23/08/2026
‘हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे...
‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी तुडुंब प्रतिसाद दिला.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी
(२२ ऑगस्ट) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘भेसळमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी तुकाराम मुंढे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
या प्रसंगी आधुनिक काळातील तुकाराम ज्यांना बोलले जाते असे जननायक.आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांचा सन्मान दिशा परिवाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे,उपाध्यक्ष संतोष बाबर,
मा.अध्यक्ष गोरख भालेकर,
मा.कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी केला.
या कार्यक्रमात ‘नीट यूजी २०२६’ परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेली श्रावणी कृष्णकांत कुदळे,
जागतिक शूटिंग स्पर्धेतील रौप्यपदक विजेती खेळाडू शौर्या दिलीप भरणे,
पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेला क्षितीजय प्रवीण नप्ते यांचा तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रेरणा शिक्षण संस्थेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी महक जमू जहागिरदार हिने तुकाराम मुंढे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर उत्स्फूर्त भाषण केले.
पत्रकार शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ या पुस्तकातील मजकुराचे श्रीकांत चौगुले यांनी अभिवाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले.
सानिका कांबळे हिने आभार मानले. तसेच
या मुलाखतीत मुंढे यांनी,अन्नातील भेसळ, नागरिकांची जबाबदारी,नैतिकता,प्रशासनातील कार्यपद्धती,कर्तव्याला दिलेले महत्त्व आणि आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासातील अनुभव अशा विविध मुद्द्यांवर परखड आणि अभ्यासपूर्ण मते व्यक्त केली.
तसेच यावेळी एक विशेष सन्मान करण्यात आला
दिशा परिवाराच्या वतीने प्रामाणिक,कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आणि पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय सेवेत असताना कौतुकास्पद कामगिरी करणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांचा यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला...💐💐
या कार्यक्रमाचे आयोजन दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर सदस्य नंदकुमार कांबळे,भरत आल्हाट,डॉ. श्याम अहिरराव,संतोष चांदेरे,विजय कांबळे, राजेश सावंत,समीर काळभोर, गणेश लंगोट,महेंद्र चिंचवडे,रोहित खर्गे, किशोर जवळकर,गुरुदास भोंडवे,बाजीराव लोखंडे,ॲड.अविनाश ववले...
०००*