आता अशा अधिकच्या येणाऱ्या मासाचा भारतीय परंपरेने विविध व्रत वैकल्ये, अनुष्ठान, साधना करण्यासाठी अचूक उपयोग केला आहे आणि तसे करताना साहजिकच काही पुराणकथा त्याला जोडल्या आहेत. एका अर्थी असा मध्येच येणार हा मास ज्यात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही त्यात सण वार तरी कसे असणार? कारण ते तर चांद्र तिथीनुसार असतात! त्यामुळे परंपरेने मंगल कृत्ये केली जात नाहीत. उपेक्षित अशा या मासाने वैकुंठातील भगवान विष्णूना आपली कथा सांगितली. आता विष्णू, म्हणजे सर्व जीवांचा पालनकर्ता, तो शरणागत आलेल्याचा त्याग कसा करणार ? उदारहृदयी विष्णूने त्याला आपल्याच कृष्णरूपी अवताराला भेटण्यास सांगितले. कृष्णाने त्याला आपलेसे केले व अधिक मासाचे नाव बदलून त्याचे ‘पुरुषोत्तम मास’ असे नामकरण झाले.
वैदिक काळात त्यालाच संसर्प, मलीमलूच, अशी नावे होती ती पुढे मलमास, महाराष्ट्रात धोंडयाचा मास म्हणूनही रूढ झाली. महाराष्ट्र,गुजराथ, कर्नाटक,आंध्र या चांद्र पंचांग वापरणाऱ्या राज्यांमध्ये पुरुषोत्तम म्हणजे विष्णूच्या नावे गौरवलेल्या या महिन्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. व्रत,दान,पूजा, भागवत ग्रंथाचे वाचन, अपूप म्हणजे अनारशाचे दान केले जाते. हे करताना जो मंत्र संकल्प पूर्वक उच्चारायचा त्यात अपूप दान करणे म्हणजे जणू पृथ्वीदान असे म्हणले आहेच पण त्या अनारशाला जितकी छिद्रे असतील तितकी सहस्त्रावधी वर्ष मला स्वर्गलोकात स्थान प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे. ज्याना अनारसे देणे शक्य नाही ते म्हैसूरपाक, बत्तासे असेही पदार्थ दानात देतात. महाराष्ट्रात विष्णू स्वरूप जावयाला असे दान दिले जाते. विष्णू लक्ष्मी असे उदात्त नाते जावयाचे आणि मुलीच्या ठायी असावे हा भाव मनात धरून वास्तविक कौतुक सोहळा करायचं. या निमित्ताने लेक जावयाचे
घरी येणे होणे याचेही अप्रूप असायचे. त्यानिमित्ताने दोघांची ख्याली खुशाली कळायची. काहीवेळा मात्र जावयाने अनाठायी अपेक्षा व्यक्त करणे अथवा पुरणाचे धोंडे करुन त्यातील एखाद्या धोंडयात साधा किंवा मिठाचा खडा भरून जावयाची गंमत करायची अशा चुकीच्या प्रथा पाळल्या जातात. त्यापेक्षा दान,व्रत, उपवास व उपासना, ज्ञानसाधना, लोकसंग्रहात भर घालणे व ‘योगीश्वर कृष्ण’ आत्मसात करण्याचे व्रत स्वीकारून पुरुषोत्तम होणे हा मोक्षाकडे जाण्याचा मार्ग लक्षात घेऊन अधिकाचे स्वागत करावे त्याला अनिष्ट समजू नये.

https://www.facebook.com/share/v/1GPFS8aZH4/?mibextid=wwXIfrपुरोहित प्रीती चंद्रचूडव मीरा होळकर यांच्याहस्ते भा.ज.प. चे ...
29/09/2025

https://www.facebook.com/share/v/1GPFS8aZH4/?mibextid=wwXIfr

पुरोहित प्रीती चंद्रचूडव मीरा होळकर यांच्याहस्ते भा.ज.प. चे ज्येष्ठ सदस्य श्री. सुनीलजी देवधर यांची साठीशांती प्रबोधिनी पद्धतिने झाली. त्याची क्षणचित्रे
सुनीलजी देवधर यांनी सभेमधे स्वतः प्रबोधिनी च्या समभाव व सार्थता , आप्पांचे विचार या वर ५ मिनिटे भाष्य केले .

24/08/2025

लेख क्र. ५४ २३/०८/२०२५ 'यज्ञ' या मासिकाच्या 'प्राचीन भारतीय संस्कृती विशेषांक, दिपावली २००८' मध्ये डॉ. मनीषा शेटे यां....

22/08/2025
20/07/2025

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना ....

02/07/2025

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातींं धरूनिया ॥ धृ ॥चालो वाटें आम्ही तुझाची आधार । चालविसी भार सवे मा...

Address

514, Vinayak Bhavan, Jnana Prabodhini, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when संस्कृत संस्कृति संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share