09/08/2024
*एसबीसी चळवळीचा इतिहास*
१) १९९४ मध्ये गोवारी हत्त्याकांडानंतर एसबीसी ची निर्मीती करण्यात आली व २%आरक्षण देण्यात आले.
२) १९९५ मध्ये एका विद्यार्थ्यांने याचिका टाकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
३) सन २००० मध्ये एसबीसी ला २% स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी मी (सुरेश पद्मशाली ) आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण केले. आमदार कैलासजी गोरंट्याल यांंचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळानी त्यावेळचे मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांंचेसोबत चर्चा केली असता ओबीसी १७ टक्के + एसबीसी २% असा फार्मुला मंजूर करण्यात आला परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
४) २६-३-२००७ ला मी (सुरेश पद्मशाली ) पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसलो असता पद्मशाली समाजाचे सोलापूर येथील आमदार मा. नरसय्या आडम यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडला व सरकारला धारेवर धरले परंतु आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही.
५) २००८ मध्येच आमदार नरसय्या आडम यांंचे आवाहनानुसार ८ ते १० हजार पद्मशाली बांधवांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले व विधानसभेत आडम साहेबांनी प्रश्न मांडला परंतु आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही.
६) सन २००९ मध्ये मी (सुरेश पद्मशाली ) सलग १२ दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण केले परंतु आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही.
७) सन २००८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल परंतु न्यायालयाने देखील न्याय दिला नाही.
८) पुणे येथे ४ दिवस आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणाला पद्मशाली, साळी, सकुळ साळी, कोष्टी व इतर समाजाचे शेकडो लोक सहभागी झाले.
९) भिवंडी येथेही आमरण उपोषण करण्यात आले.
१०) २००० पासून सतत आमरण उपोषण, धरणे आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही.,११)राज्यात एमबीबीएस व इतर उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात एमबीबीएस च्या १०१४५ व बिडीएस च्या ३५२६ जागा आहेत या व्यतीरीक्त बीएएमएस व इतर जागा आहेत. इंजीनीअरींग च्या १ लाख ४० हजार जागा आहेत. एकंदर १० लाख जागा आहेत.
१९९४ मध्ये एसबीसी ला २%आरक्षण मिळाले व १९९५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. २००१ मध्ये ही याचिका फेटाळली तरीही एसबीसी ला २% स्वतंत्र आरक्षण मिळाले नाही.
दरवर्षी निघणाऱ्या एमबीबीएस प्रास्पेक्टस मध्ये १९९५ ते २०१९ पर्यंत एसबीसी आरक्षणाला उच्च न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे एसबीसी ला ओबीसींच्या १९ टक्क्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे सांगून आरक्षण नाकारण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून उच्च न्यायालयाची स्थगिती नसल्याचे निदर्शनास आणून दिले तेंव्हा शासनाने २००६ चा राज्यपालांचा अद्यादेश असल्याचे सांगितले व आमची याचिका खारीज केली.
सन २०२३ च्या नीट प्रास्पेक्टस मध्ये सन २००६ चा अध्यादेश असल्याने एसबीसी विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी समजण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.
सन २००० पासून सतत आम्ही आमरण उपोषण, साखळी उपोषण व धरणे आंदोलने केली परंतु २%आरक्षण मिळाले नाही.
एसबीसी चे आरक्षण रद्द व्हावे या याचिकेला विरोध करण्यासाठी राज्यातील विविध एसबीसी व सामाजिक संघटनानी ५० आमदारांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यासाठी पत्र घेतले. परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत केवळ ४ आमदार उपस्थित होते.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले . या अधिवेशनात आपले एसबीसी चे आमदार किंवा त्या ५० आमदारांपैकी कोणीतरी लक्षवेधी प्रश्न मांडून एसबीसी ला २% स्वतंत्र आरक्षण मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. परंतु ते शक्य झाले नाही.
२००६ च्या राज्यपालांच्या अद्यादेशामुळे एसबीसी चे आरक्षण रद्द होऊ शकत नाही असे माझे मत आहे. उच्च न्यायालयातील केस इंटरव्हेन्शन करावे असे मी आवाहन केल्यावरून अनेकांनी इंटरव्हेन्शन केले त्याबद्दल धन्यवाद !
या केसचा निकाल आणखी २-४ वर्ष लागणार नाही त्यामुळे आरक्षणाला धोका नाहीच.
सद्या एमबीबीएस व इतर एडमीशन सुरू आहेत. २% स्वतंत्र आरक्षण मिळाले असते तर २०० हून अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळाला असता परंतु आता ओबीसी कोट्यातून ५० विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार नाही.
मराठा समाजातील वकिल जसे एकत्र आले व त्यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात संघर्ष केला त्याचप्रमाणे एसबीसी तील वकिलांनी एकत्र येऊन एसबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. तसेच मराठ्यांनी जसे विशाल मोर्चे व आंदोलने केली त्याचप्रमाणे एसबीसी ने आंदोलन करण्याची गरज आहे.
वयोमानाने मी (७०) पुढे आंदोलने करू शकत नाही. अशावेळी अशोक तरूणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
सोलापूर येथे एसबीसी ची लोकसंख्या जवळपास ५ लाख आहे. एसबीसी चे प्रश्न सोडविण्यासाठी *एसबीसी आरक्षण बचाव समिती* अशी नविन संघटना स्थापन करावी व या संघटनेतर्फे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा चे आयोजन करावे तसेच मागणी मान्य होईपर्यंत *आमरण उपोषण* ठेवावे *मी आमरण उपोषण करण्यास तयार आहे*
*-सुरेश पद्मशाली*
President, SBC foundation