Iti Poornam

Iti Poornam New Step for the Environment

19/02/2026

पेहेल-२०२६ – कचरा व्यवस्थापनासाठी शहर स्तरावरील अभियान...

'पेहेल' हे संपूर्ण पुणे शहरातील सर्वांत मोठे ई-कचरा व प्लास्टिक जनजागृती आणि संकलन अभियान आहे.

🔹 गोळा झालेला ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा हा MPCB अधिकृत रिसायकलर्सकडे सुरक्षितरीत्या पाठवला जातो.
🔹 वापरण्यायोग्य लॅपटॉप/संगणक दुरुस्त करून ग्रामीण शाळांना वितरित केले जातात.
🔹 गेल्या वर्षी ८० किलो प्लास्टिकपासून ४० बेंच तयार करून पुण्यातील सार्वजनिक उद्यानांमध्ये बसवण्यात आले.

यावर्षी प्लास्टिकपासून शीट व फर्निचर निर्मितीचा संकल्प!

- तारीख: १ मार्च २०२६
- वेळ: सकाळी ९ ते दुपारी १

जवळील संकलन केंद्र पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून संकेतस्थळाला भेट द्या.

'पेहेल' मध्ये सहभागी व्हा आणि “इति पूर्णम” ला फॉलो करा.

07/02/2026

निरोगी जीवनाची सुरुवात आपल्या स्वयंपाकघरातून!

योग्य आहार असेल तरच उत्तम आरोग्य टिकून राहते. पण आजची खरी परिस्थिती चिंताजनक आहे. आपल्या किचनमध्ये दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. या प्लास्टिकमधून BPA सारखी घातक रसायने बाहेर पडून शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.

✅ आजच करा छोटे पण महत्त्वाचे बदल:
✓ प्लास्टिकऐवजी स्टील, काच, माती किंवा लाकडी भांडी वापरा.
✓ गरम अन्न किंवा पाणी प्लास्टिकमध्ये ठेवणे टाळा.
✓ डाळ-तांदूळ साठवण्यासाठी काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरा.
✓ स्वयंपाकासाठी लाकडी किंवा स्टीलचे चमचे वापरण्याची सवय लावा.
✓ प्लास्टिक बाटल्यांऐवजी स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा.

👉 पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैलीसाठी इति पूर्णम ला फॉलो करा.

31/01/2026

पिशवी विसरलो म्हणून बाजारात प्लॅस्टिक पिशवी घेतल्यामुळे काय होईल याचा विचार करतो का?

एकदा वापरलेलं प्लॅस्टिक 400–500 वर्षं नष्ट होत नाही!
म्हणजे आपण फक्त आपलं नाही, तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं भविष्य धोक्यात टाकतोय.

आजपासून हे करा 👇
✔️ बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत ठेवा
✔️ चहा-नाश्त्यासाठी रीयूजेबल कप आणि चमचा वापरा
✔️ सिंगल यूज प्लॅस्टिकला नकार द्या
✔️ प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक वस्तू निवडा
✔️ बदलाची सुरुवात स्वतःपासून करा

💚 आपलं भविष्य निरोगी ठेवायचं असेल, तर आजच कृती करा.
विचार करा आणि फॉलो करा – 'इति पूर्णम' ला

24/01/2026

वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं घरात साठवू नका ♻️
ई-वेस्ट अधिकृत रिसायकलिंग सेंटरलाच द्या.
तुमचा एक बदल पर्यावरण वाचवेल 🌍

🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त
ई-यंत्रण | ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान
https://poornamecovision.org/events/mega-drives/e-yantran-2026 -centers
Follow 👉

03/01/2026

प्लास्टिक कप बंद केले… पण पेपर कप आणि स्ट्रॉ वापरणे योग्य आहे का?

पेपर कपवर असतं पातळ प्लास्टिक आवरण. त्यामुळे ते रिसायकल होत नाहीत आणि त्यांचे विघटनही होत नाही. शिवाय गरम चहा/कॉफीमुळे मायक्रोप्लास्टिक आणि केमिकल्स शरीरात जातात.

➡️ आपण काय करू शकतो? (Action Points)
✔️ काच, स्टील, बांबूचे कप वापरा
✔️ Reusable स्ट्रॉ वापरा
✔️ ऑफिस, कॅन्टीन, कॉलेजमध्ये सिंगल-यूज कप्स/स्ट्रॉ बंद करण्याची मागणी करा

🌍 तुमची तात्पुरती सोय पण निसर्गाचं कायमचं नुकसान!

आजच जबाबदारी स्वीकारा आणि Follow करा — 'इति पूर्णम' ला

30/12/2025

जुने कपडे फेकण्याआधी एकदा विचार करा! ♻️

👉 वापरलेल्या कपड्यांमध्ये असतात रसायने व रंग
👉 ते जमिनीत व पाण्यात मिसळून प्रदूषण करतात
👉 एक जीन्स तयार करण्यासाठी लागतात सुमारे १०,००० लिटर पाणी
👉 तीच जीन्स विघटित व्हायला लागतात १०० वर्षे

🌱 मग उपाय काय?
✔️ जुने कपडे साठवा
✔️ त्यातून नव्या वस्तू तयार करा
✔️ सामाजिक संस्थांना दान करा – ते पुनर्वापर करतात

❌ निसर्गाला त्रास नको
✅ विचार बदला, पर्यावरण वाचवा

📢 आजच निश्चय करा आणि फॉलो करा 'इतिपूर्णम' ला.

23/12/2025

सौंदर्य हवंयच… पण आरोग्य आणि निसर्गाच्या किंमतीवर नाही!
दररोज वापरली जाणारी क्रीम्स, लोशन्स, मेकअप प्रॉडक्ट्स त्वचेपुरती मर्यादित राहत नाहीत — ती थेट आपल्या रक्तात जातात. संशोधन सांगतं की 80% लोकांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळतं. यामुळे हार्मोनल असंतुलन, त्वचारोग, प्रजनन समस्या आणि कॅन्सरचा धोका वाढतो.

इतकंच नाही तर दरवर्षी 11 दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात मिसळतं, ज्यामध्ये कॉस्मेटिक्सचा मोठा वाटा आहे.

आता निवड आपली आहे —
रसायनांऐवजी हळद, दूध, मुलतानी माती आणि नैसर्गिक उत्पादनांची.
आपलं सौंदर्य जपूया, निसर्ग वाचवूया 🌿

योग्य निवड करा… आणि फॉलो करा #इतिपूर्णम ला ♻️✨

15/12/2025

जेंव्हा आपण घराबाहेर पडतो, तेंव्हा पाणी बॉटल, टिश्यू पेपर, प्लास्टिक चमचे अशा छोट्या पण गरजेच्या वस्तूंवर अवलंबून असतो.
पण कधी विचार केलाय का, आपल्या या सोयीसाठी निसर्गाचं किती मोठं नुकसान होत आहे? 🌍

जर आपण गरजेपुरत्या वस्तू सोबत ठेवू शकतो, तर पर्यावरणपूरक सवयी का नाही?
👉 स्वतःची कॉपर/स्टील पाण्याची बाटली
👉 स्टीलचा चमचा
👉 रुमाल

या छोट्या सवयींनी मोठा बदल घडू शकतो.
**सवय बदला, निसर्ग वाचवा 🌱**
Follow करा 👉 **इति पूर्णम**

15/12/2025

जेंव्हा आपण घराबाहेर पडतो, तेंव्हा पाणी बॉटल, टिश्यू पेपर, प्लास्टिक चमचे अशा छोट्या पण गरजेच्या वस्तूंवर अवलंबून असतो.
पण कधी विचार केलाय का, आपल्या या सोयीसाठी निसर्गाचं किती मोठं नुकसान होत आहे? 🌍

जर आपण गरजेपुरत्या वस्तू सोबत ठेवू शकतो, तर पर्यावरणपूरक सवयी का नाही?
👉 स्वतःची कॉपर/स्टील पाण्याची बाटली
👉 स्टीलचा चमचा
👉 रुमाल

या छोट्या सवयींनी मोठा बदल घडू शकतो.
*सवय बदला, निसर्ग वाचवा 🌱*
Follow करा 👉 *इति पूर्णम*

08/12/2025

आपल्या सौंदर्य प्रसाधनांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आहे

दररोज सुंदर दिसण्यासाठी आपण जे प्रोडक्ट्स वापरतो, त्यातील पॅराबेन्स, SLS, मायक्रोप्लास्टिक हळूहळू शरीरात शिरतात आणि पर्यावरणाचे प्रदूषण देखील करतात!

🌍 दरवर्षी लाखो टन मायक्रोप्लास्टिक ब्युटी प्रोडक्ट्समधून समुद्रात मिसळतं… तेच शेवटी आपल्या अन्नात परत येतं.

🌿 आजपासून निवडा इकोफ्रेंडली प्रोडक्ट्स—
• रीठा-शिकाकाई शॅम्पू
• नारळाचं तेल
• ऑर्गेनिक, हर्बल, नैसर्गिक प्रोडक्ट्स

✨ पृथ्वीला त्रासदायक कृती टाळूया.
👉 आजच बदल करा… आणि Follow करा— इति पूर्णमला! 🌱💚

29/11/2025

तुम्ही घर साफ करताय की आरोग्य बिघडवताय?

आपलं घर स्वच्छ आणि सुगंधित ठेवायचं ही सगळ्यांचीच इच्छा. ही स्वच्छता खरंच आरोग्यदायी आहे का? 🤔

➡️ धोक्याचं कारण – रासायनिक क्लीनर्स:
फरशी पुसताना, बाथरूम धुताना किंवा रूम सुगंधित करण्यासाठी रासायनिक क्लीनर्सचा वापर केला जातो. रसायने हवेत मिसळतात आणि आपण श्वासाद्वारे घेतो 😮‍💨
परिणामी अस्थमा, श्वसनसंस्थेचे आजार, डोकेदुखी, थकवा इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यातही लहान मुलं, वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना सर्वाधिक त्रास होतो.

➡️ घरातलं हवा प्रदूषण कमी करण्याचे सोपे उपाय:
✔️ रासायनिक क्लीनर्स वापरणं कमी करा
✔️ बायो-एन्झाइम वापरून तयार केलेले प्रोडक्ट निवडा
✔️ सुगंधित नैसर्गिक स्प्रे वापरा
✔️ घरात हवा खेळती ठेवा

🌸 स्वच्छता म्हणजे फक्त चमक नव्हे,
ती असावी आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक! 🌱

👣 Follow करा — इति पूर्णम ♻️

01/11/2025

फास्ट फॅशनचा आरोग्याशी आणि पर्यावरणाशी काय संबंध?

सिंथेटिक कपड्यांमधून धुतल्यावर बाहेर पडतात मायक्रोफायबर्स — हेच प्लास्टिक आपल्या पाण्यात, अन्नात आणि शरीरात पोहोचतात. या कपड्यांतील रसायनं त्वचा, फुफ्फुसं आणि हार्मोन्सवर परिणाम करतात.

💡 उपाय आपल्या हातात:
✔️ सेंद्रिय कापड वापरा — खादी, रिसायकल्ड फॅब्रिक निवडा.
✔️ स्थानिक उत्पादकांकडून खरेदी करा.
✔️ “स्वस्त आणि मस्त” फॅशनपेक्षा टिकाऊ, पर्यावरणपूरक फॅशन निवडा.

🌿 फॅशन करताना फक्त दिसणं नाही,
आरोग्य आणि पर्यावरणाचीही काळजी घ्या!

👣 Follow करा 'इति पूर्णम' ला♻️

Address

Pune
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Iti Poornam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share