Shree Shivaji Kul, Scout Guide Open Troop, Pune.

  • Home
  • India
  • Pune
  • Shree Shivaji Kul, Scout Guide Open Troop, Pune.

Shree Shivaji Kul, Scout Guide Open Troop, Pune. An Oldest Scout & Guide Open Troop In India.

14/11/2025

गंमत जत्रा २०२५🥳

दिपोत्सव २०२५दिनांक १७/१०/२०२५, शुक्रवार रोजी मैदानावर दिवाळीनिमित्त दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या दिपोत्...
22/10/2025

दिपोत्सव २०२५

दिनांक १७/१०/२०२५, शुक्रवार रोजी मैदानावर दिवाळीनिमित्त दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या दिपोत्सवाची संकल्पना Operation Sindoor ही घेण्यात आली होती. दिवाळीनिमित्त मैदानावर विजयदुर्ग किल्ला बनवण्यात आला होता. त्याचबरोबरीने कुलमंदिर व बाहेरील कट्टयावर रांगोळी व दिवे लावून मैदान सजवण्यात आले होते. कार्यक्रमास ७० मुले व १५ अधिकारी उपस्थित होते. त्याचीच ही काही छायाचित्रे...

17/10/2025

श्री शिवाजी कुला तर्फे यंदा दिवाळीत विजयदुर्ग - जलदुर्ग प्रतिकृती

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे यंदा ही प्रतिकृती साकारण्यात आली.

दिनांक १/१०/२०२५, बुधवार रोजी मैदानावर नवरात्रीनिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. यावेळी गीतांजली वनारसे यांनी मुलांना भो...
07/10/2025

दिनांक १/१०/२०२५, बुधवार रोजी मैदानावर नवरात्रीनिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. यावेळी गीतांजली वनारसे यांनी मुलांना भोंडल्याचे महत्व सांगितले तसेच नवरात्रउत्सवाची माहिती सांगितली. त्यानंतर हत्तीची पुजा रोहिणी सणस यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी भोंडल्याची गाणी म्हणत भोंडल्याला सुरुवात केली. नंतर सर्व मुलांना खिरापत देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास १०५ मुले व १५ अधिकारी उपस्थित होते.

दिनांक ०२/१०/२०२३ गुरूवार, रोजी मैदानावर दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी पुरुरवा वैद्य यांनी सर्व मुलांना श...
03/10/2025

दिनांक ०२/१०/२०२३ गुरूवार, रोजी मैदानावर दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी पुरुरवा वैद्य यांनी सर्व मुलांना शस्त्र पूजेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर सर्व मुलांनी सर्व शस्त्रांचे पूजन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

राखी बनविणे बुलबुल विभागातील मुलींसाठी दिनांक ०४/०८/२०२५, सोमवार रोजी राखी बनवणे हा उपक्रम  घेण्यात आला. मुलींनी वेगवेगळ...
06/08/2025

राखी बनविणे
बुलबुल विभागातील मुलींसाठी दिनांक ०४/०८/२०२५, सोमवार रोजी राखी बनवणे हा उपक्रम घेण्यात आला. मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे मोती, मणी इत्यादी साहित्य वापरून सुबक राख्या बनवल्या. या उपक्रमामध्ये १८ मुली सहभागी झाल्या होत्या. मीनाक्षी कपणे आणि आर्या बुटाला यांनी मार्गदर्शन केले.

वर्षा सहल २०२५कडेपठार, जेजुरी, मोरगाव   दिनांक २५ जुलै २०२५ रविवार रोजी श्री शिवाजी कुलातील स्काऊट, गाईड, कब १, बुलबुल १...
02/08/2025

वर्षा सहल २०२५

कडेपठार, जेजुरी, मोरगाव

दिनांक २५ जुलै २०२५ रविवार रोजी श्री शिवाजी कुलातील स्काऊट, गाईड, कब १, बुलबुल १ विभागाची वर्षा सहल कडेपठार, जेजुरी व मोरगाव येथे नेण्यात आली होती. रविवार सकाळी ग्राउंड वरून निघाल्यावर मध्ये नाष्ट्याला थांबून पुन्हा कडेपठारच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
कडेपठार च्या पायऱ्या चढून मुले मंदिरात पोहोचली. मंदिराच्या परिसरात फिरून झाल्यानंतर श्लोक दादांनी कडेपठारच्या डोंगराची माहिती सांगितली. नंतर पुढे कडेपठार चा डोंगर ते जेजुरी डोंगर अशी पायी भ्रमंती सुरू झाली. मध्ये मध्ये ऊन पावसाचा खेळ चालू होता. जेजुरीला पोहोचल्यानंतर मंदिर, दीपमाळ, भंडारा उधळणे अशा काही वेगळ्या गोष्टी मुलांनी बघितल्या. ४२.५ किलो वजनाची खंडा तलवार मुलांना दाखवण्यात आली. तलवारीची माहिती विरेंद्र दादांनी मुलांना सांगितली.
जेजुरी गड उतरून जेवणे उरकून थोडे थांबून पुढच्या प्रवासाला मोरगावच्या दिशेने निघालो. गाडीमध्ये मोरगावच्या गणपतीची माहिती व महत्त्व निर्मला ताईंनी मुलांना सांगितले. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो. नंतर पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून मुलांना उसाचा रस देऊन सहलीची सांगता करण्यात आली व परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
या सहलीला ३१ मुले व १५ अधिकारी उपस्थित होते.

दिनांक २९/०७/२०२५, मंगळवार रोजी मैदानावर नागपंचमी साजरी करण्यात आली. या निमित्त कब बुलबुल स्काऊट गाईड या विभागांनी माती ...
30/07/2025

दिनांक २९/०७/२०२५, मंगळवार रोजी मैदानावर नागपंचमी साजरी करण्यात आली. या निमित्त कब बुलबुल स्काऊट गाईड या विभागांनी माती पासून नाग तयार केले व त्याची पूजा करण्यात आली. तसेच बनी विभागाने देखील कार्डशिट पासून नाग बनवले. सर्व मुलांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. उपक्रमामध्ये ४० बालगट व ६२ स्काऊट गाईड कब बुलबुल मुले व १७ अधिकारी उपस्थित होते.

⚜️ वर्षा सहल २०२५ - बनी, कब - बुलबुल  विभागदिनांक २०/०७/२०२५, रविवार रोजी श्री शिवाजी कुलातील बनी (ज्युनिअर, सिनियर, पहि...
28/07/2025

⚜️ वर्षा सहल २०२५ - बनी, कब - बुलबुल विभाग

दिनांक २०/०७/२०२५, रविवार रोजी श्री शिवाजी कुलातील बनी (ज्युनिअर, सिनियर, पहिली ) व कब-२, बुलबुल-२, विभागाची वर्षासहल स्वामी ॲग्रो टुरिझम, थेऊर येथे नेण्यात आली होती. रिसॉर्टवर बालगट व कब, बुलबुल विभागाच्या विविध प्रकारच्या खेळाच्या व इतर मजेदार ॲक्टिव्हीटीज घेण्यात आल्या. त्यामध्ये ब्लाइंड बॉल, सॉर्टिंग बॉल, वॉटर फील कप, बलून गेम्स, कप ब्लो रेस इ. चा समावेश होता.

त्याचबरोबर सर्वांना प्लांट नर्सरी फुलांच्या रोपांची लागवड कशी करण्यात येते याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पाण्यामध्ये खेळण्याचा तसेच रेनडान्स चा आनंदही सर्वांनी लुटला. पोटभर जेवण झाल्यानंतर मॅजिक शो देखील दाखवण्यात आला.

निसर्गाच्या सानिध्यात खेळण्याकरिता मुलांना थोडा वेळ देण्यात आला. त्यानंतर सर्वांना सरबत वाटप करून सहलीची सांगता करण्यात आली व परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. या सहलीस ४५ मुले व १२ अधिकारी उपस्थित होते.

चिटणीस

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 6pm - 8pm
Tuesday 6pm - 8pm
Wednesday 6pm - 8pm
Thursday 6pm - 8pm
Friday 6pm - 8pm
Saturday 6pm - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Shivaji Kul, Scout Guide Open Troop, Pune. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Shivaji Kul, Scout Guide Open Troop, Pune.:

Share