03/06/2026
🚩 श्रमदानातून इतिहासाला नवी ऊर्जा! 🚩
दुर्ग मुल्हेरवरील प्रवेशद्वार बुजलेल्या अवस्थेत असताना, सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी अथक परिश्रम घेत ते पुन्हा मोकळे करण्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. 💪⛰️
गड-कोट हे केवळ पर्यटन स्थळे नसून आपल्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. त्यांचे संवर्धन आणि जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
या श्रमदानामुळे इतिहासाला नवसंजीवनी मिळत आहे आणि आपला अमूल्य वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहत आहे. आम्हाला गरज आहे ती अजून श्रम करणाऱ्या हातांची. या पवित्र गडकोट संवर्धन कार्यात सहभागी होऊन पराक्रमी गडकोटांना नवसंजीवनी देण्यात आम्हाला मदत करा 🙏🚩
"गडांचे रक्षण म्हणजे इतिहासाचे जतन, आणि इतिहासाचे जतन म्हणजे आपल्या अस्मितेचे संरक्षण." 🚩
चला, गड वाचवू… वारसा जपू…
जय शिवराय! जय दुर्गसेवा! 🚩🔥 #दुर्गमुल्हेर #श्रमदान #दुर्गसंवर्धन #गडकोट #जयशिवराय #सह्याद्री #दुर्गसेवक
#अधिकृत_पोस्ट-
SPHMSMV 224/03062026
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान,
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩