07/08/2026
#धुळे जिल्ह्यात प्रशासनाची साथ... मूल्यवर्धनच्या वाटचालीला गती! ✨
#मूल्यवर्धन कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी धुळे जिल्ह्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नुकत्याच भेटी घेण्यात आल्या.
या भेटींमध्ये मा. सौ. मायादेवी परदेशी (महापौर, महानगरपालिका, धुळे), मा. श्री. बाबासाहेब जालिंदर बेलदार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., धुळे), मा. श्री. मनिष पवार (शिक्षणाधिकारी प्राथ.), मा. श्री. प्रमोद सोनार (उपशिक्षणाधिकारी प्राथ. तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी) यांच्यासोबत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली.
यासोबतच डायट धुळे यांच्या माध्यमातून साक्री आणि शिरपूर तालुक्यांसाठी मूल्यवर्धन तासिका नियोजनाची पत्रे निर्गमित झाली.
हीच आहे सकारात्मक सहकार्य, ठोस नियोजन आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची एकत्रित वाटचाल! 💙