Bhaashaa Foundation

Bhaashaa Foundation Bhaashaa is a planned and organized endeavour for the preservation and enhancement of regional languages.

03/04/2026

भाषा फाउंडेशन चा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम मराठी भाषा ऑलिंपियाड. शालेय अभ्यासक्रमाला पूरक आणि उपयुक्त अशी रंजक परीक्षा मराठी...
13/08/2025

भाषा फाउंडेशन चा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम मराठी भाषा ऑलिंपियाड. शालेय अभ्यासक्रमाला पूरक आणि उपयुक्त अशी रंजक परीक्षा मराठी भाषा ऑलिंपियाड.

नावनोंदणी सुरु. अधिक माहितीसाठी संपर्क

भाषा फाउंडेशन, पुणे ९९२२४४८७७१, ९१३००९६०३८

31/07/2025
24/05/2025

"मी गुजराती असले, तरी मला मराठी भाषा खूप आवडते."

"ह्या पुस्तकाचं कव्हर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी हे पुस्तक घेतलं.”

”आम्हाला मराठी भाषा ऑलिंपियाड परीक्षा खूप आवडते. ती परीक्षा घेणाऱ्या ‘भाषा फाउंडेशन’ चा स्टॉल इथे बघून फार मज्जा वाटली.”

“ पुस्तक लिहिणाऱ्सा लेखिकेची सही पुस्तकावर घ्यायला किती भारी वाटतं!”

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५ या कार्यक्रमातील 'भाषा' पुस्तक स्टॉल ला भेट दिलेले पालक असो की मुलं, या उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे "कोण म्हणतं मुलं वाचत नाही?" या प्रश्नाला दिलेलं उत्तरच.

“भाषा फाउंडेशन”च्या स्टॉल ला भेट देऊन बालवाचकांच्या आवडत्या लेखिका स्वाती राजे यांच्याशी संवाद साधा!

“भाषा फाउंडेशन”
स्टॉल नं. ७०

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५
२२ ते २५ मे २०२५

गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट पुणे

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५ या कार्यक्रमातील ‘भाषा‘ पुस्तक ...
23/05/2025

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५ या कार्यक्रमातील ‘भाषा‘ पुस्तक स्टॉलला भेट.

चंद्रकांत पाटील यांना भाषा फाउंडेशन च्या अध्यक्ष आणि बालवाचकांच्या आवडत्या लेखिका स्वाती राजे लिखित पुस्तके भेट देण्यात आली.

लेखिकेशी गप्पागोष्टी‘भाषा फाउंडेशन’च्या स्टॉलला भेट द्या,आवडत्या लेखिकेची स्वाक्षरी घ्या ! बालवाचकांच्या आवडत्या लेखिका,...
23/05/2025

लेखिकेशी गप्पागोष्टी

‘भाषा फाउंडेशन’च्या स्टॉलला भेट द्या,
आवडत्या लेखिकेची स्वाक्षरी घ्या !

बालवाचकांच्या आवडत्या लेखिका, ‘भाषा फाउंडेशन‘ च्या अध्यक्ष स्वाती राजे यांची भेट घेण्याची संधी.
जरूर या!

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५

स्टॉल क्र - ७०
‘भाषा फाउंडेशन‘

२२ ते २५ मे २०२५

स्थळ: गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट, पुणे

पुस्तकजत्रा दिवसभर खुली

"वस्ती तिथे वाचनालय" प्रकल्पांतर्गत भाषा फाउंडेशनची“ भाषा- दूत” प्रशिक्षण कार्यशाळा ‘भाषा फाउंडेशन’, च्या ‘वस्ती तिथे वा...
08/05/2025

"वस्ती तिथे वाचनालय" प्रकल्पांतर्गत
भाषा फाउंडेशनची
“ भाषा- दूत” प्रशिक्षण कार्यशाळा

‘भाषा फाउंडेशन’, च्या ‘वस्ती तिथे वाचनालय’ प्रकल्पांतर्गत राज्यात शहरी, ग्रामीण व दुर्गम भागात गेली १५ वर्षे “ भाषा पुस्तकघरे” चालवली जात आहेत.
या उपक्रमाचा विस्तार म्हणून पुण्यातील काही वस्त्यांतून नवी वाचन- संवाद केंद्रांची सुरवात करण्यात येत आहे. त्यासाठी युवक- युवतींसाठी खास “भाषा - दूत” प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली.

मराठी 'भाषा' ऑलिंपियाड दशकपूर्ती कौतुक सोहळा.इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा एम के सी एल चे चीफ में...
27/02/2025

मराठी 'भाषा' ऑलिंपियाड दशकपूर्ती कौतुक सोहळा.

इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा एम के सी एल चे चीफ मेंटॉर विवेक सावंत यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. यंदा या परीक्षेला दहा वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्र व गोव्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थी यंदा या परीक्षेत सहभागी झाले आहेत. यातील विशेष प्रावीण्य पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदक वितरण करण्यात आले.

"या ऑलिंपियाड परीक्षेच्या माध्यमातून मुलांना भाषेची गोडी लागते आहे. त्यांच्यात काय त्रुटी आहेत त्यापेक्षा त्यांची बलस्थाने काय आहेत यावर ही परीक्षा भर देते आणि हेच तिचे वैशिष्ट्य आहे."असे सांगून विवेक सावंत यांनी "मराठी भाषा फक्त ओव्या आणि शिव्यांपुरती मर्यादित न राहता तिचे ज्ञानभाषा म्हणून विकसन होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले . “आणि त्यासाठी आपणा सर्वांनी 'भाषा' च्या कार्यात योगदान दिले पाहिजे" असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना केले.

मराठी 'भाषा' ऑलिंपियाड दशकपूर्ती कौतुक सोहळा. इयत्ता ३ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. आंतरराष्ट्रीय मातृभाषा ...
27/02/2025

मराठी 'भाषा' ऑलिंपियाड दशकपूर्ती कौतुक सोहळा.

इयत्ता ३ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी 'भाषा' ऑलिंपियाड परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

भाषा फाउंडेशन आयोजित मराठी 'भाषा' ऑलिम्पियाड चे हे १० वे वर्ष आहे. त्यास महाराष्ट्र व गोव्यातील १०,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 'भाषा’ चे विश्वस्त जयदीप राजे, रणजित नाईकनवरे तसेच ‘भाषा’ चे सल्लागार व रिअर ॲडमिरल ( निवृत्त)आशिष कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदक वितरण करण्यात आले.

The 11th edition of "Yakshaprashna 2025" : the state level Inter-school quiz competition organized by Bhaashaa Foundatio...
22/01/2025

The 11th edition of "Yakshaprashna 2025" : the state level Inter-school quiz competition organized by Bhaashaa Foundation, concluded with Abhinav Vidyalaya English Medium Primary School, Pune, emerging winners among 40 teams from across Maharashtra. This state-level quiz celebrated the spirit of learning, critical thinking, and inclusivity, with participants from Nashik, Kandivali, Jule Solapur, Ichalkaranji, Pandharpur and more. Renowned cartoonist Charuhas Pandit graced the event as the Chief Guest. Congratulations to all participants for their remarkable efforts!

Address

C-9, Renuka Complex, Jangli Maharaj Road, Deccan Gymkhana
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhaashaa Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhaashaa Foundation:

Share